
वाठोडा पोलीस ठाण्यात लागली सेनिटायझिंग टनेल मशीन
नागपूर,१७ मार्च: नागपुर शहरातील पोलिस कर्मचारी, अधिकारी लोकडाउन मधे अहोरात्र काम करीत असून कोरेना पासून पोलिसांचे तसेच पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांचेही संरक्षण व्हावे या हेतूने नागपुर शहरातील विविध पोलिस ठाण्यात सेनेटायजिंग टनेल मशीन बसविन्यात आल्या. आज नागपुर शहरातील वाठोडा पोलिस ठाण्यात हे यंत्र बसविन्यात आले.
झोन चारच्या पोलिस उपायुक्त निर्मला देवी यांचा हस्ते या सेनेटायजिंग टनेल यंत्राचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी वाठोडा पोलिस ठाण्यातचे पोलिस निरीक्षक बापू ढेरे ,पोलिस विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पोलिस उपायुक्त निर्मला देवी यांनी झोन चार मधे येणाऱ्या सर्व पोलिस ठाण्यात अश्या प्रकारचे यंत्र बसविन्यात येणार असल्याचे सांगितले.
तर पोलिस विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शिंदे यांनी आतापर्यंत नागपुर शहरात 32 पैकी 9 पोलिस ठाण्यात सेनेटायजिंग टनेल यंत्र बसविन्यात आल्याचे सांगितल. शिवाय पोलिस विभागाचा वतीने विविध मार्गाने कोरेनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलिसतर्फे प्रयत्न होत असल्याचे सांगितले.
सेनेटायजिंग टनेल या यंत्रामुळे पोलिस कर्मचारी तसेच नागरिकांना फायदा होणार असल्याचे सांगून कर्तव्यावर असणाऱ्या सर्व पोलिस कर्मचार्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवावे असे आवाहन पोलिस निरीक्षक बापू ढेरे यांनी यावेळी केले.




आमचे चॅनल subscribe करा
