फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसुधाकर कोहळे यांनी गाठले गडकरींचे निवासस्थान

सुधाकर कोहळे यांनी गाठले गडकरींचे निवासस्थान

Advertisements

नागपूर: दक्षिण नागपूरातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले दक्ष्णि नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे हे बुधवारी आपल्या हजारो समर्थकांसह थेट केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले.

यावेळी गडकरी यांच्याकडे त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. कोहळे यांच्या समर्थकांनी थेट पक्ष् विरोधातच नारेबाजी केली. ‘दक्षिण नागपूरच्या सामान्य कार्यकर्त्याचा अपमान,बंडखोर मित्राचा सन्मान’अशी फलके घेऊन त्यांनी उदयनगर चौकात बराच वेळ घोषणाबाजी केली. मंगळवारी भाजपची १२५ उमेदवारांची यादी जाहीर झाली होती.त्यात दक्षिण नागपूरमधून कोहळे यांच्या ऐवजी मोहन मते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.यानंतर कोहळे समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी एकत्रित येऊन पक्ष्ाच्या या निर्णया विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली.कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्याची भावना कोहळे यांनी प्रसार माध्यमांकडे बोलताना मंगळवारी व्यक्त केली होती.

गडकरी यांनी कोहळे यांची समजूत काढली तसेच निराश न होण्याचा सल्ला दिला. हा माझ्या एकट्यावर नव्हे तर कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय असल्याचे कोहळे यांनी गडकरी यांना सांगितले. दरम्यान,बुधवारी भाजपच्या सर्व घोषित उमेदवारांनी गडकरी यांची भेट घेतली. दरम्यान,दक्षिण नागपूर मधून उमेदवारी मिळालेले मोहन मते यांना कोहळे यांच्या नाराजी विषयी बोलता,कोहळे व त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी मी लवकरच दूर करील असे ते म्हणाले. सर्व कार्यकर्ते मिळून प्रामाणिकपणे पक्ष्ाचे काम करतील असा विश्‍वास त्यांनी माध्यमांकडे व्यक्त केला

कोहळे यांच्या भूमिकेकडे लक्ष्-
गडकरी यांच्याशी भेटल्यानंतर देखील कोहळे यांची नाराजी दूर झाली असावी असे वाटत नसल्याची चर्चा आहे. शुक्रवार दि.४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. कोहळे हे मुख्यमंत्री तसेच सर्व इतर उमेदवारांसह संविधान चौकात उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी,ते वेगळा निर्णय घेऊ शकतात,अशी चर्चा सध्या रंगली आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या