

नागपूर, १६ ऑगस्ट : सोहम बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून रविवारी १५ ऑगस्ट रोजी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता नि:स्वार्थपणे जनसेवा करणा-या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम हनुमान मंदिर, सोनेगाव जुनी वस्ती, सोनेगाव, खामला रोड येथे पार पडला.
सोहम बहुउद्देशीय संस्था मागील सहा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून युवक व महिलांचे सबलीकरण, रोजगार निर्मिती, प्रशिक्षण तसेच शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात काम करते. सत्कार कार्यक्रमाला रस्ते सुरक्षा समितीचे सदस्य चंद्रशेखर मोहिते, पीएसआय अंकुश वाळके, सामाजिक कार्यकर्ते बंडभाऊ साठे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक, समुपदेशक संदीप झंवर, पोलिस कॉन्स्टेबल विजय काकडे व मनिष पलेरिया यांचा यावेळी प्रमाणपत्र व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष रोशन इंगळे, सचिव श्रुती देशपांडे, गौरव सोनुले, योगेश काकडे, पूजा नायडू, प्रवीण इंगळे, पियुष चरपे, रितेश बकाल, कोमल मोहिते, महेश दुर्वे, रितीक शेंडे, विशाल उईके यांची यावेळी उपस्थिती होती. सूत्रसंचालन रोहित वानखेडे यांनी केले. त्यांनी ए मेरे वतन के लोगों हे गीत सादर केले. आभार प्रदर्शन श्रुती देशपांडे यांनी केले.




आमचे चॅनल subscribe करा
