फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजसिताबर्डी उड्डाणपूलावर भीषण अपघात:दोन गंभीर

सिताबर्डी उड्डाणपूलावर भीषण अपघात:दोन गंभीर

Advertisements
वोल्सवॅगन भरधाव कारने ओवरटेक करणे भोवले

नागपूर,ता.२८ जुलै २०२५: आज सायंकाळी ५.४५ च्या सुमारास २३ वर्षीय अक्षय जगुन धुर्वे राहणार मुसनी,भरदागढ,रामपूर जिल्हा छिंदवाडा(मध्यप्रदेश)हे त्याची बोलेरो पिकअप गाडी क्र.एम.पी २८ जी ४४३९ ने पोलीस ठाणे बजाजनगर हद्दीत, राहाटे कॉलोनी चौकाकडून आदिवासी गोवारी उड्डाणपूलावरुन सीताबर्डीकडे जात असताना,लोकमत चौकाजवळ समोरुन येणा-या ग्रे रंगाच्या वोल्सवॅगन कार क्र.एम एच ४६ ए एल ६४४७ च्या चालकाने भरधाव वेगाने,निष्काळजीपणे व धोकदायकरित्या कार चालवून त्याच्या समोरील पांढ-या रंगाच्या  टाटा झेस्ट कार क्र.एम.एच ४० बी.जी ४९३१ या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्ना भीषण अपघात घडवून आणला.
या धडकेमुळे वोल्सवॅगन कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्याची कार यू टर्न झाली व टाटा झेस्ट गाडीला धडकली.या अपघातामध्ये फिर्यादी २३ वर्षीय अक्षय जुगन धुर्वे तसेच टाटा झेस्ट कारचा चालक पिंटू पुरुषोत्तम दाढे वय वर्ष ३६ राहणार महर्षी दयानंद नगर,बिनाकी रोड,पाचपावली हे तसेच टाटा झेस्ट गाडीतील इतर तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले.

या अपघातात ओव्हरटेक करणारा वोल्सवॅगन कारचा चालक व त्याच्या सोबत असलेला ईसम हे दोघेही गंभीर जखमी झाले.या अपघातात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले.किरकोळ जखमी यांच्यावर उपचार करण्यात आले असून उपचाराकरिता आयुष्यमान रुग्णालय सीताबर्डी येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे बजाज नगर येथे पोलिस हवालदार चामाटे यांनी आरोपी वोल्सवॅगन कार चालकाविरुद्ध  भारतीय न्याय संहितेची कलम २८१,१२५ (अ),३२४(४)(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सुरु आहे.
(छायाचित्र सौजन्य ’नागपूर टूडे’)
……………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या