फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशसोळा वर्षीय मुलीचीही हत्या सुशांतसिंहच्या घरी त्याच दिवशी!

सोळा वर्षीय मुलीचीही हत्या सुशांतसिंहच्या घरी त्याच दिवशी!

Advertisements

(रविवार-विशेष)

महाराष्ट्र सरकारने हत्याकांडाचे नेरेटिव्ह बदलल्याचे माहोळ दिल्लीतील ट्वीटर व फेसबूकवर!

डॉ. ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १३ सप्टेंबर: सुप्रसिद्ध अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांची आत्महत्या अथवा तथाकथित हत्येच्या सनसनीखेज बातम्यांच्या मागे सध्या देशातील अनेक वृत्तवाहीन्या समर्पित झाल्या असल्या तरी देशातील राजधानी दिल्लीत मात्र याच विषयावर ट्वीटर व फेसबूकवर अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा वाचण्यास मिळतोय.

१४ जून रोजी सुशांतसिंहच्या ज्या दिवशी आत्महत्येचे प्रकरण घडले त्या दिवशी त्याच्या घरात एक नव्हे तर दोन हत्याकांड घडले!असं दाव्यानिशी हे ट्वीटर हँडल स्पष्ट करतो.या घरात एक सोळा वर्षीय तरुणीची देखील हत्या करण्यात आली होती जिला दिशा सालियान या सुशांतसिंह राजपूतच्या स्वीय सहायकाने, फॉर्म हाऊसमधील पार्टीनंतर सुशांतसिंहच्या घरी लपवली होती,असा दावा करण्यात आला आहे.
लॉक-डाऊनच्या काळात  ३०० च्या वर बालकांचे अपहरण एकमेव मुंबईमधून झाले आहे. आपल्या देशातील उच्चभ्रू वर्गातील बरीच मंडळी ही बाल लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यामध्ये बराच वेळा अडकली आहे. ही एक विकृती आहे आणि ही विकृती लॉक डाऊनच्या काळातही जोपासण्यात आली…! फरक फक्त एवढाच आहे लॉक-डाऊनच्या काळात उदाहरणादाखल.. १ रुपयाची दारु,ड्रग्ज आणि बालकांची किंमत ही… १०० रु.झाली होती!

याच विकृतीतून ती सोळा वर्षीय तरुणी देखील रॅकेटच्या माध्यमातून त्या दिवशीच्या फॉर्म हाऊसच्या पार्टीत पाेहोचविण्यात आली होती.मात्र दिशा सानियालमुळे तिला सुशांतसिंहच्या घरात आश्रय मिळाला,सुशांतसिंहने तिला माध्यमांसमोर आणण्याची तयारी ही केली होती मात्र….त्या पूर्वीच या दोघांचीही हत्या करण्यात आली,असा दावा हे ट्विटर हँडल करतो!सुशांतसिंहच्या घरातील बाथरुमचा दरवाजा देखील पोलिसांना तुटलेल्या अवस्थेत आढळला..बाथरुममध्ये नेमकं कोण लपलं होतं?याचा तपास झालाच नाही….एका सोळा वर्षीय तरुणीचे प्रेत त्याच दिवशी मुंबईतील समुद्र किनारी सापडल्याचे वृत्त माध्यमात झळकले!

हा संपूर्ण घटनाक्रम ड्रग्ज,मर्डर मिस्ट्री आणि बाल लैंगिक शोषनाशी जुळला असल्याचा दावा करण्यात आला आहे.या ट्वीटमध्ये उघडपणे सात लोकांचे नाव झळकले,यात मुंबई पोलिस खात्यातील तीन पोलीस,अरबाज खान,इम्तियाज खत्री आदींची नावे आहेत….!
कंगना रानौत यांनी सुरवातीला ड्रग्ज माफियाचा उल्लेख करुन योग्य दिशा तपासाला दिली होती मात्र यानंतर खूप मोठ्या राजकीयस्तरावर हा संपूर्ण नेरेटिव्हच पालटून टाकण्यात आला आणि आज महाराष्ट्रातील जनता बघतच आहे तपासाची ही दिशा रानौत-संजय राऊत यांचे वाकयुद्ध,तिच्या कार्यालयावर बुलडोजर चालविणे, तिला भाजपकडून मिळालेली वाय सुरक्ष्ा,राज्यापालांची भेट आणि आजच नुकतेच तिला तिच्या घरासंबधी देखील मुंबई मनपाची मिळालेली नोटीस!

कंगनाचा विषय नसताना संपूर्ण नेरेटीव्ह बदलण्यात सुब्रम्हण्यम स्वामी यांच्यावर देखील ट्वीटरचा रोख आढळतो. महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्यांकडून त्यांना दिशानिर्देश मिळाल्याचे ट्वीटरवर सांगितले गेले आहे.

कोलकतामधील एका महिला एंकरने तर मुंबईतील बाल लैंगिक शोषणावर अतिशय भयावह अशी डाक्यूमेंट्री फेसबूकवर व्हायरल केली आहे.ड्रग्ज घेणारे हे किती पराकोटीचे विकृत लैंगिक वर्तन करु शकतात हे ऐकून सभ्य माणसांच्या अंगावर शहारे उभे राहतात.फक्त ड्रग्ज किवा विकृत लैंगिक शोषनच या बालकांचे होत नाही तर त्यांच्या मांसाने स्वत:ची प्लास्टिक सर्जरी देखील हे उच्चभ्रू विकृत करुन घेत असतात जेणेकरुन त्यांचे वय,त्यांची स्कीन लपून राहवी,असा दावा या डाक्यूमेंट्रीमध्ये करण्यात आला आहे.कलियुगातील क्रोर्याची ही शेवटची परिसिमा असल्याचे ती सांगते…!

नेटीझन्सनी गूगलवर युकेचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे त्यांच्या संसदेत दिलेले बयाण बघितले तर ’जगात, भारत हे बाल लैंगिक शोषणामध्ये हब असल्याची’माहिती दिली होती.नेपाल,प.बंगाल या मार्गातून बालकांना भारतात आणल्या जातं,संपूर्ण सिंडीकेटच या धंधात सामिल असून अखाती देशापर्यंत याचे तार जुळले आहेत.हाच मार्ग पुन्हा या देशातून बाहेर पाठविण्यात येणा-या बालकांसाठी देखील वापरला जातो.

बालकांच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यापासून लक्ष् विचलित करण्यासाठीच रिया हिला प्यादा करण्यात आले आणि संपूर्ण माध्यमांचे लक्ष् त्यावर केंद्रित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य शासनाने तसेच मुंबई पोलिसांनी मात्र अनेक चूका करुन ठेवल्या आहेत,अगदी सुरवातीपासूनच त्यांनी या घटनेत संशयास्पद भूमिका कशी घेतली,याची जंत्रीच ट्वीटरवर आढळते.बिहार निवणूकांसाठी या घटनेचा वापर केला जात असल्याचा आरोप हा शुद्ध मूर्खपणा असून याचा मात्र भारतीय जनता पक्ष्ाला निवडणूकीत नक्कीच एडव्हान्टेज मिळेल. हे राजकारणी सख्या आई-बापाचे नाही होत तर देशाचे काय होतील?असा संताप देखील ट्विटरवर व्यक्त झाला आहे.हीच या देशाची खरी शोकांतिका असल्याचे ते सांगतात.

ही संपूर्ण कथा सुशांत..सेलिब्रिटी आणि इमोशनच्या पडद्याआड बदलल्या जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.ज्या एम.एस.धोनी वरच्या बायोपिकमुळे सुशांत हा स्टार झाला त्या धोनीने फक्त आणि फक्त एकदाच त्याच्या मृत्यूनंतर ट्वीट केलं.यानंतर एवढं पाणी पुलाखालून वाहून गेलं मात्र धोनी याने मौन बाळगले आहे.शतकाचा महानायक अमिताभ बच्चन यांचे देखील ‘मौन’ब-याच चर्चांना आमंत्रित करतं.

अक्ष् य कुमार आणि त्याचा गेम ‘फौजी’चं गौडबंगाल….
सुप्रसिद्ध अभिनेते अक्ष् य कुमार याने नुकतेच पंतप्रधानाच्या कोविड मदत निधीत २५ कोटींचा निधी जमा केला आणि संपूर्ण देशातून सहानूभूती आणि कौतूक लाटले.नुकतेच पंतप्रधानांनी चिनी मोबाईल खेळ ’पबजी’व बॅन आणले. अक्ष् य कुमार याने देखील पबजीच्या धर्तीवर ’फौजी’हा मोबाईल आणि पीसी गेम भारतात आणण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे असा गेम तयार करण्यासाठी किमान २-३ वर्षांचा कालावधी लागतो.

मंुंबईतील ‘क्यूकी डिजिटल मिडिया’चे सहसंचालक व मुख्य कार्यकारी व्यवस्थापक समीर बांगरा यांचा देखील सुशांत सिंह राजपूत घटना घडण्याच्या दिवशीच मुंबईच्या रस्त्यावर….दूचाकीने अपघात होऊन मृत्यू झाला….!ते आपल्या कॅनेडियन चमूसोबत २.५ मिलियन डॉलरच्या मोबाईल गेमवर गेल्या ३ वर्षांंपासून काम करीत होते आणि लवकरच ते हा गेम भारतात लॉन्ज करणार होते मात्र अक्ष् य कुमार यांनी त्यांच्या ‘फौजी’ची घोषणा केली आणि….?या गेमची कोडिंग तयार करण्यासाठी किमान ३ वर्षांचा कालावधी लागतो..अक्ष् य यांनी तीन महिन्यात हा गेम लॉन्ज करण्याची घोषणा केली हे विशेष…यावर देखील फेसबूकवर बरेच तर्क जोडण्यात आले आहे…!या गेमच्या माध्यमातून ५०० कोटी कमावणारे अक्ष् य यांचे पंतप्रधान कोविड मदत निधीत २५ कोटींचे योगदान हे बरंच काही सांगून जातं…..!

हे ट्वीटर हॅंडल आहे दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲड.विभोर आंनद तसेच देशातील दोन मोठ्या वृत्त वाहीन्यामध्ये काम करुन चुकणारे उज्जवल त्रिवेदी यांचे…..!

शेवटी ’ये पब्लिक है ये सब जानती है..ये पब्लिक है’हेच सत्तरच्या दशकातील गाणे गुणगुणावं लागतं….या देशाचा सुजाण किमान सुशिक्ष्ति नागरिक हा ज्या दिवशी राजकीय नेते,मंत्री-संत्री,सेलिब्रिटी आदींच्या प्रति सहानूभूतीतून नव्हे तर सारासार विवेक बुद्धिीने विचार करेल त्या दिवशी भारत हा देश ख-या अर्थाने महासत्ता होईल,याबाबत दुमत नाही.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या