

नूपूर संगीततर्फे सादर कार्यक्रमाला रसिक मनाचा उदंड प्रतिसाद
नागपूर: महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे ‘दिवाळी पहाट’. मराठी माणसाच्या दिवाळी साजरी करण्याच्या पारंपारिक पद्धतीत दिवाळी पहाटलाही विशेष महत्व आहे. कितीही व्यग्र दिनक्रम असला तरी मराठी रसिक अशा कार्यक्रमासाठी काही वेळ हमखास बाजूला काढून ठेवतोच. थंडीची हळूवार झूळूक अंगावर झेलत रसिक श्रोते पहाटेच्या गारव्यात स्वर माधुर्याचा आनंद या कार्यक्रमात घेतात. सुंदरबन ले-आऊटमधील हनुमान मंदिराच्या प्रांगणात नूपूर संगीततर्फे सादर झालेल्या ‘दिवाळी पहाट’चा असाच आनंद रसिक मनाने शनिवारी घेतला.
कार्यक्रमाची सुरवात पद् मा रावले यांनी ‘ब्रम्हा विष्णू महेश’या भक्ती वंदनाने केली. यानंतर चंदा गहाणे हिने ‘दिपावली मनाये सुहानी’हे गीत सादर करुन वातावरणात रंग भरला. यानंतर रचना खांडेकर-पाठक यांनी ‘केव्हा तरी पहाटे’हे अजरामर गीत सादर करुन रसिकांची उस्फूर्त दाद मिळवली. उज्वला नरखेडे यांनी ‘चांदणे शिंपित जाशी’गीत समसरुन गायले. दिपाली जोगळेकर यांनी ‘फूलले रे क्ष् ण माझे’गीत सादर करुन श्रोत्यांच्या मनात उल्हास भरला. करुणा दांडेकर यांनी ‘चांदणे फूलांनी’गीत सादर केले. मिलिंद कोरटकर यांनी ‘भातूकलीच्या खेळा मधली राजा आणि राणी’हे भावपूर्ण गीत उत्कृष्टरित्या सादर केले. श्रोत्यांच्या मनात रुंजी घालणारे‘अधीर मन झाले’हे गीत भाग्यश्री शिंगरु यांनी सुरेलतेने सादर केले. अभय पांडे यांनी गायलेल्या‘कितीदा नव्याने’या गीताला वन्स मोर मिळाला. लक्ष्मी बर्वे यांनी ‘मी वार्याच्या वेगाने आले’ हे गीत सादर केले. पूजा पाठक यांनी ‘ये दिल और उनकी निगाहो के साये’हे सुमधूर हिंदी गीत सादर केले. विवेक समर्थ यांनी ‘जो तुमको हो पसंद वही’ मुकेश यांनी गायलेले हे गीत सादर करुन रसिकांची दाद मिळवली. भावना क्ष्ीरसागर यांनी ‘ही चाल तुरुतुरु’हे उडत्या चालीचे गीत सादर करुन कार्यक्रमात रंगत भरली.
‘

आपकी आंखो मे कूछ’हे युगल गीत रचना व अभय पांडे यांनी सादर केले. ‘संधीकाळी या अश्या’हे युगल गीत अभय पांडे व भाग्यश्री शिंगरु यांनी सादर केले.‘आजा सनम मधूर चांदनी में हम’हे युगल गीत विवेक समर्थ व करुणा दांडेकर यांनी सादर केले. ‘जहा मैं जाती हूं वही चले आते हो’हे युगल गीत मिलिंद कोरटकर व कांचन भालेकर यांनी सादर करुन टाळ्यांचा कडकडाट मिळवला. कार्यक्रमाची सांगता रचना खांडेकर-पाठक यांनी गायलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’या देशभक्तीपर गीताने झाले. कार्यक्रमाची संकल्पना रचना खांडेकर-पाठक यांची होती. संगीत संयोजन पवन मानवटकर यांचे होते. की-बोर्डवर पवन मानवटकर, ढोलक आणि तुंबावर रघूनंदन परसतवार तर ऑक्टोपॅडवर अशोक ठवरे यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. नगरसेविका विशाखा मोहोड यांनी आभार मानले.
दिवाळीचा सण हा सर्जनशीलतेला भरभरुन वाव देणारा सण आहे. हीच सर्जनशीलता दिवाळ-पहाटचे आगळे-वेगळे व्यासपीठ मनोरंजनासाठी रसिकांना उपलब्ध करुन देते. दिवाळी-पहाट कार्यक्रमातून रसिक मनाला मिळणारी सांस्कृतिक ठेव खूप काही देऊन जाते. ही परंपरा या ही वर्षी तेवढ्याच उत्साहाने सुंदवन ले-आऊट मधील रसिक श्रोत्यांनी जपली.मराठी-हिंदी गीत-संगीताने आतेप्रोत भरलेल्या या दिवाळी पहाटला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.




आमचे चॅनल subscribe करा
