

करोनामुळे आई किवा वडीलांचे छत्र हरवलेल्या पाल्यांचे स्वीकारणार पालकत्व
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी महापौरांचा स्तुत्य उपक्रम
नागपूर,ता. २४ मे: करोना या जागतिक महामारीने वर्ग,पंथ,जात,धर्म,भाषा,लिंग,प्रदेश असा कोणताही मुलाहजा न बाळगता अनेक कुटुंबे उधवस्त केली.अनेक कुटुंबात कर्ता पुरुष किवा जन्मदात्रीच करोना संसर्गामुळे मृत्यू पावले तर अनेक कुटुंबात दोघेही आपल्या पाल्यांना एकटे सोडून अनंतात विलीन झाल्याने त्यांचे पाल्य निराधार झाले.एकीकडे खासगी रुग्णालयांनी उपचाराच्या नावावर अनेकांचे कंबरडे मोडले त्यामुळे मागे उरलेल्या आपल्या पाल्यांसाठी अनेक मृत पावलेले पालक आर्थिक तजवीज करुन ठेऊ शकले नाहीत.अश्या वेळी निराधार झालेल्या मुलांच्या भविष्यावर फार मोठे संकट कोसळले. अश्या निराधार झालेल्या ० ते २० वर्षांपर्यंतच्या मुलांचे पालकत्व स्वीकारण्याची जवाबदारी श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टतर्फे संचालित ‘सोबत’या प्रकल्पाने घेतली असल्याची माहिती आज सोमवार दि. २४ मे रोजी माजी महापौर संदीप जोशी यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र -परिषदेत दिली.
समाजातील सहह्दयी व्यक्तिंच्या सहयोगाने हा प्रकल्प चालविला जाणार आहे.आई किवा वडील किवा दोघांचेही छत्र हरपलेल्या मुलांचे शिक्ष् ण,आरोग्य,आहार,कौशल्य,प्रशिक्ष् ण व समुपदेशन या मूलभूत गरजा पूर्ण करण्याकडे ‘सोबत’लक्ष् देणार आहे असे श्री सिद्धीविनायक ट्रस्ट,झिल्पी,ता.हिंगणाचे अध्यक्ष् व माजी महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.
या ‘सेवाभावी’ प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंटिफिक सभागृह,लक्ष्मीनगर येथे संपूर्ण नियमांचे पालन करुन केल्या जाणार आहे.या वेळी पहील्या पाच कुटुंबियांच्या पाल्यांचे प्रतिकात्मकरित्या पालकत्व स्वीकारल्या जाणार असल्याची माहीती त्यांनी दिली.
यात देशातील सुप्रसिद्ध बुद्धिबळपटू व नागपूरातील अनेक युवकांचे प्रशिक्ष् क व प्रेरणास्थान असणारे स्व.उमेश बानबुडे,विमानतळावर इंडिगोमध्ये तात्पुरते सेवेत असणारे यंत्रज्ञ स्व.रामू भोयर,नागपूर महानगरपालिकेतील महापौर कक्ष्ात काम करीत असलेले चर्तुर्थ श्रेणी कर्मचारी व ऐवजदार स्व. संघपाल लोखंडे,उत्तर नागपूरातील सामाजिक क्ष्ेत्रातील कार्यकर्ता स्व.सुधीर सावरकर तसेच टॅक्सीचा व्यवसाय करणारे स्व.तुषार ठावरे यांच्या कुटुंबातील पाल्यांचा समावेश असणार आहे.
ज्यांच्या घरातील दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यूमुखी पडले असतील त्यांनी संस्थेचे कार्यलय राजेंद्रसिंह सायन्स एक्सप्लोरेटरी,नॉर्थ अंबाझरी रोड,दीक्ष्ाभूमीजवळ,नागपूर येथे दुपारी २ ते ५ च्या दरम्यान(शासकीय सुट्यांचा दिवस सोडून)संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय ज्योत्सना कु-र्हेकर ९८२३०४३१३३,प्रणय मोहबंशी ९८५०८५९६६०,आनंद टोळ ९८२२२०४६७७,प्रकाश रथकंटीवार ९८२३०४८१७५ यांच्याशी संपर्क साधावा.याशिवाय sobatprakalp@gmail.com,siddhivinayakseva.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.संस्थेच्या आवेदनपत्रात संपूर्ण माहिती भरावी,संस्थेतर्फे आवेदनात भरण्यात आलेल्या माहितीची पडताळणी आवेदनकर्त्याच्या घरी जाऊन करण्यात येईल,असे संदीप जोशी यांनी सांगितले.
या प्रक्रियेत जे पालक शासकीय सेवेत आहेत ते या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत,ज्या पालकाला रुपये १५ हजारच्या वर निवृत्ती वेतन प्राप्त होत आहे ते या योजनेस पात्र होणार नाही तसेच ज्यांच्या आजी-आजोबांचे निवृत्ती वेतन २५ हजारांच्या वर आहे ते देखील या योजनेस पात्र असणार नाहीत.या योजनेत प्रत्यक्ष् कोणतीही आर्थिक मदत दिली जाणार नसल्याचे माजी महापौरांनी स्पष्ट केले.
या शिवाय गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक क्ष्ेत्रातील १०० कलावंतांना तसेच क्रिडा क्ष्ेत्रातील १०० क्रीडा प्रशिक्ष् कांना धान्य संचाचे वितरण फडणवीस यांच्या हस्ते होईल.सध्या करोनामुळे या दोन्ही क्ष्ेत्रातील माणसांचे जगणे सततच्या लॉकडाऊनमुळे अत्यंत कठीण झाले आहे.गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सोबत’तर्फे मदतीचा हा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न असणार आहे. विविध क्ष्ेत्रातील २० फ्रंट लाईन वर्कर व अन्न व औषधी विभागातील कर्मचारी यांचा देखील सत्कार होईल.
पत्र परिषदेला पराग सराफ, रितेश गावंडे,ॲड.परेश जोशी, अनिरुद्ध भगत,ज्योत्सना कु-र्हेकर,आनंद टोळ,प्रणय मोहबंशी व प्रकाश रथकंटीवार उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
