फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजहनुमान नगरातील टँकरचं पाणी जातं कुठे?माजी आमदारांना पडला प्रश्‍न

हनुमान नगरातील टँकरचं पाणी जातं कुठे?माजी आमदारांना पडला प्रश्‍न

Advertisements

मनपा आयुक्तांकडे केली तक्रार

नागपूर,ता. २४ फेब्रुवरी: प्रभाग क्र.३४ हनुमान नगर झोन क्र.३ अंतर्गत येणा-या अनेक वस्त्यांमध्ये अमृत योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून जल वाहिन्या टाकण्यात आल्या मात्र तरी देखील अनेक वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे त्यातही दररोज येथील जलकुंभावरुन पाच फे-या टँकर पाणी भरल्या जातं मात्र येथील वस्त्यांना फक्त दोनच फे-या पाणी मिळत आहे,तीन फे-यामधील टँकरचं पाणी जातं कुठे?या टँकर लॉबीचा पर्दाफाश करावा असे निवेदन दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांना दिले .

कोहळे हे महापालिकेत जलप्रदाय समितीचे सभापती तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे विश्‍वस्त ही राहीले आहेत.महापालिका आयुक्तांकडे त्यांनी टँकर घोटाळ्याच्या चौकशी मागणी देखील केली आहे.हनुमाननगर झोन अंतर्गत येणा-या वैष्णवमाता नग,राधाकृष्ण नगर,च्रकपाणी नगर,गजानन नगर,वृंदावन कॉलनी,श्‍याम नगर,मेहरधाम,सिद्धेश्‍वर नगर,भगवती नगर,ताजुद्दीन बाबा नगर,विठ्ठल रगर येथे गेल्या दोन वर्षांपासून नागपूर सुधार प्रन्यासतर्फे अमृत योजनेअंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे टाकले आहे.या वस्त्यांमध्ये ७० टक्के जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे.

लोकसंख्येप्रमाणे महानगरपालिकेकडे पाण्याचा पुरेसा साठा ही उपलब्ध आहे,असे असतानाही काही पुढा-यांच्या अधिपत्याखाली चालणा-या टँकर चालकांच्या ‘भल्यासाठी’ महानगरपालिकेच्या वतीने पाणी पुरवठा नळ वाहीन्यांद्वारे केला जात नाही,अपूर्ण कामे ही पूर्ण केली जात नसल्याचा आरोप करीत या मागे कोणा-कोणाचे ‘अर्थसंबंध’जुळले आहेत याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली.
माझ्या स्वत:च्या घरी २५ मिनिटांपेक्ष्ा जास्त वेळ पाणी येत नसल्याची त्यांनी खास ‘सत्ताधीश’कडे माहीती दिली.या भागात दोन टाक्यांची मंजूरी मिळूनसुद्धा टाक्या का बांधण्यात येत नाही?ओंकार नगरला नवीन टाकी झाल्यामुळे अर्ध्या झोनला आता याच टाकीतून पाणी उपलब्ध होत आहे मात्र जे पाणी वाचले ते मग इतर वस्त्यांना का उपलब्ध होत नाही?वाचलेले पाणी ग्रामीण भागात विकल्या जात आहे का?अशी शंका त्यांनी उपस्थित केली.

मनपाचे प्रशासन लोकसंख्या वाढली असल्याचे कपोलकल्पीत कारण सांगत आहेत मात्र आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी अधिकारी श्‍वेता बॅनर्जी यांना मग पाणीचा कर जास्त प्रमाणात का मिळत नाही?असा अडचणीत आनणारा प्रश्‍न केला.यावर ३ दिवसात अहवाल सादर करण्याचे आयुक्तांनी बॅनर्जी यांना आदेश दिले असल्याचे कोहळे यांनी सांगितले.

मनपाच्या २४ बाय ७ या महत्वाकांक्ष्ी योजनेला सुरुंग लावणारे काही ‘झारीतलेच शुक्राचार्य’ असल्याचे त्यांनी सांगितले.मनपाच्या प्रशासकीय अधिका-यांना सर्वसामान्य नागरिकांसाठी असणा-या या योजनेचे महत्व याची जाणीव नाही तर मनपातील सत्ताधारी यांना या योजनेविषयी आस्था नसल्याचा जळजळीत आरोप काेहळे यांनी केला.

१९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात जी प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली आहे त्यात काही बदल झाला असे मला वाटत नसल्याचा संताप ही त्यांनी व्यक्त केला.मी या भागातील नगरसेवक व आमदार असताना येथील नागरिकांना दर दोन दिवसांनी टँकरने पाणी उपलब्ध होत असे आता दर १३ दिवसांनी पाणी उपलब्ध केल्या जात आहे.विशेष म्हणजे पाण्याचे बिल मात्र तितकंच येतंय!
दक्षिण नागपूरसाठी मंजूर झालेल्या जोपर्यंत ७-८ टक्यांचे बांधकाम होत नाही तोपर्यंत या भागातील पाण्याचा प्रश्‍न सुटणार नाही,ही सर्वस्वी महानगरपालिकेची जवाबदारी आहे.पदाधिका-यांनी प्रशासनाकडून ही योजना यशस्वीपणे राबवून घेतली पाहीजे,असा सल्ला ही त्यांनी दिला.

राज्य शासनाकडून सक्करदरा तलावाच्या संवर्धनासाठी मी २०१९ मध्ये ३० कोटी रु.मंजूर करुन घेतले होते,त्यातील १० कोटी रु.देऊन सुद्धा आज सक्करदरा तलावाची काय अवस्था आहे?अशी पुश्‍ती ही त्यांनी जोडली.

मनपा आयुक्तांनी टँकरच्या फे-या व त्याचे अर्थकारण,त्यात गुंतलेले महापालिकेचे कर्मचारी,टँकर चालक यांची लॉबी याची सविस्तर चौकशी करावी,अशी मागणी त्यांनी केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या