

खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार प्रारंभ
दिली संजय दत्तला ‘जादू की झप्पी’
नागपूर, १७ डिसेंबर: सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुखविंदर सिंग यांचे अनेक गाणे हे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले.तरुणाईला त्यांच्या गाण्यातील ठेक्यांनी वेड लावले आहे.या गायकाच्या गायकीसोबतच त्याच्यातील माणूसकीचेही चर्चे त्याच्या चाहत्यांना मुखोद्गगद आहेत.आपला आवडता गायक उपजराजधानीत आला असल्याचे म्हटल्यावर तरुणाईने आज गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडलेत,अखेर सर्व बाजूची दारे सुरक्षा रक्षकांना कार्यक्रम सुरु होताच, बंद करावी लागली.खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा पहीला दिवस हा फक्त आणि फक्त ‘सुखविंदर सिंग’ याला ऐकणे आणि त्याच्या गाण्यांच्या तालावर नाचणे एवढेच भान आज खासदार सांस्कृतिक महोत्वात आलेल्या तरुणाईला राहीले.‘सब कुछ सुखविंदर’ असाच माहोल या महान गायकाच्या सानिध्यात आज नागपूरकरांनी अनुभवला,हा गायक गळ्यातून नव्हे तर ‘दिल से रे….’गात राहीला आणि नागपूरकर श्रोत्यांना वेड लावत राहीला,ईश्वर देशमुख शारिरीक महाविद्यालयाच्या बाहेर, चार ही बाजूने जे स्क्रीन लावले होते,त्यासमोर देखील वाहन चालकांनी आपापली वाहने थांबवून सुखविंदर सिंग यांच्या गाण्यांचा आणि आतील माहोलचा आनंद लृटला.
यावेळी समोर प्रेक्षकांमध्ये बसलेले केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आपल्या संपूर्ण कुटुंबियांसोबत सुखविंदर सिंग यांच्या गाण्याचा आनंद तर घेतच होते मात्र त्यांची चिमुरडी नातवंडे हे देखील ठेका धरीत मान डोलवित नाचताना स्क्रीनवर झळकत होती.यावेळी सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त याने देखील गडकरी यांच्या बाजूला बसून कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लृटला.

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मधील मुन्नाभाईच्या ‘जादू की झप्पी’ ने एकेकाळी खूपच माहोल केला होता. सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांनी मुन्नाभाई संजय दत्तला हीच ‘जादू की झप्पी’ देऊन साहित्य, संस्कृती आणि कलेचा संगम असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला शानदार सुरुवात केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व इतर मान्यवरांनाही सुखविंदर सिंह यांनी ‘प्यार की झप्पी’ दिली आणि ‘जिनके सर हो इश्क की छॉंव ….. चल छैय्या छैय्या’ या गीताच्या माध्यमातून नागपूरकरांवर प्रेमाचा वर्षाव केला.
केंद्रीय मंत्री यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव – २०२१ चे शुक्रवारी शानदार उद् घाटन झाले. महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सुरू झालेल्या या महोत्सवाला ‘मुन्नाभाई’ फेम बॉलिवुडचे प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांच्या हस्ते उद् घाटन झाले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री. नितीन गडकरी व आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार दत्ता मेघे, विजय दर्डा यांच्यासह आमदार, माजी आमदार व आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
आपल्या उद् घाटनपर भाषणात नितीन गडकरी म्हणाले, की कोरोनाचा दोन वर्षाचा काळ कठीण होता. अनेक आप्तजनांना अापण मुकलो. देवाच्या आशीर्वादाने आपण त्यातून बाहेर निघालो. त्यामुळे नियमांचे पालन करायचे आहे. साहित्य, संस्कृती, कला, इतिहास ही आपल्या समाजाचा ताकद असून ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान ही शक्ती आहे. पण केवळ शक्तीच्या भरोशावर समाजाला पुढे नेत असताना साहित्य, संस्कृतीला विसरू शकत नाही. कलाकारांना सन्मान व्हावा, नवीन पिढीपर्यंत हे संस्कार पोहोचावे म्हणून आहे हा खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू केला.
नितीन गडकरी यांनी संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त यांच्या मैत्रीचा उल्लेख करताना संजय दत्त यांनी अनेक संकटांचा सामना केला पण आपली माणुसकी सोडली नाही, असे सांगितले. सुनील व नर्गिस दत्त यांचे चित्रपट सृष्टीत मोठे योगदान असल्याचे सांगितले.
साहित्य, संस्कृती, कला हे समाज संस्कार, समाज प्रबोधनाचे साधन आहे. त्यातून आपल्या चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. खासदार सांस्कृतिक महोत्सव हा साहित्य, संस्कृती व कलेचा हा यज्ञ आहे. आपण त्यात सहभागी होऊन आहुती देतो आहोत. हा महोत्सव लोकांना प्रेरणा देईल, भावी पिढीला संस्कार देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सांस्कृतिक महोत्सव केवळ नागपुरापर्यंत मर्यादित न राहता तालुका स्तरावर पोहोचावा, त्यासाठी सर्वप्रकारचे सहाय्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल वसंत खंडेलवाल व चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. साची अरमरकर या मुलीने संजय दत्त यांचे केलेले पोर्टेट त्यांना भेट दिले. प्रास्ताविक प्रा. अनिल सोले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कुळकर्णी यांनी केले.
कैसे हो मामू…
‘मुन्नाभाई’, ‘संजु’ अशा अनेक चित्रपटामधून आपल्या अभिनयाने लोकप्रियतेचा शिखर गाठलेले सुप्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांनी ‘कैसे हो मामू…’ अशा शब्दात नागपूरकर रसिकांची चौकशी केली आणि आपल्या खास दमदार शैलीतील डॉयलॉगबाजीने रसिकांची मने जिंकली. देशासाठी, लोकांसाठी आणि विकासासाठी काम करणारे वडील संजय दत्त यांच्यानंतरचे नितीन गडकरी हे दुसरे नेते मी पाहिले. नितीनजी माझे मोठे भाऊ आहे. त्यांच्यासाठी माझी ‘जान हाजिर है’ असे सांगताना संजय दत्त यांनी ‘मुन्नाभाई’ चा तिसरा पार्ट लवकरच काढला जावा आणि त्यासाठी नागपूरकरांनी राजू हिरानी यांना गळ घालावी, अशी विनंती केली. येरवडा तुरुंगात असताना तेथील हवालदारांनी मराठी शिकवायचे खूप प्रयत्न केले पण मी शिकू शकलो नाही, अशी कबूली देताना संजय दत्त्र यांनी आपल्याला भाषण देत नाही. त्यामुळे केवळ डायलॉगच म्हणणार आहे, असे उत्तरप्रदेशचा एक किस्सा सांगत सांगितले. ‘संजू’ चित्रपटातल्या इतर सर्व गोष्टी विसरून जा. आईवडिल आणि मोठ्यांचा सन्मान कसा करायचा, हाच धडा घ्या, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.
……….
आज ”कैलाश खेर अँड कैलासा’
जय जय कारा, वारी वारी, अगड बम अशी अनेक गीते आपल्या खड्या आवाजाने लोकप्रिय करणारे भारतीय लोकसंगीत आणि सुफी संगीताचे सुप्रसिद्ध गायक, संगीतकार कैलाश खेर यांनी स्थापन केलेल्या ‘कैलासा’ बँडचा लाईव्ह परफॉर्मन्स आज, १८ डिसेंबर रोजी नागपूरकरांना अनुभवायला मिळणार आहे. पं. कुमार गंधर्व, पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. भिमसेन जोशी आणि कव्वाली गायक नुसरत फतेह अली खान यांच्या गायकीचा प्रभाव असलेल्या कैलाश खेर यांना २०१७ साली पद्म श्रीने सन्मानित करण्यात आले असून फिल्मफेअर अवॉर्डदेखील त्यांना प्राप्त झाला आहे.




आमचे चॅनल subscribe करा
