Advertisements

करोना काळात पती गमावलेल्या भगिनी करणार आमदार संदीप जोशी यांचे औक्षण
रक्षा बंधनाचा असा ही एक कौटूंबिक साेहळा
नागपूर,ता. ८ ऑगस्ट २०२५: कोरोना काळात पती गमावलेल्या अनेक महिलांसमोर एकल पालकत्वाची जबाबदारी अचानक येऊन उभी राहिली. आपल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या कठीण काळात आमदार संदीप जोशी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘सोबत’ पालकत्व प्रकल्पाला यंदा पाच वर्षे पूर्ण होत आहेत.
या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे अडीचशे महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च ‘सोबत’ प्रकल्पातून समर्थपणे केला जातो. या महिलांसाठी आमदार संदीप जोशी हे केवळ लोकप्रतिनिधी नसून एक कुटुंबप्रमुखच झाले आहेत.
रक्षाबंधनाच्या दिवशी या सर्व महिला आमदार संदीप जोशी यांच्या कार्यालयात येतात, त्यांना राखी बांधतात, आणि एक भावनिक, हृदयस्पर्शी कौटुंबिक सोहळा आकार घेतो.
या वर्षी हा रक्षाबंधन सोहळा शनिवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता आमदार संदीप जोशी यांचे जनसंपर्क कार्यालय, प्लॉट नं. १७०, बँक ऑफ इंडियाच्या बाजूला, आर.पी.टी.एस. रोड, लक्ष्मीनगर, नागपूर येथे होणार आहे.
या अनोख्या सामाजिक बांधिलकीचा उष्मा समाजापर्यंत पोहोचावा, या हेतूने आपुलकीच्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आमदार संदीप जोशी यांनी केले आहे.
………………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
