फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमहिंगणा बारमध्ये मारोती नव्वाने भावाला ‘सेटिंगसाठी’ नेले

हिंगणा बारमध्ये मारोती नव्वाने भावाला ‘सेटिंगसाठी’ नेले

Advertisements

ॲड.उके यांचा खुलासा: ‘राजकीय‘ आकसातून पोलिसांची कारवाई

‘खब-याचं’ नाव आता येणार पुढे:फडणवीस यांच्या याच नेटवर्कचा होता शोध

एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

नागपूर,ता.१६ फेब्रुवारी २०२२: हिंगणा पोलिस ठाण्यात २००८ साली खरुन्नीसा मोहम्मद समद या महिलेने एक तक्रार दाखल केली होती.यात तिच्या पतीच्या बंगल्याबाबत फसवणूकीचा गुन्हा त्यांनी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास राजदार असणारे धरमदास रामाणी,मो.समद,राजू भद्रे,राजू बेसा व इतर यांच्या विरुद्ध दाखल केली होता.पण तपास अधिकारी असणारे पोलीस निरीक्षक दिलीप गवई यांनी साक्षीदारांच्या बयाणात फेरफार केली.साक्षीदारांनी ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांंच्याकडे याबाबत तक्रार केली.दिलीप गवई यांनी साक्षीदारांचे खोटे बयाण तयार केल्याची तक्रार मिळाल्याने साक्षीदारांचे बयाण हे न्यायालयाकडून मंजूर करुन घेण्यात आले.त्यामुळे रमाणी यांनी तत्कालीन पालिस आयुक्त प्रवीण दीक्षीत यांच्याकडे तक्रार केली.यावर कारवाईचे आदेश दीक्षीत यांनी दिले मात्र ती तक्रार देखील खोटी सिद्ध झाली आणि यातूनच कलम १६४ अन्वये साक्षीदारांच्या न्यायालयात झालेल्या बयाणाची बाब माझ्या भावाला कळली.माझ्या भावाने तक्रार केल्यानंतर पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र यांच्या आदेशाने तो गुन्हा पुन्हा न्यायालयाच्या परवानगीने नव्याने सुरु करण्यात आला. मात्र अजनी पोलीस ठाण्यात मो.जफर यांच्या तक्रारीत हिंगणा पोलिस ठाण्याचा संदर्भ देऊन गुन्हा दाखल झाला,यावर शंका आल्याने ३१ फेब्रुवारी २०२२ रोजी मी माझ्या भावासोबत हिंगणा पोलिस ठाण्यात गेलो.मात्र २०१० साली ज्या गुन्ह्याचा तपास न्यायालयाच्या आदेशावर पुन्हा सुरु झाला त्याची पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर नोंदच नव्हती तसेच नवीन तपास अधिकारी व तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांचेही नाव अभिलेखात उपलब्ध नव्हते,परिणामी त्याच दिवशी माहितीच्या अधिकारात माहिती घेण्यासाठी व ती माहीती प्राप्त करण्यासाठी हिंगणा येथे मी माझ्या भावासह गेलो.

७ फेब्रुवारी रोजी माहितीच्या अधिकारात कळले त्या गुन्ह्याशी संबंधित कोणताही अभिलेख पोलीस ठाण्यात उपलब्ध नाही.परिणामी ९ फेब्रुवारी रोजी माझ्या भावाने अजनी तसेच हिंगणा पोलिस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार दिली.याच दरम्यान मारोती नव्वा याच्याकडे काही राजकीय व्यक्तींनी तसेच धरमदास रमाणी यांनी संपर्क साधला व उके यांना सर्व प्रकरणे वाढवू नको असा समज देण्यासाठी माझ्या भावासोबत प्रदीप उके याच्यासोबत, संपर्क साधण्याचा निरोप दिला.त्यांचे बोलणे माझ्या भावाला कळवण्यासाठी तसेच हिंगणा पोलीस ठाण्यातील गहाळ अभिलेखाच्या संभाव्य माहितीसाठीच माझा भाऊ मारोती नव्वासोबत हिंगणा येथे ५ फेब्रुवारी रोजी त्या बार मध्ये भेटला.परंतू त्याच्यावर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याप्रमाणे त्याने कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा केला नाही.

पोलिसांनी माझ्या भावाच्या विरोधात ज्या कलमा लावल्या आहेत त्यातील आरोप सपशेल खोटे आहेत.पोलिसांनी नोंदवलेल्या आरोपपत्रात ‘खब-याने’ दिलेल्या गुप्त माहितीतून हिंगणा तालुक्यातील मोंढा गावात असलेल्या हॉटेल आदित्यवर शनिवारी रात्री धाड टाकली असता ५ फेब्रुवरीच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये माझा भाऊ कुख्यात गुंड मारोती नव्वा याच्यासोबत बारमध्ये जाताना तसेच पोलिसांच्या दाव्यानुसार बार मधील महिला गायिकावर पैशे उधळत असताना आढळून आला असल्याचा उल्लेख असला तरी तो सपशेल खोटा आहे.पोलिसांकडे माझा भाऊ प्रदीप उके हा मारोती नव्वासोबत फक्त बारमध्ये जातानाचेच फूटेज आहेत कारण आतमध्ये असे काहीही घडले नाही ज्याची पोलिसांनी आरोपपत्रामध्ये नोंद केली आहे.माझ्या भावाचा पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही,असे ॲड.उके यांनी आज प्रेस क्लब येथील पत्र परिषदेत सांगितले.विशेष म्हणजे हिंगणा बारमधील घटना ५ फेब्रुवरी रोजी घडली असता खब-याने तेव्हाच मोबाईलवर पोलिसांना का सुचित केले नाही?त्यासाठी ९ फेब्रुवारीची वाट का बघितली?कारण हे सर्व प्रकरण ‘पेरण्यात’आले आहे कारण आम्ही हिंगणा पोलिस ठाण्यातील गहाळ झालेल्या अभिलेखाचा मागोवा घेत होतो,असा दावा ॲड.उके यांनी केला.

उलट पोलिसांनी आता या गुनह्यात ज्या गुप्तहेराचा उल्लेख केला आहे अश्‍या एका तरी गुप्तहेराचा मागाेवा आम्ही २०१४ पासूनच घेत आहोत ज्या वर्षी न्यायमूर्ती लोया यांचा नागपूरात संशयास्पद मृत्यू झाला.याप्रसंगी ॲड.उके यांनी महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाचे ते पत्र सादर केले ज्यात न्यायमूर्ती लोया हे नागपूरात, मुंबई येथून न्यायमूर्ती विनय जोशी यांच्यासोबत शासकीय कामासाठी येणार असून ते ३० नोव्हेंबर २०१४ ला पहाटे पासून तर १ डिसेंबर २०१४ च्या सकाळी ७ वाजेपर्यंत रविभवन येथे वाास्तव्य करणार होते तसेच या पत्रात त्यांच्यासाठी एक व्हिआयपी वातानुकूलीत सूट दोन कॉट असलेला आरक्ष्त करण्याची विनंती करण्यात आली होती.हे पत्र महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागातर्फे रवि भवनच्या व्यवस्थापक तसेच उप जिल्हाधिकारी(राजशिष्टाचार)यांना पाठवण्यात आले होते.

विशेष म्हणजे याच प्रकरणाच्या संदर्भात रविभवन येथील कर्मचारी तिलक नारायण चंद्रशेखर याचे पोलिस निरीक्षक सुनील बोंडे यांनी देखील बयाण नोंदवले होते ज्यात ३० नोव्हेंबर २०१४ रोजी हायकोर्ट नागपूर येथील रजिस्ट्रार यांच्याकडून रविभवातील एकूण ५ सूट आरक्ष्त करण्यात आले होते,सावंत या आरक्षण लिपिकाने ते केले होते.या दिवशी मी सकाळी ७ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत ड्यूटीवर होतो मात्र माझ्या ड्यूटीच्या वेळेपर्यंत या सूटमध्ये राहण्यास कोणीही आले नव्हते.रविभवन येथील २,३,५,१० व २० अश्‍या ५ सूटमध्ये येणा-या अधिका-यांच्या मदतीसाठी उच्च न्यायालयातूनच कर्मचारी नेमण्यात आले होते.यानंतर दि.१ डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी मी माझ्या कर्तव्यावर उपस्थित झालो व रजिस्टरची पाहणी केली असता रजिस्टर नोंदणीप्रमाणे उच्च न्यायालयातर्फे आरक्ष्त केलेल्या सूट पैकी सूट क्र १० मध्ये रजिस्ट्रार एस.कुळकर्णी,हायकोर्ट बॉम्बे तसेच सूट क्र. २० मध्ये श्रीमती फणसाळकर जोशी रजिस्ट्रार,हायकोर्ट बॉम्बे हेच फक्त थांबले असल्याची नोंद आहे.बाकी मुख्य आरक्षण रद्द करण्यात आले असल्याचे आपल्या बयाणात तिलक नारायण चंद्रशेखर यांनी नोंदवले आहे.

याचा अर्थ न्यायमूर्ती लोया हे नागपूरात कोणाच्या तरी खासगी लग्नात आले नसून शासकीय कामासाठी आले होते हे या पत्राद्वारे स्पष्ट होते,याशिवाय त्यांचा मृत्यू हा रविभवनमध्ये झाला नसून दूसरीकडे झाला होता,त्यांना देण्यात आलेले विष हे जहाल होते हे नंतर लक्षात आले नाही तर त्यांना स्लेा पॉयझनच देण्यात येणार होते त्यामुळे न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हार्ट अटैकने आला व तो रविभवनमध्ये आला हे कुठेही सिद्ध होत नाही,हे दोन्ही उपरोक्त महत्वाचे कागदपत्रे फडणवीस सरकारच्या दोन्ही निष्णात वकीलांनी सर्वोच्च न्यायालयात सादरच केली नाही,असा आरोप ॲड.उके यांनी याप्रसंगी लावला.

हरीश साळवे तसेच मुकुल रोहतगी यांना फडणवीस सरकारने हा खटला लढण्यासाठी ११ कोटी व काही लाखांची रक्कम देय केली असल्याचे उके यांनी सांगितले.हा पैसा शासनाच्या तिजोरीतला होता.न्यायमूर्ती लोया हे जर हार्टअटैकने मृत्यू पावले असते तर फडणवीस सरकारतर्फे निष्णात सरकारी वकील ही हा खटला चालवू शकले असते.कोट्यावधी रुपये घेणारे एवढे मोठे वकील नेमण्याचा फडणवीस यांचा काय उद्देश्‍य होता?असा सवाल उके यांनी केला.

या सर्व षडयंत्राचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे मागोवा घेत होते मात्र षडयंत्र करुन त्यांना तुरुंगात डांबण्यात आले.फडणवीस यांचे गुप्तहेर हे सर्वदूर बसले आहेत.प्रशासकीय अधिका-यांपासून तर न्यायालयापर्यंत त्यांचे हे गुप्तहेर सर्वदूर सर्व शासकीय व्यवस्थेत आहेत,हिंगणा बार प्रकरणामध्ये निदान एक तरी ‘खब-या’किवा गुप्तहेर आता समोर आला आहे कारण न्यायालयात येऊन त्याला साक्ष नोंदवावी लागेल त्यावेळी तो गुप्तहेर समोर येईल व त्याची ओळख समोर येताच फडणवीस यांची नागपूरातील गुप्तहेरांची साखळीच दृष्टिक्षेपात येईल,असा दावा याप्रसंगी ॲड.उके यांनी केला.

याप्रसंगी ॲड.उके यांनी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत विस्तृत उहापोह केला.नुकतेच त्यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा ‘मोदी‘माध्यमांसमोर आणला,माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या पत्नीचे सख्खे मावस भाऊ सूूूूूरज तातोडे यांना माघ्यमांसमोर आणून बावकुळे यांच्या भ्रष्ट कारभाराचा पाढाच वाचला,कश्‍या प्रकारे त्यांना उक्त पत्र परिषदेनंतर पोलिसांकरवी अटक करण्यात आली,१४ वर्षांपूर्वीच्या ज्या गुन्ह्यात न्यायालयाचा निकाल ही लागून झाला त्याच गुन्ह्यात फसवण्यासाठी अश्‍या महिलेकडून गुन्हा नोंदवण्यात आला जी महिलाच त्या गुन्हात आरोपी होती,अश्‍या अनेक कायदेशीर बाबींचा उहापोह उके यांनी केला.या सर्व प्रकरणांबाबत बोलण्यासाठीच माझ्या भावाला मारोती नव्वाने बार मध्ये नेले होते,असा दावा उके यांनी यावेळी केला.

फडणवीस यांचा महापोर्टल घोटाळा असो,नॅशनल कँसर रुग्णालय घोटाळा असो,एक्सीस बँक घोटाळा असो किवा त्यांच्या गुर्गे मुन्ना यादव करवी सविता तनेजा फसवणूकीचा गुन्हा असो फडणवीस यांच्या विरोधातील सर्व न्यायालयीन खटले आता अंतिम टप्प्यात आले असल्यानेच मी त्यात आणखी भर टाकू नये यासाठी माझ्या भावाकरवी निरोप देण्यासाठी हिंगणा बार येथील ती भेट घडली.

फडणवीस यांचे गुप्तहेराचे जाळे असेच पुणे आणि मुंबईत देखील आहे आणि हे सर्व हेर शासकीय नोक-यांमध्ये मोठ्या पदावर बसले असल्याचा दावा उके यांनी केला.

शासनाने एसआयटीमार्फे फडणवीस यांचे कोणकोणते गुप्तहेर शासकीय पदावर आहेत याचा शोघ घ्यावा व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ॲड.उके यांनी याप्रसंगी केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या