

भाजपकडून हुद्द सत्कार
नागपूर,ता.७ डिसेंबर: स्वातंत्र्य संग्राम सैनिक राजा उर्फ प्रभाकर लक्ष्मण देशपांडे यांचे नुकतेच ४ डिसेंबर २०२० रोजी १०० व्या वर्षात पदार्पण झाले.याप्रसंगी भारतीय जनता पक्ष्ाच्या पदाधिका-यांकडून त्यांच्या राहत्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
देशपांडे यांचा जन्म त्यांच्या राहत्या घरी धंतोली येथे झाला.वयाच्या ७ व्या वर्षीच त्यांचे मातृ-पितृ छत्र हरवले.त्यानंतर त्यांचे मामा श्री.पिंगळे यांनी त्यांचा सांभाळ केला,त्यांचे शालेय शिक्ष् ण सुळे हायस्कूल येथे झाले. वयाच्या १७ व्या वर्षी ते स्वातंत्र्य संग्राम चळवळीत सामिल झाले.
बंगालचे परिमल घोष यांनी त्यांना बॉम्ब बणविण्याचे प्रशिक्ष् ण दिले.तेलंगखेडी बॉम्ब खटल्यातील बॉम्ब यांनी आपल्या घरी बनवले होते.यात ते पकडल्या जाऊन ते दान वर्षे जेलमध्ये होते.त्याचे सहकारी बालाजी पटेकर,नोटू सिन्हा,एम.एल.राव,आनंदराव कळमकर त्यांच्या बरोबर स्वातंत्र्य संग्राम चळवळीत होते.
कारागृहातून सुटून आल्यानंतर त्यांच्या वयाच्या २३ सा व्या वर्षी सुधा पटवर्धन यांच्याशी त्यांची लग्नगाठ जुळली.त्यांना तीन मुले व मुलगी दीपा आहे,जी नाशिकला असते.मोठा मुलगा अजित देशपांडे हे हायकोर्ट जज म्हणून निवृत्त झाले.दूसरा मुलगा अनिल हे मुंबईला स्वत:चा व्यवसाय करतात.ते उत्तम क्रिकेटपटू असून नॅशनल क्रिकेट चमूचे काही काळ सिलेक्टर होते.तिसरा मुलगा संजय हे त्यांचा खदान व क्रशरचा व्यवसाय बघत होते.सध्या ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
स्वातंत्र्याच्या २५ सा व्या वर्षी देशपांडे यांचा ताम्रपट व प्रशस्ती पत्र देऊन सन्मात करण्यात आला.सध्या ते आपल्या पत्नीसह आपला मोठा मुलगा अजित यांच्याजवळ आपल्या नातू,सूना,पणतीसह राहत आहेत.
सत्कार सोहळ्यात भाजपचे आ. व शहराध्यक्ष् प्रवीण दटके,उपमहापौर मनीषा कोठे,स्थायी समिती अध्यक्ष् पिंटू झलके,ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, पक्ष् नेते संदीप जाधव आदी उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
