फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमहमाम मे सब नंगे.....

हमाम मे सब नंगे…..

Advertisements


ब्लॅकमेलर पत्रकार,बारप्रेमी प्रदीप उके,‘मंत्री मिडीयाची’ अजनीवनावर ’योगायोग’ बातमी:विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ‘दगडी’ भिंतीवर वर्धानिवासी फोडतोय डोकं

नागपूर,ता.१४ फेब्रुवारी २०२२: महाराष्ट्राच्या मानबिंदूतील त्या पत्रकाराला सगळेच‘मामा’म्हणतात.शाब्दिक अर्थ घेतला तर मामा म्हणजे जन्मदात्रीचा भाऊ मात्र लौकिक अर्थाने या शब्दाचा अर्थ इतरांना ‘मामा’बनवणे असा ही होत असतो.याचीच प्रतिची मानबिंदूतील या पत्रकाराने नागपूरकरांना दिली.एकमेव हाच नव्हे तर यांची ‘टोळी‘च शहरात कार्यरत आहे.या मामाविषयी बजाज नगर पोलिस ठाण्यात एका महिलेने नुकतीच तक्रार नोंदवली आहे.या तक्रारीत अनेक गंभीर अारोप या पत्रकाराविषयी लावण्यात आले असून ती तक्रार वाचल्यानंतर पत्रकारितेसारख्या एवढ्या पवित्र व तत्वनिष्ठ व्यवसायात अश्‍या मनोवृत्तीची माणसे शिरल्यास काय होतं व काय-काय होऊ शकतं?याचा प्रत्यय घडतो.

घटना आहे ११ फेब्रुवारी २०२२ ची अर्थात दोनच दिवसांपूर्वीची.बजाज नगर येथील सेंट्रल बाजार रोडवर एका दाम्पत्याचे त्यांच्या पैतृक जागेवरील एक रेस्टारेंट आहे.याच ठिकाणी लग्नाचा लॉन देखील आहे.हे रेस्टारेंट चालविण्यासाठीच्या सर्व कायदेशीर बाबी मालक असणा-या महिलेने पूर्ण केल्या आहेत.मात्र मानबिंदूतील हा पत्रकार आपल्या पदाचा,आपल्या पत्रकारितेचा गैरवापर करीत गेल्या दोन वर्षांपासून या रेस्टारेंट मालकांना मानसिक त्रास देत आहे.वेळी अवेळी गुंड प्रवृत्तीची माणसे रेस्टारेंटमध्ये घेऊन येणे,फूकट खाने-पिने,हजारो रुपयांची बिले न चुकवता निघून जाने,ज्यांच्यावर गुन्हा नोंदवला जाणार आहे आणि ज्यांच्यावर गुन्हे नोंदवले अश्‍या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना या ठिकाणी आणून ‘पैश्‍यांच्या घेवाण-देवाण’बाबत बोलणी करने,हे ही नसे थोडके तर दर बुधवारी त्याच्या विकली ऑफ अर्थात सुटीच्या दिवशी आपल्या बायको,मुलांना या रेस्टोरेंटमध्ये फूकट खाऊ पिऊ घालणे,एवढंच नव्हे तर या पत्रकाराची मजल आपल्या मुलांच्या कॉलेजच्या मित्रांना देखील या ठिकाणी फूकट खाऊ-पिऊ घालण्यापर्यंत गेली.या रेस्टारेंटमध्ये नागपूरातील सभ्य नागरिक कुटुंबासह जेवायला येतात.या पत्रकाराची नजर सुंदर महिलेवर पडताच रेस्टारेंट मालकाला सांगून त्या महिलेजवळ टेबल लावायला सांगण्यात येऊ लागले.आधीच करोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे या कुटुंबाला आर्थिक भार सोसणे अशक्यप्राय होत असताना,हा फूकटा पत्रकार आपल्या पत्रकारितेचा फूकाचा रुबाब त्या रेस्टारेंट मालक असणा-या महिलेच्या पतीवर दाखवत होता.

गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या या दादागिरीमुळे हे नवरा-बायको अक्षरश: त्रस्त झाले होते.परवा ११ फेब्रुवरी रोजी देखील हा महान पत्रकार, गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांना घेऊन या रेस्टारेंटमध्ये बसला.खाऊन-पिऊन झाल्यावर निघून जाऊ लागला.येथील मॅनेजरने त्याला बिलाचे भूगतान करुन जाण्याची विनंती केली.शक्य असेल तेवढे तरी द्या,असे मॅनेजर बोलला,यावर या महान पत्रकाराने ’ये बिल अपने बाप को जाकर दे दे’अशी अरेरावी केली,मॅनेजर मालकाजवळ येऊन पत्रकाराच्या या असभ्य भाषेविषयी सांगू लागला.मालक ही या पत्रकाराशी बोलू लागला,आपल्या अडचणी सांगू लागला मात्र पत्रकार असल्याची मगरुरी दिवस रात्र या महान पत्रकाराच्या डोक्यावर चढून असल्याने, त्याने बिल फेकून दिले आणि मालकालाच ‘तेरा हॉटेल कैसा चलता है देखता हूं‘अशी धमकी देत निघून गेला.

यानंतर स्कॉटलॅण्ड यार्डच्या पोलिसांनाही लाजवेल एवढ्या गतीने नागपूरच्या काही पोलिसांनी या रेस्टोरेंटवर धडक दिली.संपूर्ण हॉटेलची तपासणी केली.पत्रकाराच्या एका फोनवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे रेस्टारेंटचे नाव खराब झाले,आधीच लॉकडाऊनमुळे डबघाईस आलेल्या या रेस्टारेंटच्या मालकीणीने मग सरळ बजाज नगरचे पोलिस ठाणे गाठले व या पत्रकाराची नावानिशी ‘लांबलचक’अशी तक्रार नोंदवली.

या पत्रकाराच्या टोळीतील एका पत्रकाराने लगेच दुस-या दिवशी आपल्या पेशाशी किंबहूना सोबत पित असलेल्या दारुशी‘ईमान’राखत या रेस्टारेंटच्या विरोधातच ’बातमी’छापली! कश्‍याप्रकारे या रेस्टारेंटमध्ये अवैधरित्या दारुची विक्री होते,एकीकडे शहरातील बार मालक लाखो रुपये परमिटचे भरतात आणि हा रेस्टारेंट मालक खुले आम दारु ग्राहकांना सप्लाय करतो.रात्री उशिरा ११.३० पर्यंत रेस्टारेंट उघडे ठेवतो,या रेस्टारेंटमध्ये गँगस्टर येऊन जेवतात वगैरे वगैरे……!

इमानदारीने आपला व्यवसाय चालविणा-यांना या पत्रकाराच्या अश्‍या कृत्यामुळे होत असणारा मानसिक छळ असहनीय झाल्याने अखेर या रेस्टारेंट मालकांनी बजाज नगर पोलिस ठाण्यात,पोलिस आयुक्तांकडे आणि या पत्रकराच्या मालकाकडेच रितसर तक्रार केली.पोलिस आयुक्तांनी मात्र या रेस्टोरेंटच्या मालकीणीला व तिच्या पतीला आश्‍वासन देत,तुम्हाला कोणीही त्रास देत असल्यास आम्हाला सांगा,आम्ही येथे बसलो आहोत,असे आश्‍वासित केले तर या रेस्टारेंट मालकांविषयी तक्रार करु बघणा-या या पत्रकारालाच पोलिस आयुक्तांनी ‘तुम्हाला जे काही सांगायचे आहे बजाज नगर पोलिसांना सांगा‘असा सल्ला दिला.

या रेस्टारेंट मालकाने या पत्रकरासोबत कोणकोणते नागपूरातील ‘फूकटचंद’पत्रकार त्यांच्या रेस्टारेंटमध्ये येऊन दादागिरी करुन खाऊन-पिऊन जातात त्याची यादीच ‘सत्ताधीश’कडे दिली आहे.यात ‘नागपूर’चं नाव लाऊन पत्रकारितेच्या नावाने ब्लॅकमेलिंग करणारे महाभागही यात आहेत,हे विशेष! टून्न झालेले या पत्रकारांचे सीसीटीव्ही फूटेज देखील ‘सत्ताधीश’कडे उपलब्ध आहेत.

मानबिंदूच्या मालकाने पत्रकारिता करण्यासाठीचा दिलेला भरमसाठ पगार ही आपल्या अय्याशीसमोर ज्यांना अपूरा वाटतो तेव्हा पत्रकारितेच्या आड लपून ब्लॅकमेलिंगच्या मार्गाने रग्गड पैसा कमविणा-या या महाहरामखोरांना आपण कोणत्या नोबेल प्रोफेशनशी गद्दारी करतोय याचे भान ही राहत नाही. हे रेस्टारेंट मालक या वृत्तीचे दूर्देवी उदाहरण आहेत.एखाद्या पत्रकराची नावानिशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होते तेव्हा पत्रकारितेला लागलेली ही कीड किती खोलवर रुजली आहे याची प्रचिती येते. करोना सारख्या महामारीच्या त्रासदीतून पोळलेले इतर पत्रकार बघून देखील हे असे ब्लॅकमेलर पत्रकार आपले वर्तन सुधरवू शकले नाही तर जगातील कोणतीच महामारी,अगदी करोनापेक्षाही महाभयंकर महामारी देखील यांना सुधरवू शकणार नाहीत,असेच आता म्हणावे लागेल.

उके यांचे प्रिय बारप्रेमी बंधू-
उठसूट इतरांना लक्ष करणारे व त्यांचे राजकीय चिरहरण करण्यासाठी पत्र परिषदा घेणारे ॲड.सतीश उके यांचेच प्रिय बंधू हे हिंगणातील एका बारमध्ये एका बार गायिकेच्या अंगावर लक्षमी उधळत असल्याची माहिती समोर आली आहे.

हिंगणा तालुक्यातील मोंढा गावात असलेल्या हॉटेल आदित्यवर गुन्हे प्रगटीकरण पथक व हिंगणा पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला.यात सीसीटीव्ही डिव्हिआर तपासणी करुन ५ फेब्रुवारीला हॉटेलमध्ये सुरु असलेल्या गाण्यावर पैसे उधळणा-या ग्राहकांमध्ये ॲड.सतीश उके यांचे बंधू प्रदीप उके हे देखील आढळून आले.शनिवार दि. ५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजून २२ मिनिटाच्या सुमारास महिला गाणे म्हणत असताना त्यांना गाणे म्हण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी चार ग्राहक पैसे उधळताना आढळले.हिंगणा पोलिसांनी हॉटेल संचालक,व्यवस्थापक व राजेश पांडे,गिरीश कनोजिया,प्रदीप उके व कुख्यात गुंड मोराती नव्वा या चार ग्राहकांवर गुन्हा दाखल करुन व्यवस्थापक निलेश सिंग याला अटक केली आहे.आता ॲड.सतीश उके हे आपली ‘नीतीमत्ता’गहाण ठेऊन कायदेशीर बाबी पूर्ण करुन आपल्या भावाला या तक्रारीपासून सोडवण्यासाठी आपला संपूर्ण अनुभव पणाला लावतील याच शंकाच नाही.आपल्या ‘संस्कारक्षम’ भावाला घेऊन ते आज दिवसभर न्यायालयात चकरा मारत असल्याचे अनेकांनी बघितले.परिणामी इतरांचे संपूर्ण वस्त्रहरण करताना आपल्याही घरात ‘गुदडी का लाल’आहे हे ते सोयीस्करपणे विसरुन जातात.ॲड.उके यांचे हे सर्वाधिक लाडके बंधू पोलिस विभागातून हकालपट्टी झालेले असल्याचे देखील ऐकिवात आहे.आपल्या एवढ्या ‘कर्तबगार’भावाला कायद्याचे संरक्षण देण्यासाठी ॲड.उके हे आपली प्रतिष्ठाच जेव्हा दाव वर लावतात तेव्हा खरंच त्यांची कीव येते,नैतिकतेच्या मुद्दावर ते सपशेल अपयशी ठरण्यावर शिक्कामोर्तब ही होतो.इतरांना राजकीय हमामात नंगं करताना त्यांच्या भावाचे कृत्य हे देखील ‘हमाम मे सब नंगे‘ असल्याचे द्योतक नाही का?

लाचखोरीसाठी विभागीय आयुक्तांचे आदेश ही धाब्यावर-
या भूतळावरील असाच एक दूर्देवी जीव म्हणजे वर्धेचे संदीप पवार.नागपूरातील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात आपल्या हक्काचा आदेश घेण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ते चकरा मारत आहे.विभागीय आयुक्तांनी त्यांची केस वाचून आदेश देखील दिला आहे.त्या आदेशाचे देखील पैसे संदीप पवार यांनी भरले आहेत मात्र विभागीय आयुक्त कार्यालयातील एक कर्मचारी लाचखोरीसाठी या भल्या माणसाला मरणयातना देत असल्याची वेदना आज त्यांनी माध्यमांसमोर मांडली.दोन लाखांची लाच तो कर्मचारी मागत आहे.विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्या आदेशालाही तो कर्मचारी जुमानत नाही,हे बघून भ्रष्टाचाराने बरबरटलेली ही प्रशासकीय व्यवस्था गेल्या ७० वर्षात किती मुजोर झाली आहे,किती पोखरली आहे,किती किडली किती सडली आहे,याची प्रचिती घडते.संदीप पवार यांना लग्नाच्या ८ वर्षांनी मूल झालं होतं.या केसमुळे ते पुरते आर्थिकरित्या डबघाईस आले असल्याने आपल्या तीन वर्षाच्या मुलावर उपचार करण्यासाठी देखील त्यांच्या जवळ पैसा नव्हता,उपचारा अभावी त्या तान्हूल्याचा मृत्यू झाला,वर्धेवरुन येण्यासाठी दर वेळी त्यांना भुर्दंड बसतो,मात्र गेंड्याची कातडी पांधरणारे मुर्दाड प्रशासन यांना त्याचे कोणतेही सोयरसूतक वाटत नाही.‘सत्ताधीश’ने संदीप पवार यांनी व्यथा आपल्या कॅम-यात अशी बंदिस्त केली.

पर्यावरणमंत्री यांचे नागपूरात आगमन व ‘मंत्री मिडीयाची’ ‘योगायोग’बातमी-
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे रविवारी नागपूरात आगम झाले आणि त्याच दिवशी मंत्री मिडीयात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची एक बातमी प्रसिद्ध झाली’नागपूरकरांनाच अजनीवन प्रकल्प नको असेल तर काय करणार?’हा योगायोग अचानक जुळून आला नसून बातमी हेतूपुरस्सर पेरण्यात आली असल्याचा संताप नागपूरकर पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला.एवढंच नव्हे तर ही बातमी आदित्य ठाकरे यांना वाचण्यासाठी देखील देण्यात आली त्यामुळेच त्यांनी आज विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात माध्यमांना प्रतिक्रिया देताना गडकरी यांच्या या बातमीचाही उल्लेख केला! मूळात नागपूरकरांनी अजनी इंटर मॉडेल स्टेशनला विरोध कधीही केला नाही तर त्यांची आग्रही मागणी ही पर्यावरणाला हानि न पोहोचवता शाश्‍वत विकासासाठीची आहे.देशभरात इंटर मॉडेल स्टेशनसाठी एकूण १५ प्रस्ताव आले होते.त्यातील फक्त नागपूर व वाराणसीचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या वाराणसीत इंटर मॉडेल स्टेशनसाठी फक्त ३५ एकर जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे,मग नागपूरात या प्रकल्पासाठी ४९६ एकर जमीन का हवी आहे?जगभरात असे इंटर मॉडेल स्टेशन फक्त ९६ एकरमध्ये बांधण्यात आले मग नागपूरातच जवळपास ४० हजार झाडे नामशेष करुन इंटर मॉडल स्टेशनचा आग्रह का?असा प्रश्‍न पर्यावरणवादी विचारत आहेत.

येणारी पिढी ही जेव्हा प्राणवायूसाठी तडफडेल तेव्हा ती कधीही २०२२ च्या राज्यकर्ताना,धोरण निर्मार्त्यांना आणि त्यांना साथ देणा-या मिडीयाला माफ करणार नाही,असे मार्मिक विधान एका पर्यावरणप्रेमीने केले आहे.आम्हाला पुढील पिढीचे आरोपी व्हायचे नाही त्यामुळेच अजनीवनसाठी आम्ही न्यायालयात गेलो,अखेरपर्यंत लढू मात्र या शहरासाठी फूफ्फसाचे काम करणा-या ४० हजार हेरिटेज झाडांची कत्तल होऊ देणार नसल्याचा निर्धार ते व्यक्त करतात.

हा प्रकल्प विकासाचा नसून येणा-या पिढीच्या प्राणवायूच्या विनाशाचा आहे.हे घनदाट वन नष्ट झाल्यास पर्यावरणाचा समतोल ढासळेल,येणा-या काही दशकताच नागपूरचे तापमान ४७ वरुन ५० डिग्री सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.आधीच मेट्रो,उड्डाणपुले आणि सिमेंट रोडसाठी हजारो झाडांचा बळी या शहरात गेला आहे.आता येणा-या पिढीसाठी जतन करुन ठेवलेल्या वृक्ष संपदेचा विनाश अशाश्‍वत प्रकल्पासाठी होऊ देणार नाही,ही आमची भूमिका, ही कोण्या राजकीय नेत्यांच्या विरोधातील नाही किवा विकास किवा प्रकल्पाच्याही विरोधात नाही,या प्रकल्पात ४९६ एकर जमीन संपादीत करुन त्यावर कमर्शियल बांधकामे केली जाणार आहे,हे सर्व कंत्राटदारांचे भले करण्यासाठीच घडणार असल्याने आमचा या विनाशाला विरोध असल्याचे पर्यावरणप्रेमी सांगतात.

तरी देखील नागपूरातील ‘मंत्री मिडीया’हा कोट्यावधीच्या जाहीराती मिळत असल्यामुळे सत्य लपवून असे अचूक टायमिंग साधत असे ‘सोयीस्कर’ वृत्त प्रसिद्ध करतात तेव्हा त्या माध्यमाची विश्‍वासहर्ता आमच्या नजरेत काय उरते?असा उद्वविग्न सवाल ते करतात.

थोडक्यात,राजकारण असो,प्रशासन असो,पत्रकारिता असो किवा वकीली असो ’हमाम मे सब नंगे’याची प्रचिती देणा-या या उपरोक्त घटना आहेत,असेच आता म्हणावे लागेल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या