फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजस्पोर्ट्स पॉलिसी वर पहीली एक दिवसीय कार्यशाळा संपंन्न

स्पोर्ट्स पॉलिसी वर पहीली एक दिवसीय कार्यशाळा संपंन्न

Advertisements

 

नागपूर, ता.१२ मार्च: स्पोर्ट्स पॉलिसीवर नूकतीच एक दिवसीय कार्यशाळा १२ मार्च २०२१ रोजी फिजिकल एज्युकेशन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.

संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच झालेल्या या कार्यशाळेमध्ये प्रोफेसर डॉक्टर मकरंद जोशी एम ए कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन औरंगाबाद यांनी स्पोर्ट्स पॉलिसीवर सविस्तर मार्गदर्शन केले. दोन तास चाललेल्या या कार्यशाळेमध्ये फिट इंडिया ते खेलो इंडिया पर्यंत अनेक स्पोर्ट्स पॉलिसींबद्दल विस्तृत विवेचन त्यांनी केले. प्रिअंबल ऑफ स्पोर्ट्स पोलिसी ऑफ इंडिया २००१ इकिंग ऑफ स्पोर्ट्स, महाराष्ट्र स्टेट स्पोर्ट्स पॉलिसी २०२१ इत्यादींचे विविध पैलू त्यांनी मांडले तसेच नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट कोड ऑफ इंडिया २०११ एन एफ एस एफ¸ टारगेट ओलंपिक, खेलो इंडिया, यूथ गेम्स २०१८ इंडिया अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर मत मांडले.

पुढे सांगताना त्यांनी सांगितले की, या सर्व पॉलिसांनी जर शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक मेहनत घेतील तर आज आपण स्पोर्ट्स उच्च कोटीला नेऊ शकतो . यावर बोलताना उद् घाटक मिलिंद बाराहाते व्यवस्थापन परिषद सदस्य यांनीही आपले मत मांडले, जर आपण सर्व मिळून स्पोर्ट्स ला प्राधान्य दिलं तर आज अनेक पदक आपल्याला निश्चित मिळतील,असे ते म्हणाले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉक्टर संजय दुबे यांनी आपलं मत मांडताना डॉक्टर माधवी मार्डीकर यांचे विशेष अभिनंदन केले , आतापर्यंत अनेक एज्युकेशन पॉलिसिज वर वर्कशॉप किंवा कार्यशाळा झाल्या मात्र बी पी जी टी डी च्या या विभागाच्या मार्डीकर यांनी प्रथमच‘ स्पोर्ट्स पॉलिसी ’ वर ही कार्यशाळा आयोजित करुन अभिनंदनीय कार्य केले. एज्युकेशन पॉलिसीचे महत्त्व सांगताना स्पोर्टस पॉलिसी किती उपयुक्त व महत्त्वाची आहे याचं सविस्तर विवेचन त्यांनी केले.

डॉक्टर संजय म्हणाले की स्पोर्ट्स पॉलिसी या आपल्याला इम्पलेमेंटेशन करण्याकरिता असतात परंतु बरेचदा त्या इम्प्लिमेंट न होताच तशाच वाया जातात . जर आपल्याला कुठून पॉईंट्स मिळणार आहे हे माहीत असेल तर त्याचा अनेक फायदा कॉचेस शिक्षक खेळाडू यांना होतो.
प्रास्ताविक डॉ. विजय दातारकर यांनी केले व त्यांनी स्पोर्ट्स पॉलिसी कशासाठी हवी याचं महत्व विशद केलं. त्याचप्रमाणे शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. आर. जी. अत्राम यांनी आपल्या भाषणात डॉ. मार्डीकर या नेहमीच विविध कार्यक्रम घेत असतात असे नमूद केले.मार्डीकर यांचे कौतुक करीत त्या विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचेही भले पाहत असतात असे सांगून कुठून कुठून निधी आपल्याला मिळू शकतो याबात त्या सदैव जागरुक असतात.

स्पोर्ट्स पाॅलिसीनी सर्व भारतातील जैवविविधता ठिकाणावरून या वर्कशॉप मध्ये आलेले आहेत किंवा जोडलेले आहेत त्या सर्वांनाच भरपूर फायदा होणार आहे ,असे ते म्हणाले.

कार्यशाळेच्या आयोजन समितीच्या सचिव डॉ.मार्डीकर यांनी केले. कार्यक्रमाला पूर्ण भारतातून १८० लोकांची उपस्थिती होती. यावेळी प्रथमेश पांडे याने एक मार्मिक प्रश्न विचारला,एकच असोसिएशन असेल तर अनेक फायदे होतात पण आज प्रत्येकच खेळात दोन असोसिएशन असल्यामुळे खेळाडूंचे प्रचंड नुकसान होत आहे, अतिशय उत्कृष्टपणे डॉक्टर जोशी यांनी या प्रश्‍नाला उत्तर दिले व कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संजय चौधरी, लामखेडे, भोसले ,सुनील कापगते, अरुणा डोग्रा, बंटी प्रसाद यादव, शिरसागर, निशांत टिपे ,भारती काळे, रजनी खंडागळे, रजनी मुरकुटे, सुरेन्द्र तिवारी, दिपाल सिंग सोनटक्के , इंद्रजीत बासू, अलका पांडे, राजू राऊत आदींनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. ड्रॉ. मी.यांनी केले तर आभार डॉ. माधवी मार्डीकर यांनी मानले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या