

कर्मचारी नितेश परतवार यांनी पंधरा हजार रुपये परत करण्यास दिला नकार
नागपूर,ता. २५ ऑगस्ट: सेव्ह स्पीचलेसच्या संचालिका स्मिता मिरे यांना त्यांचे कर्मचारी नितेश परतवार यांनी फोन करुन ब्लॅकमेलिंगची धमकी दिली. शहराबाहेर असलेल्या शेल्टर होममध्ये एकट्याच काम करीत असल्यामुळे बरे-वाईट करण्याचा दम दिला.याशिवाय मिरे यांच्याकडून त्याने जे पंधरा हजार रुपये उधार घेतले होते ते देखील परत करण्यास नकार दिला,उलट तुम्हालाच या प्रकरणात अडकवील,अशी धमकी दिली अशी तक्रार स्मिता मिरे यांनी गिट्टी खदान पोलीस ठाण्यात नोंदवली.

स्मिता मिरे या सेव्ह स्पीचलेस नावाची मूक प्राण्यांसाठी हजारी पहाड,कोटोल नाका येथे प्राणी कल्याण संस्था चालवतात.नितेश परसतवार(३४)गेल्या वर्षी ऑक्टोबर २०१९ पासून संस्थेत पगारी कर्मचारी म्हणून काम करीत होता. दहा हजार रुपये महिना पगार त्याला देण्यात येत होता. त्याने येण्या-जाण्यासाठी गाडी नाही म्हणून अाधीच पंधरा हजार रुपये हात उधार घेतले. दर महिन्याला हजार रुपये कापत जा अशी विनंती त्याने केली होती.हे पैसे घेतले तेव्हा माय एफ एमचे रेडियो जॉकी राजन अलोणे हे देखील उपस्थित होते.सकाळी ९.३० वा. कामाची वेळ असताना तो ११ वा. शेल्टर होममध्ये यायचा. ५ वा.निघून जायचा. भरपूर सुट्या घ्यायचा.
मूक श्वाशांशी तो तुसडेपणाने वागायचा.मूक प्राण्यांना सांभाळण्यासाठी त्याला कामावर ठेवले होते मात्र तो सतत फोनवर बोलत राहायचा. दिवसातून दोन वेळा मूक प्राण्यांना जेवण देण्याची त्याची जबावदरी असता त्या कर्तव्यातही कामचूकारपणा करायचा.
३ ऑगस्ट २०२० रोजी उशिरा तो ११ वा.उशिरा आला व न सांगता निघूनही गेला. याचा त्रास मूक प्राण्यांना झाला. या वागणूकीला कंटाळून त्याला उरलेले पैसे येत्या तीन-चार महिन्यात परत कर आणि काम सोड असे सांगितले असता त्याने धमकी दिली. मी पैसे देणार नाही,शिवाय या शेल्टर होममध्ये तुमचे काही बरे-वाईट केले तर कोणाला कळणार ही नाही.
या माणसाने दहा हजार आमच्याकडून पैसे घेतले आहे. जे अजूनही परत केले नाहीत. फोन करुन बोलण्याचा प्रयत्न केला असता नितेश परतवार याची पत्नी फोन उचलून सरळ धमक्या देते,आम्हीच खाटी तक्रार करु तू आम्हाला त्रास देत असल्याची,माझ्या नव-याची तब्येत खराब झाली तर माझ्या दोन्ही मुलांची जवाबदारी तुला घ्यायला लावील. तब्येत खराब झाली सांगून तुझ्याकडून पैसे उगाळू,पैसे आता मिळणार नाही उलट खोटी पोलीस तक्रार करुन उगाच जास्त पैसे तुला द्यावे लागतील,तुम्ही आमचं काहीच वाकडं करु शकत नाही,पैसे आता मिळणार नाही. आता पुन्हा फोन करुन पैसे मागितले तर महागात पडेल.गरिबांना त्रास देता असं नाटक करु,याशिवाय पुन्हा आता पैसे मागितले तर ब्लॅकमेल करु,तुमच्याचकडून पैसे घेऊ आणि शेल्टरवर एकटी काम करत असते,काहीही होऊ शकतं,अशी धमकी नितेश याने दिल्याची तक्रार स्मिता यांनी गिट्टीखदान पाेलीस ठाण्यात नोंदवली.
मी एकटी शहराच्या दूर शेल्टरवर काम करीत असते,माझी सुरक्ष्ा म्हणून फक्त माझे दीडषे श्वान माझ्याकडे आहेत. बेवारस दीडशे अपंग,जखमी,उपाशी श्वाशांनाची जवाबदारी माझ्या एकटीवर असून मला या सर्व गोष्टींचा मानसिक त्रास होत आहे.शिवाय ही संस्था माझ्या वैयक्तिक पैश्यांवर चालते. आज पंधरा हजार रुपयांचे नूकसान मी सोसू शकत नाही.या व्यक्तिने संस्थेकडून घेतलेले पैसे परत करावे,आम्हाला त्रास देणे बंद करावे तसेच या पुढे फोन केला पैसे मागण्यासाठी तर तब्येत खराब झाली सांगून खोटी तक्रार नोंदवत पैसे उगाळू नये,ब्लॅकमेलींगची दिलेली धमकी याचीही गंभीर नोंद घ्यावी अन्यथा मला एफआयआर करावी लागेल.परिणामी या व्यक्तिने संस्थेकडून घेतलेले पैसे तात्काळ कारवाई करुन परत मिळवून द्यावे,अशी विनंती आपल्या तक्रारीत स्मिता मिरे यांनी केली आहे.
तक्रारीची दखल घेत गिट्टीखदान पोलीसांनी नितेश याला ठाण्यात बोलावून घेतले व त्याला समज दिली. सध्या माझ्याकडे नोकरी नसल्यामुळे मी पैसे परत करु शकणार नसल्याचे तो म्हणाला.मात्र त्याच्याकडे पैसे असून तो विविध इएमआय भरत असल्याचे स्मिता यांनी सांगितले. पोलीसांनी पैसे येताच संस्थेचे पैसे परत करण्याचा दम त्याला दिला आहे.
[स्मिता मिरे,संचालिका ‘सेव्ह स्पीचलेस’-८४२१९७०७४१]




आमचे चॅनल subscribe करा
