

कोव्हिड-१९ काळात सहकार्य करणा-या ४०० स्वयंसेवी संस्थांचा सत्कार
नागपूर,ता. ३० जोनवारी: कोव्हिड-१९ चा प्रकोप हा अत्यंत भयावह होता,आज ही या प्रकोपाला हलक्यात घेऊ नका,करोनाचा काळ गत संपूर्ण वर्षासाठी अत्यंत भयावह होता,अश्या परिस्थितीत मनपाचे अधिकारी,स्वयंसेवी संस्था,आरोग्य अधिकारी,पोलीस,सफाई कर्मचारी,आशा वकर्स इ.अनेक शासकीय व अशासकीय संस्थांनी मिळून अनेक लोकांचे जीव वाचवण्यासाठी जे काम केले ते सामाजिक व राजकीय जिवनाच्या इतिहासात लिहले जाईल असे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे म्हणाले.
ते नागपूर महानगरपालिकेतर्फे रेशिम बाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित करोनाकाळात मनपाला सहकार्य करणा-या स्वयंसेवी संस्थांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.यावेळी बोलताना ते म्हणाले की,स्वयंसेवी संस्थांची सेवा आणि शिक्ष् णाच्या क्ष्ेत्रातील हेच प्रेरणादायी कार्य हेच खरे राजकारण आहे.नि:स्पृह भावनेने काम करणे हेच खरे राजकारण.याप्रसंगी बोलताना त्यांनी अनेक प्रसंग विदीत केले. या कार्यक्रमाला येण्यापूर्वीच एका तरुणाने माझ्याकडे आ.कृष्णा खोपडे यांचे शिफारश पत्र आणले त्यात त्याची आई ही गंभीर आजारी असल्याने व त्याच्या जवळचे आता सगळे पैसे संपल्यामुळे आईला जगवण्यासाठी महागडे इंजेक्शन घेण्यासाठी मदत करावी अशी ईच्छा प्रकट केली.याची माहिती घेतली असता ते जीवनदायी इंजेक्शन असल्याचे कळले.मानवी जीवनातील हीच खरी शोकांतिका आहे परिणामी महापौर दयाशंकर तिवारी यांना मी हेच सांगू इच्छितो त्यांनी शहरातील गरीब आणि गरजू लोकांना उत्तम आरोग्याच्या सुविधेसोबतच गरजूंना मोफत किंवा अल्प दारात औषध मिळावे यासाठी महानगरपालिकेने ”दवा बँक” सुरू करण्याची सूचना ना. नितीन गडकरी यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांना केली. कोरोनाच्या संकट काळात उभे राहिलेल्या स्वयंसेवी संस्थांनी या दवा बँक साठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.दिल्लीमध्ये एका मूलीने ‘टॉय बँक’उघडली असून गरजूंना ती नि:शुल्क खेळणे पुरवते.गरिबांना डोनेशन मधून अश्या महागडे इंजेक्शन व औषधी मिळायला हवी.अभिनेत्रींना वय विचारु नये, वृत्तपत्रांना त्यांचा खप किती विचारु नये,बिजनेस मॅन यांना त्यांची आवक किती?विचारु नये मात्र औषध कंपनींना औषधांची किंमत किती?हे नक्की विचारले गेले पाहीजे.जे गरजू मृत्यूशी झूंज देतात आहेत त्यांना या दवा बँकच्या माध्यमातून औषधी पुरवा मात्र याची पब्लिसिटी करु नका,असा अनाहूत सल्ला देखील गडकरी यांनी महापौरांना दिला.
तुम्हाला कोव्हिडच्या काळात उद्योगपतींनी ५८ लाख रु,दिलेत,पुढे ही ते अशीच मदत करतील.मध्यंतरी कोव्हिडच्या इंजेक्शनचा देखील तुडवडा निर्माण झाला होता.माझा अपघात झाला तेव्हा पूर्ण गाडी ही पिचकून गेली होती,ज्यांनी पण त्या कारची दशा बघितली त्यांना अाश्चर्य वाटले,तुम्ही जिवंतच कसे?मी आजपर्यंत ज्यांची नि:शुल्क ह्दय शस्त्रक्रिया केली त्यांचेच आर्शिवाद होते मी किवा माझे कुटुंबिय यांना कोणतीही गंभीर जखम झाली नाही.आमचा संतोष यादव हा कार्यकर्ता अडीचशे स्कॅ.फूटांच्या लहानश्या खोलीत राहतो मात्र आजपर्यंत तो वस्ती-वस्ती फिरुन गोर गरीब ,गरजू यांच्या शस्त्रक्रियांसाठी पुढाकार घेतो,आतापर्यंत त्याने १०० ते १२०० गरजूंच्या शस्त्रक्रियांसाठी पुढाकार घेतला असल्याचे कौतूक गडकरी यांनी केले.
विशेषत:वीणा या किन्नरने देखील तिच्या नेृत्वात किन्नर संघटनेच्या वतीने लॉक डाऊनच्या काळात गोर गरीबांची मदत केल्याचे कौतूक गडकरी यांनी केले.हीच आपल्या भारतीय संस्कृतीची विशेषत:असल्याचे ते म्हणाले.
मी या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून या शहरावर कोसळलेले करोनाचे गंभीर संकट बघत होतो.जात,पात,धर्म,भाषा,लिंग इ.सर्व भेदाभेद बाजूला सारुन गरजूंना अनेक स्वयंसेवी संस्थांनी मोलाची मदत केली.११ मार्च २०२० रोजी शहरात पहीला करोना बाधित आढळला,विदेशप्रवासाची त्याची पार्श्वभूमी होती.त्याच्या घरात दूधवाला देखील दूध द्यायला तयार नव्हता,एवढी दहशत करोनाची सर्वसामान्यांच्या मनात होती.मी तत्कालीन महापौर संदीप जोशी यांना फोन केला,ते तातडीने बाधिताच्या घरी पाेहोचले व त्यांच्या घरातील पाणी पिऊन,बाधितांमुळे काही नियम पाळल्यास करोना होत नसल्याचे शहरवासीयांना सांगितले.अश्या परिस्थितीत मनपा अधिकारी,कर्मचारी,स्वयंसेवी संस्थांना काम करणे खूप कठीण होते.
त्यावेळी करोनामुळे सेनिटायझरची एका लिटर बाटलीची किंमत १२०० रुपये झाली!७०-८० रु.भावाने अल्कोहल घेणारे यांनी सेनिटायरची किंमत एकदम वाढवली.मी सेनिटायझरची फॅक्टरीच उघडली,एक लाख लीटर सेनिटायझर फूकट वाटले.छत्रपती चौकात पोलीसांना अख्खी सेनिटायझरची कॅरटच दिली.एक लाख लीटर सेनिटायझर बाजारात आल्याने सेनिटायझरचे भाव पडलेत,अशी माहिती त्यांनी सांगितली.पोलिीस,नर्सेस,डॉक्टर्स,सुरक्ष्ा रक्ष् क,आशा वर्कस,स्मशान भूमित जेव्हा कुटुंबियच मृतदेहाला हात लावायला तयार नव्हते तेव्हा त्या बाधित मृतदेहांवर अंत्य संस्कार करणारे मनपा कर्मचारी,स्वयंसेवी संस्था यांनी खूप चांगले काम केल्याची पावती गडकरी यांनी दिली.माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे व माजी पोलीस आयुक्त भूषणकूमार यांनी करोनाच्या काळात शहरात चांगले काम केल्याची पावतीही गडकरी यांनी दिली.
खा.विकास महात्मे यांनी मला सांगितल्यानंतर मेडीकल,मेयो,एम्समध्ये पीपीई किटचा अभाव असल्याची समस्या कळली.पार्लेवार यांना सांगून पीटर इंगलैण्ड या शर्ट बनविणा-या कंपनीला सांगून दोन कोटींचे मिळालेल्या डोनेशनमधून पीपीई किटची कमतरता दूर केली.१५ हजार किट तर मेयो,मेडीकल,एम्समध्ये वाटले तर विदर्भातील अनेक जिल्हा रुग्णालयात देखील या पीपीई किट्सचे वितरण करण्यात आल्याचे ते म्हणाले.
आयुक्त राधाकृष्णन बी.,जलज शर्मा यांनी देखील चांगले काम केले असल्याचे ते म्हणाले.मध्यंतरी मेडीकल,मेयाेचे डॉक्टर्स हे नाराज होते मात्र दंडूके लावून काम केल्या जाऊ शकत नाही,त्यांच्याशी चर्चा करुन त्यांची समस्या सोडवा अशी सूचना केल्याचे ते म्हणाले.माझा सुरक्ष्ा रक्ष् क दिपक हा उत्तर नागपूरात राहतो.त्याच्या आईला रात्री १ वा. करोना बाधित असल्याने उपचारासाठी शहरात कुठेही रुग्णालयात खाट उपलब्ध झाली नाही.मेघे रुग्णालयात मी फोन केला,हॉलमध्ये खाटा टाका,मात्र रुग्णांवर उपचार करा,अशी सूचना केली.त्यांनी तीन गुना बेडची संख्या वाढवली.मेयो,मेडीकल, एम्स,खासगी रुग्णालयातील डॉक्टर्सने अनेकांचे जीव वाचवले.तुमचे कार्य प्रेरणादायीच आहेत.सामाजिक व राजकीय जिवनाच्या इतिहासात तुमचे हे कार्य लिहल्या जाईल,अशी स्तुती गडकरी यांनी केली.
याप्रसंगी त्यांनी या स्वयंसेवी संस्थांच्या कार्याला सलाम करण्याचे आवाहन सभागृहाला करताच संपूर्ण सभागृह यांनी उभे राहून टाळ्यांचा गडगडाट केला.
‘मेरे को नही होता करोना-बिरोना’ही वृत्ती घातकच!
माझे एक खासगी सचिव आहे मंडलेकर.परवा त्यांना करोनामुळे गंभीर अवस्थेत रुग्णालयात भर्ती करावे लागले.आपले दक्ष्ि ण चे आमदार मोहन मते हे कधीही मास्क घालत नाहीत,मला नाही होत कराेना-बिरोना ही वृत्ती घातकच आहे.मंडलेकर हे देखील असेच भिडस्त स्वभावाचे आहेत मात्र शेवटी करोना झालाच व एअर अंबूलेन्स विमानाने त्यांना चेन्नईच्या नामांकित रुग्णालयात दाखल करावे लागले.अमेरिकेतून त्यांच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स आलेत व अाज त्यांची प्रकृती थोडी बरी असल्याचे कळले,प्राणावरील संकट टळले त्यामुळे अशी बेफिकिर वृत्ती सोडावी.करोनाच्या विषाणूला गांर्भीर्याने घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.विशेष: ६० वर्ष वयावरील ज्येष्ठांनी विशेष काळजी घ्यावी.
आता पर्यंत अनेकांनी कोव्हिडचे वॅक्सिंग घेतले नाही.‘मुझे कूछ नही होता’ही वृत्ती सोडावी व स्वत:सोबत कुटुंबियांची देखील काळजी घ्यावी.मी दोन महिने झाले प्राणायाम करतोय त्यामुळे मला खूप फायदा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होते. मंचावर आमदार सर्वश्री गिरीश व्यास, कृष्णा खोपड़े, प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून पोलीस उपायुक्त लोहित मतानी, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून उपजिल्हाधिकारी इंदिरा चौधरी, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (मेयो) चे अधिष्ठाता अजय केवलिया, बसपा पक्षनेता वैशाली नारनवरे, माजी महापौर नंदा जिचकार, परिवहन समिति सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे, नगरसेविका रूपा राय, रूपाली ठाकुर, नगरसेवक कमलेश चौधरी, सुनील अग्रवाल, राजेंद्र सोनकुसरे, संजय बंगाले, अभय गोटेकर, निशांत गांधी, सुनील अग्रवाल, भगवान मेंढे, नागेश सहारे, नागेश मानकर, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सामाजिक संस्थांनी सहकार्य केले नसते तर मनपा आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करू शकली नसती- दयाशंकर तिवारी
कोरोनाचे संकट मोठे होते. मात्र हे आव्हान नागपूर महानगरपालिकेने लीलया पेलले. सामाजिक संस्थांनी सहकार्य केले नसते तर मनपा आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करू शकली नसती. शासन आणि प्रशासनाला जनतेचे सहकार्य मिळाल्यास सर्व काही साध्य होऊ शकते याची प्रचिती सर्वांनी दिली अशा शब्दात महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपुरातील सर्व स्वयंसेवी संस्थांचा गौरव केला.
कोरोनाच्या काळात मानवसेवेपासून तर पशुसेवेपर्यंतचे सर्व कार्य विविध सामाजिक संस्थांनी केले. जात, धर्म, राजकारण असा कुठलाही भेदभाव न करता मानव सेवेसाठी सर्व पुढे आले. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मनपाद्वारे १०१ दिवसात २२ लाख फूड पॉकेट वितरित केले. सुमारे ५ ते ७ कोटी रुपयांचे शिजवलेले अन्न मनपा केवळ स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनेच करू शकली. याशिवाय शहरातील ७२ विविध संस्थांनी ३५ ठिकाणी स्वयंपाकगृहे चालवून दररोज ७५ हजार लोकांना अन्न पुरविले. घरात एकटे असलेले जेष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर माता, लहान मुले, रस्त्यावरील बेघर, परप्रांतीय मजूर, शहरात अडकलेले विद्यार्थी आशा सर्वाना अन्न, औषध ते चप्पल सर्वतोपरी मदत स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मनपा करू शकली. या सर्व मदतीसाठी लागणारा आर्थिक भार उचलण्यासाठी ५० स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. या संस्थांनी ५८ लक्ष ३७ हजार रुपयाचे आर्थिक सहकार्य केले. या काळात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेले उत्तम कार्य उत्कृष्ठरित्या सुरू ठेवण्याचे आव्हान विद्यमान आयुक्त राधाकृष्णन बी आजही पार पाडत आहेत. उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्या नेतृत्वात भोजन वितरण तर डॉ. योगेंद्र सवाई यांच्या नेतृत्वात वैद्यकीय सेवा उत्कृष्ठ राहिली. याशिवाय मेडिकल, मेयो, एम्स, लता मंगेशकर, शालिनीताई मेघे या रुग्णालयासह मनपाचे रुग्णालय आजही आरोग्य सेवा पुरविण्यास तत्पर आहेत. ज्यावेळी कोरोना बाधित मृतदेहाला त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती हात लावायला तयार नव्हते त्यावेळी मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अंत्यसंस्काराचे कार्य केले. शहराचा प्रथम नागरिक म्हणून या सर्वांचा हृदयपूर्ण आभारी आहे असेही ते म्हणाले.
येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या हिरक महोत्सवा निमित्त नागपूर शहराबाहेरील भागात ७५ “वंदेमातरम हेल्थ पोस्ट” तयार करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन उपायुक्त मिलिंद मेश्राम तर आभार उपमहापौर मनीषा धावडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, हनुमान नगर झोनच्या सहायक आयुक्त सुषमा मांडगे, क्रीडा अधिकारी पियुष अंबुलकर यांनी सहकार्य केले.

शासकीय संस्थांसह ४०० स्वयंसेवी संस्थांचा गौरव
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महापौर दयाशंकर तिवारी आणि अन्य मान्यवारांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालच्या प्रतिनिधि उपजिल्हाधिकारी इंदिरा चौधरी, पोलिस आयुक्तांचे प्रतिनिधी उपायुक्त लोहित मतानी, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, मनपचे तत्कालीन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांच्यासह सुमारे ४०० स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीचा यावेळी सत्कार करण्यात आला.




आमचे चॅनल subscribe करा
