

कोरोनासंदर्भातील आदेशाचे उल्लंघन
नागपूर दि 19: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपुरातील हॉटेल व पानठेले बंद करण्याचे आदेश प्रशासनाने आदेश जारी केले असताना या आदेशाचे उलंघन करणाऱ्या हल्दीराम व सुजल सावजी हॉटेलची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष तपासणी करुन कडक कारवाईचे निर्देश दिले.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ भूषण कुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, आदी उपस्थित होते. सदर भागातील हल्दीराम हे हॉटेल आज बंदी असताना सुरु आल्याचे त्यांनी दिवसभर ग्राहकांना पुरविलेल्या सेवेवरून सिद्ध झाले, तसेच बजाजनगर तेथील सुजल सावजी रात्री सुरू होते किचनमध्ये अन्न तयार आल्याचे आढळून आले, त्यासोबतच औषधांच्या दुकानाची सुद्धा त्यांनी तपाणी केली, मास्क, सॅनिटायझरचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश गृहमंत्री देशमुख यांनी दिले.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने हॉटेल्स,पब, पानठेले,जिम इत्यादी सार्वजनिक स्थाने बंद ठेवण्याचे आदेश बुधवारी सायंकाळी दिले होते मात्र गुरुवारी नागपूरात काही ठिकाणी शासनाच्या या आदेशाची सर्रास पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आले.
गुरुवारी सायंकाळी रवी भवनात करोना विषयी महत्वाची पत्र परिषद गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायंकाळी ६ वाजता घेतली त्यात देखील शहरातील बजाज नगर येथील सुजल सावजी हॉटेल सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री यांनी या दोन्ही हॉटेल्सवर रात्री सव्वा नऊ वाजता अचानक छापा मारला.
हे हॉटेल्स दिवसभर सुरू होते हे त्यांनी जब्त केलेल्या बिल्स यावरून स्पष्ट झाले. यासंबंधी व्ययवस्थापकला जाब विचारला असता मालकालाही चांगलाच घाम फुटला.
फक्त व्यावसायिक स्वार्थ बागळुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणाऱ्या अश्या व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्याचे त्यांनी निर्देश दिले.




आमचे चॅनल subscribe करा
