फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसुरमणी पं.प्रभाकर धाकडे गुरुजींच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धांजलीपर संगीतमय कार्यक्रम २९ जून ला

सुरमणी पं.प्रभाकर धाकडे गुरुजींच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धांजलीपर संगीतमय कार्यक्रम २९ जून ला

Advertisements

ऑस्कर सांस्कृतिक कलावंत अकादमीचा उपक्रम

रक्तदान शिबिराचे आयोजन

नागपूर,ता.२२ जून २०२३: सांगितिक जगतामध्ये सुरमणी पं.प्रभाकर धाकडे गुरुजींचे स्थान हे सर्वश्रेष्ठ स्थानी असून, त्यांनी त्यांच्या हयातीत अनेक पट्टीचे शिष्य घडवले.देहरुपाने जरी ते आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांचे संगीत हे अजरामर आहे.शेकडो बुद्धगीतांपासून तर हळूवार गजलेपर्यंत,शेकडो भाव गीतांपासून तर प्रायव्हेट अल्बमपर्यंत हजारो गीतांना त्यांनी अजरामर अश्‍या चाली बसवल्या आहेत.मुंबईतील चित्रपटसृष्टितील अनेक पार्श्वगायक यांनी धाकडे गुरुंजीच्या चालीमध्ये अनेक गीते स्वरबद्ध केलीत व उपकृत झालेत.अश्‍या या महान संगीतकार व व्हायोलीन वादक सुरमणी पं.प्रभाकर धाकडे गुरुजींच्या स्मृतिप्रित्यर्थ,गुरुवार दिनांक २९ जून रोजी ऑस्कर सांस्कृतिक कलावंत अकादमीतर्फे श्रद्धांजलीपर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नार्थ अंबाझरी रोड,झांशी राणी चौक,सिताबर्डी येथील अमृत भवनात सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात धाकडे गुरुजी यांचे काही निवडक शिष्य गुरुजींच्या स्वरबद्ध केलेल्या रचना सादर करतील.कार्यक्रमात गायक राजेश बुरबुरे,छाया वानखेडे,अहिंसा तिरपुडे,आकांक्षा नगरकर,रचना खांडेकर(पाठक) यांच्यासारखी सुप्रसिद्ध गायक मंडळी आपल्या सुरेल गायकीतून गुरुजींना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करतील.वादक भुपेश सवाई,श्रीकांत पिसे,निशिकांत देशमुख,प्रमाेद बावणे,गणेश ठमके,राजेश ठाकूर हे साथ संगत करतील.

कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून माजी महापौर प्रवीण दटके,गिरीश पांडव,किशोर भोयर(जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी)सुप्रसिद्ध गायक एम.ए.कादर,पंकज मेश्राम,रामनारायणजी मिश्र,डॉ.महेश तिवारी,प्रशांत ढाबरे,सुर्यप्रकाश सिंह बैस,अशोक जांभुळकर तसेच शहरातील इतर मान्यवर उपस्थित राहतील.

याप्रसंगी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.गुरुजींच्या स्मृतिप्रित्यर्थ सामाजिक दायित्वाचे निर्वाहरण करण्यासाठी रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवण्याचे आवाहन, ऑस्करचे अध्यक्ष पुरुषोत्तम ताईस्कर(पी.कुमार) यांनी केले आहे.यावेळी ऑस्कर सदस्यांना भविष्यात मिळणारे लाभ याविषयी मार्गदर्शन केले जाईल तसेच नोंदणीकृत सदस्यांना विमा पॉलिसी वितरीत करण्यात येईल.

संस्थेला आपल्या स्थापनेपासून केवळ तीन वर्षातच प्रभावी व अत्यंत चांगल्या कामामुळे दोन शासनमान्य प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत.लवकरच तिसरे प्रमाण पत्र देखील मिळणार असून, यांनतर संस्थेशी जुळलेल्या कलवतांना विविध योजनांचा लाभ घेता येईल.यात पेंशन योजना,मानधन योजना इत्यादीचा समावेश असेल,अशी माहिती पी.कुमार यांनी पत्रकाद्वारे दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष राजू व्यास,कोषाध्यक्ष प्रशांत खडसे,सचिव रिनेश जाणे,सहसचिव शेखर सोमकुवर,राजेश गजभिये,संगीता गावंडे परिश्रम घेत आहेत.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या