फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइम११ वर्षाच्या मुलीवर ६२ वर्षाच्या वृद्धाचा बलात्कार

११ वर्षाच्या मुलीवर ६२ वर्षाच्या वृद्धाचा बलात्कार

Advertisements

पेन गिफ्ट देण्याचे आमिष: नराधम वृद्धाला अटक

नागपूर, ता. 6: पेन गिफ्ट देण्याचे आमिष दाखवून ११ वर्षीय मुलीवर ६२ वर्षाच्या दुकानदार वृद्धाने बलात्कार केला. ही घटना जरीपटक्‍यात उघडकीस आली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी नराधम वृद्धास अटक केली. गुल्लूबाबा उर्फ उमेश शंकरराव गुरलवार (रा. जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 11 वर्षीय मुलगी ही जरीपटक्‍यातील एका नामांकित शाळेत सहाव्या वर्गात शिकते. तिचे आई-वडील मोलमजुरी करतात. सप्टेबर महिन्यात दुपारच्या सुमारास ती पेन विकत घेण्यासाठी वस्तीत असलेल्या जनरल स्टोअर्समध्ये गेली. दुकानात कुणीही नसल्यामुळे दुकानदार वृद्ध गुल्लूबाबा याची नियत फिरली. तिला पेनचे पैसे न घेता गिफ्ट करण्याचे आमिष दाखवले. पैसे वाचणार म्हणून मुलीनेही पेन घेण्यास होकार दिला. मात्र, गुल्लूबाबाने तिला दुकानात येण्यास सांगितले. आतमधल्या खोलीत नेऊन तिच्याशी अश्‍लिल चाळे केले. काही वेळातच त्याने दोन पेन तिच्या हाती दिली आणि पुन्हा दुकानात नेले. ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानासुद्धा तिच्यावर बलात्कार केला.

कुणालाही न सांगण्यासाठी तिला दम दिला. भेदरलेल्या अवस्थेत ती घरी परतली. आईवडील कामावर गेल्यामुळे घरात कुणीही नव्हते. तिने भीतीपोटी आईवडीलांना या प्रकाराची माहिती दिली नाही. 3 नोव्हेंबरला दुपारी पीडित मुलगी फाईल आणण्यासाठी गुल्लूबाबाच्या दुकानात गेली. त्यावेळीही गुल्लूबाबाने लगेच तिला दुकानात ओढले. आतमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुन्हा तिला कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. मात्र, यावेळी तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. आईने मुलीसह जरीपटका पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी तक्रारीवरून गुल्लूबाबा गुरलवार याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करीत अटक केली.
……….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या