फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज३०७५१ बेजबाबदार नागरिकांकडून रु १ कोटी ५३ लक्ष ७५ हजार ५०० वसूल!

३०७५१ बेजबाबदार नागरिकांकडून रु १ कोटी ५३ लक्ष ७५ हजार ५०० वसूल!

Advertisements

आतापर्यंत ३६२२१ व्यक्तिं विरुध्द कारवाई
नागपूर, ता.१९ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (१९ मार्च) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ६० नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३६२२१ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,६४,६९,५००/- चा दंड वसूल केला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली असून कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे.

शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १५, धरमपेठ झोन अंतर्गत २, हनुमाननगर झोन अंतर्गत ६, धंतोली झोन अंतर्गत ४, नेहरुनगर झोन अंतर्गत ८, गांधीबाग झोन अंतर्गत ५, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ०, लकडगंज झोन अंतर्गत ७, आशीनगर झोन अंतर्गत ८, मंगळवारी झोन अंतर्गत ५ आणि मनपा मुख्यालयातील ० जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ३०७५१ बेजबाबदार नागरिकांकडून रु १ कोटी ५३ लक्ष ७५ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.

नागपूरात रुग्णांची संख्यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.

शुक्रवारी २५ प्रतिष्ठानांवर  कारवाई-
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. १९ मार्च) रोजी २५ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. १,८०,००० चा दंड वसूल केला. पथकानी दोन रुग्णालयांविरुध्द जैविक कचरा सामान्य कच-यात टाकण्यासाठी दंड केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या