राजकारणी रंगले आरोप-प्रत्यारोपात
नागपूर: शहरातील ‘करोना’विषाणूच्या भीषण दाहकतेत नागपूरातील प्रत्येक नागरिक होरपळत असताना आज सोमवार दि. ३० मार्च रोजी जरीपटका भागात वेगळेच महानाट््य घडले. सॅनिटायझरच्या नावाखाली महापालिकेतर्फे फक्त पाण्याच्या फव्वारणीचा व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झाला. फव्वारणीच्या कॅनमध्ये विषाणूंचा नायनाट करणा-या सोडियम हायपर क्लोराईडच्या ऐवजी फक्त ‘शुद्ध’पाणी छळकत होते.
एका युवकाने याचा व्हिडीयो सोशल मिडीयात व्हायरल केला.यात जरिपटका भागात महापालिकेचे कर्मचारी हे कॅनमधून फक्त पाण्याची फव्वारणी करताना आढळतात आहेत.या व्हिडीयोमध्ये युवकाने माजी स्थायी समितीचे सभापती व सध्याचे आरोग्य समितीचे सभापती विक्की कुकरेजा यांचे नाव त्याने घेतले. कुकरेजा हे जरीपटका भागात निव्वळ जनतेची धूळफेक करीत असल्याचा आरोप या युवकाने केला. महापालिका व सत्ताधारी पक्ष् हे जनतेच्या आरोग्याला घेऊन किती ‘गंभीर’आहेत?असा प्रश्न त्याने उपस्थित केला.
दूसरीकडे सोडियम हायपर क्लोराईड हे कसे असते?हे त्याने या व्हिडीयोमध्ये दाखवले असून, करोना विषाणूशी लढताना जनता ही सर्वतोपरी सहकार्य करीत असताना,त्याच जनतेची फसवणूक मनपा व सत्ताधारी कशी करीत आहेत,असा सवाल त्याने उपस्थित केला.
या गंभीर प्रकरणाने जरिपटकातील नागरिक संतप्त झाले असून, याच भागात करोना पॉझिटिव्हचे रुग्ण आढळ्याने आतातरी प्रशासन व सत्ताधारी गंभीरपणे कामाला लागतील,अशी जनतेची अपेक्ष्ा होती मात्र,ती फोल ठरली. ‘आपण दोघे भाऊ…सगळे मिळून खाऊ’ही वृत्ती आणिबाणिच्या काळातही जर सत्ताधारी सोडणार नसतील तर,येणा-या काळात जनताच याचा हिशेब घेईल,असा ईशारा नागरिक देत आहेत.
आरोप बिनबुडाचे-विक्की कुकरेजा
माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. या फव्वारणीत आम्ही सोडियम हायपर क्लोराईडचाच वापर करीत आहोत.ही वेळ राजकारण करण्याची नाही. जनतेसोबत उभे राहण्याची आहे. राजकारण करण्यासाठी संबंध आयुष्य पडले आहे.ही वेळ सर्वांनी मिळून जनतेची सेवा करण्याचा आहे. त्या युवकाविरुद्ध आम्ही जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून,व्हिडीयोची सत्यता तपासली जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
