फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज'सोबत’ पालकत्व प्रकल्पाचा रक्षाबंधन सोहळा

‘सोबत’ पालकत्व प्रकल्पाचा रक्षाबंधन सोहळा

Advertisements
शेकडो बहिणींनी आमदार संदीप जोशींचे केले औक्षण

भाजप महिला आघाडीच्या भगिनींची उपस्थिती
 
नागपूर : कोरोना काळात सौभाग्य गमावलेल्या शेकडो महिलांच्या मुलांना शैक्षणिक आधार देणाऱ्या ‘ सोबत ‘ पालकत्व प्रकल्पाचे संयोजक आमदार संदीप जोशी यांना या बालकांच्या मातांनी राखी बांधून त्यांच्याप्रती बंधुप्रेम व्यक्त केले. आपणही या सर्व बहिणींची साथ आयुष्यभर सोडणार नाही. या रेशमी धाग्याचे कर्तव्य निभावू, असा विश्वास भगिनींना दिला.
 
निमित्त होते सोबत पालकत्व प्रकल्पाच्या रक्षाबंधन सोहळ्याचे. प्रकल्पाशी जुळलेल्या शेकडो बहिणींनी आमदार संदीप जोशी यांचे औक्षण केले आणि राख्या बांधल्या. बहिण भावाच्या अतूट नात्याला आणखी घट्ट करणारा हा रक्षाबंधनाचा पवित्र सोहळा लक्ष्मी नगर येथील जनसंपर्क कार्यालयात थाटात पार पडला. या अविस्मरणीय सोहळ्याचे हे पाचवे वर्ष होते. रक्षाबंधनानंतर आमदार संदीप जोशी यांनी बहिणींना भेटवस्तूही दिल्या.

दरम्यान भाजप महिला आघाडीच्या शेकडो भगिनी देखील या रक्षाबंधन सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. 
 
‘सोबत’ पालकत्व प्रकल्पातील भगिनी दरवर्षी न चुकता आमदार संदीप जोशी यांना राखी बांधून त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात. कोरोना काळात पती गमावलेल्या अनेक महिलांसमोर एकल पालकत्वाची जबाबदारी अचानक येऊन उभी ठाकली. आपल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या कठीण काळात आमदार संदीप जोशी यांच्या पुढाकाराने ‘सोबत पालकत्व प्रकल्पाला सुरुवात झाली. यंदा या प्रकल्पाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे २८३ एकल पालक असलेल्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च ‘सोबत’ प्रकल्पातून समर्थपणे केला जातो. या महिलांसाठी आमदार संदीप जोशी हे केवळ लोकप्रतिनिधी नसून एक कुटुंबप्रमुखच झाले आहेत.
 
दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी या सर्व महिला आमदार संदीप जोशी यांच्या कार्यालयात येतात, त्यांना राखी बांधतात आणि एक भावनिक, हृदयस्पर्शी कौटुंबिक सोहळा पार पडतो. 
 
दरवर्षीप्रमाणे यंदाही आज (ता.९ ) सकाळी साडेनऊ वाजता सोबत पालकत्व प्रकल्पातील भगिनी तसेच भाजप महिला आघाडीच्या भगिनींनी एकत्र येत लाडके भाऊ आणि कुटुंबप्रमुख आमदार संदीप जोशी यांचे औक्षण केले आणि सर्वांनी राख्या बांधल्या. कार्यक्रमानंतर सहभागी भगिनींसाठी आणि उपस्थित मान्यवरांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. 
माझ्यासाठी आत्मिक समाधानाचा क्षण; आ. संदीप जोशी
 
समाजातील अनेक अस्वस्थ करणाऱ्या घटनांमधून काही विधायक कामे करण्याची प्रेरणा मिळाली. दीनदयाल थाळी आणि सोबत पालकत्व प्रकल्प हे त्यातीलच. दीनदयाल थाळी प्रकल्पातून रुग्ण नातेवाइकांच्या चेहऱ्यावर आणि ‘ सोबत ‘ मधील भगिनींच्या चेहऱ्यावरील स्मित हे माझ्यासाठी आत्मिक समाधान आहे. हे स्मित माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे, जी अमूल्य आहे.
……………………………………
 
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या