

नागपूर,ता.२० जानेवरी: ‘सत्ताधीश’ने बुधवार दिनांक १८ जानेवरी रोजी काँग्रेसच्या माजी शहराध्यक्ष शखे हुसैन यांच्या संदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती.२० डिसेंबर २०२१ रोजी नागपूरच्या कलावंतांनी कोराडी येथील लॉनमध्ये शेख हुसैन यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे ऑकेस्ट्राचा कार्यक्रम सादर केला होता.मात्र,एक महिन्यानंतर देखील कलावंतांचे पैस मिळत नसल्याची चर्चा होती.
शेख हुसैन यांच्या मुलांचे लग्न नसून त्यांच्या चुलत नातेवाईकांकडील हे लग्न असल्याची माहिती समोर आली असून या व्यवहरात शेख हुसैन यांचा काहीही संबंध नसल्याचे सोहेब हुसैन यांनी सांगितले.
या कलावंतांचे कार्यक्रमाचे ३५ हजार रुपयांची देखील परतफेड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील सुप्रसिद्ध की-बोर्ड वादक महेंद्र ढोले व ऑकेस्ट्रा ग्रूपचे संयोजक लकी खान यांनी आज शुक्रवार दिनांक २० जानेवरी रोजी कार्यक्रमाचे पैसे मिळाले असल्याचा वृत्ताला दुजोरा दिला.




आमचे चॅनल subscribe करा
