फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमसेतू’कार्यालयात जात प्रमाणपत्रासाठी लाच!

सेतू’कार्यालयात जात प्रमाणपत्रासाठी लाच!

Advertisements

काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलने लाच घेताना केली व्हीडीयो रेकॉडिंग

जात प्रमाणपत्र देण्यासाठी राहूल जाधवने घेतली ५०० रुपयांची लाच:जिल्ह्याधिका-यांनी दिले निलंबनाचे आदेश

नागपूर,ता.२४ मे २०२३: जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रातील अधिका-याविरुद्ध काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलने भ्रष्टाचाराचे आरोप करत कारवाईची मागणी केली.सेलच्या पदाधिका-यांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरुन स्टिंग ऑपरेशन करत अधिका-याने पैसे घेतल्याचे पुरावेच जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना दिले.संबंधित अधिका-यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रातून जात प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकारी राहूल जाधव ५०० रुपयांची मागणी करतात.पैसे न दिल्यास दीड ते दोन महिने प्रमाणपत्र मिळत नाही.पैसे देताच अर्ध्या तासात प्रमाणपत्र जारी होतं.शाळा,महाविद्यालयात प्रवेशाचे दिवस असल्याने त्यासाठी प्रमाणपत्रांची गरजे असते.याबाबत सेतू केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलकडे अनेक तक्रारी आल्या होत्या.त्यात तथ्य ही आढळले असे सेलचे अध्यक्ष वसीन खान यांनी सांगितले.

राहूल जाधव यांनी पैसे मागितल्याचा आणि फोन पे द्वारे ३,००० रुपये स्वीकारल्याचे पुरावे सेलच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना दिले.यावर त्यांनी कर्मचा-यांकडे जाधव यांच्याबाबत विचारणा केली.या लाचखोर कर्मचा-यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करुन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

जिल्ह्याधिका-यांनी तक्रारीची दखल घेत तात्काळ या लाचखोर कर्मचा-याच्या निलंबनाचे आदेश दिले. वसीम खान यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले होते.या लाचखोराविरोधात काही सेतू केंद्रांवरुन तक्रारी आल्या आहेत.जिल्हाधिकारी यांनी या लाचखोर कर्मचा-याच्या निलंबनाचे आदेश दिले.

शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक उपाध्यक्ष रमण कलवले,मध्य नागपूर ब्लॉक अध्यक्ष गोपाल पट्टम,मदन गौर,गुड्डू आसिफ,फिरोज खान,सितीज साखरे,जिशान,विजय,सरफराज,सय्यद अद्दू आदी यांचा सहभाग होता.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या