फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसेवाभावी संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या अन्नदान वितरणातील अडचणी तात्काळ सोडविणार;रविंद्र ठाकरे

सेवाभावी संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या अन्नदान वितरणातील अडचणी तात्काळ सोडविणार;रविंद्र ठाकरे

Advertisements

नागपूर, दिनांक 10: लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीत गरीब व निराधार नागरिकांना सेवाभावी संस्थांतर्फे भोजन तसेच अन्नधान्याचे वितरण केले जात आहे. सेवावृत्तीने करत असल्याने योगदानाबद्दल प्रशासनातर्फे आभार व्यक्त करतांनाच या वितरणामध्ये काही अडचणी येत असल्यास त्या तात्काळ सोडविण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज येथे दिली.
बचत भवन येथे सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, अतिरिक्त पोलिस आयुक्त निलेश भरणे, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, अविनाश कातडे, श्रीमती आशा पठाण तसेच सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. तसेच जिल्हाबंदी सुद्धा असल्यामुळे परराज्यातील तसेच इतर जिल्ह्यातील कामगार व कष्टकरी नागरिक अडकून पडले आहे. त्यांची निवासाची व्यवस्था विविध ठिकाणी जिल्हा प्रशासनाने केली आहे. अशा ठिकाणी विविध सामाजिक संस्थांतर्फे भोजनासह इतर अत्यावश्यक वस्तूंचे वाटप सुरु आहे. गरजवंत व भुकेल्यांना अन्नदान करण्याची आपली संस्कृती आहे. अशा कठीण परिस्थितीत संपूर्ण जनता आपल्या पाठीशी आहे, हा संदेश सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून दिल्या जात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

लॉकडाऊन व जमावबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांसोबतच मजूर व कष्टकरी अडचणीत सापडले आहे. त्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत. त्यांना स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य वितरित करण्यात येत आहे. त्या सोबत विविध संस्थांनी दिलेल्या निधींमधून अत्यावश्यक साहित्याचे किटसुद्धा जिल्हा प्रशासनातर्फे वाटप करण्यात येत आहे. गरजू व गरजवंत जनतेला मदत करण्याचे धोरण शासनासोबत सर्व सामाजिक संस्थांनी स्विकारले आहे. हे धोरण स्विकारीत असतांना ज्याला खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे, अशा गरजवंतांपर्यंत ती मदत पोहोचावी, अशी अपेक्षा आहे. ही मदत पोहोचवतांना, सामाजिक संस्थांनी गोळा केलेली मदत तसेच भोजन वितरित करतांना जर अडचणी येत असतील तर त्या सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे संपूर्ण सहकार्य केल्या जाईल, अशी ग्वाही ठाकरे यांनी संस्थेंच्या प्रतिनिधींना दिली.
***

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या