फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeसांस्कृतिक / मनोरंजनहजारो भक्तांनी केले पुरुषसुक्त आणि श्रीसुक्त पठण 

हजारो भक्तांनी केले पुरुषसुक्त आणि श्रीसुक्त पठण 

Advertisements
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे ‘जागर भक्तीचा’ या अध्यात्मिक मालिकेअंतर्गत समापन कार्यक्रम संपन्न 

नागपूर, १७ नोव्हेंबर २०२५: खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे ‘जागर भक्तीचा’ या अध्यात्मिक मालिकेचा आज ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर आज पुरुषसुक्त आणि श्रीसुक्त पठणाने समारोप झाला.
कण्‍वाश्रम आणि देवी अहिल्या मंदिरच्या सर्व भगिनींनी  अत्यंत लयबद्ध पद्धतीने सुरुवातीला पुरुष सूक्त आणि त्यानंतर श्री सूक्त सादर केले. ‘अंबे अंबे जगदंबे’ चा जयघोष सर्वत्र निनादला.  हजारो भक्तांनी त्यांना उत्तम साथ दिली.
श्रीसूक्तम् ही लक्ष्मीची उपासना असून ऋग्वेदामधले संस्कृत भाषेतले हे स्तोत्र आहे. देवी लक्ष्मीची आराधना करून सर्वांसाठी सुख ,समाधान आणि समृद्धी  सर्वांच्या जीवनात येण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तत्पूर्वी, संस्कार भारतीच्या अध्‍यक्षा कांचनताई गडकरी,  साधनाताई कुलकर्णी, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सत्संग प्रमुख आणि प्रचारक दादा वेदक, अखिल भारतीय संयोजिका, धर्म संस्कृती शिक्षण विभाग विश्व मांगल्य सभेच्या डॉ राधा कमाविसदार, खासदार सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. दीपक खिरवडकर, अविनाश घुशे, बाळासाहेब कुलकर्णी  या मान्यवरांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली. मान्‍यवरांचे स्वागत विवेक गर्गे,  सुजाता काथोटे, निरजा पाटील  यांनी केले.
सर्व दिवस या आयोजनात सहकार्य केल्याबद्दल सहजयोगाच्या मनीषा ढेंगळे तसेच, रंजना जवंजाळ, माई खांडेकर यांचे कांचनताई गडकरी यांच्‍याह हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार बाळासाहेब कुलकर्णी यांनी मानले.
……………………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या