फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसिटीझन फोरमद्वारे खड्ड्यांचे‘ नामकरण’ गाजले मनपा सभागृहात

सिटीझन फोरमद्वारे खड्ड्यांचे‘ नामकरण’ गाजले मनपा सभागृहात

Advertisements

सत्ताधा-यांनी फोडले प्रशासनावर खापर

गेल्या ३ वर्षांपासून खड्डयांची डागडूगीच केली नसल्याची प्रशासनाची कबूली!

नागपूर,ता. ८ ऑगस्ट : आज पार पडलेल्या मनपाच्या सभेत अनेक नगरसेवक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत तसेच नागरिकांना होणा-या त्रासाबाबत बोलताना नुकतेच सिटीझम फोरमच्या युवा कार्यकर्त्यांतर्फे मनपा प्रशासनाचे लक्ष् आकर्षित करण्यासाठी शहरभरातील रस्त्यांना महापौर,आयुक्तांपासून तर सत्ताधारी पदाधिकारी यांचे नाव वेगवेगळ्या खड्डयांना देण्याच्या उपक्रमाचीही चांगलीच चर्चा रंगली.महापौर तसेच सत्ता पक्ष् नेते अविनाश ठाकरे यांनी देखील याचा विशेष उल्लेख करीत याचे संपूर्ण खापर प्रशासनावर फोडले.

विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांनी या प्रश्‍नावर नोटीस दिली होती तर शिवसेनेच्या गटनेत्या वैशाली नारनवरे यांनी देखील हाच प्रश्‍न उचलून धरला होता.त्यांच्या प्रभाग क्र.६ मधील रस्त्यांची अक्ष् रश: चाळण झाली असल्याचे त्या म्हणाल्या.मनपाचा हॉट मिक्स प्लान्ट हा पावसाळ्यात बंद असतो.या खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून पावसाळ्यात पाण्याखाली हे खड्डे गेलेले असतात,त्यामुळे अपघात ही वाढले.
मात्र तरीही प्रशासन दावा करतो की शहरातील ३३६० खड्डे बुजवले.एका मार्गावर तर ‘आपली बस’खड्ड्यामुळे लडखडली त्यामुळे त्या बसचा मार्गच बदलला.यामुळे प्रवाश्‍यांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे नारनवरे यांनी सांगितले.या झोनचे अभियंता कमलेश चव्हाण हे फोनच उचलत नाहीत.वारंवार कॉल करावे लागतात मात्र मिस कॉल बघूनसुद्धा रिकाॅल करीत नाही अशी तक्रार करताच सत्ता पक्ष् नेते अविनाश ठाकरे यांनी रस्ते,गडर,पाणी यासारखे प्रश्‍न हे प्रशासनस्तरावर सोडवले जाणे अपेक्षी त असताना सभागृहात चचेेेेेेेला येतात यावरुनच प्रशासन प्रश्‍न सोडवत नाहीत हे लक्ष्ात येतं अशी टिका केली.

डांबर आलेला नाही,लेबर उपलब्ध नाही,गाड्या नाहीत असे उत्तर प्रशासनस्तरावर नगरसेवकांना मिळतं.दूर्गावती चौक,समर्पण हॉल,वैशाली नगर येथील खड्डे बुजवले असल्याचा प्रशासनाने दावा केला मात्र या मार्गावरील एक ही खड्डा प्रशासनाने बुजवला नसल्याचा आरोप नारनवरे यांनी केला.खड्डे बुजवताना नगरसेवकांना का माहिती दिली जात नाही?नागरिकांच्या सह्या तरी प्रशासनाने घेतल्या का?त्यांच्याशी संपर्क केला का?जनता शेवटी नगरसेवकांच्याच तोंडावर येते,असे त्या म्हणाल्या.

कमलेश चव्हाण यासारखे अभियंते मनपाला लाभले असल्याने या शहराचा विकास होणे नाही,अशी हताशा त्यांनी व्यक्त केली.काश्‍मीर रोडवर महापौरांनी स्वत: चारचाकी घेऊन जावी त्यांना वाळवंटात ऊंटावरुन जात असल्याचा भास होईल असे बसपचे नगरसेवक मोहम्मद जमाल म्हणाले.

६ महिन्यांपूर्वीच २ ऑक्टोबर २०२० रोजी मनपा आयुक्तांना कमलेश चव्हाण यांच्या तक्रारींबाबत पत्र दिले होते पण अद्याप या अभियंत्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे बसपचे नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांनी सांगितले.काँग्रेसचे नगरसेवक हरीश ग्वालबंशीने सिटीझन फोरमचे युवा कार्यकर्ते तर या शहरातील खड्ड्यांना महापौर,आयुक्तांचे नाव देत असल्याचे सांगत त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे मनपाची प्रतिमा खराब होत असल्याचे सांगितले.

यावर महापौरांनी खड्ड्यांच्या प्रश्‍नावर प्रशासनाने अहवाल सादर करावा असे निर्देश दिले.यावर प्रशासकीय अधिकारी अजय पोहेकर यांनी मान्य केले ही वस्तुस्थिती आहे.गेल्या २-३ वर्षात रस्त्यांचे पुर्नभरण किवा डांबरीकरणाचे काम मनपाच्या हॉट मिक्स प्लान्टतर्फे करण्यात आले नाही.करोनामुळेही रस्त्यांचे रिन्यूअल ही झाले नाही.

२०१५ ते २०१९ दरम्यान दर वर्षी ४० टक्क्यांनी खड्डयांचे प्रमाण वाढले आहे मात्र ३०-४० क्युबिक मीटरचा मनपाचा हॉट मिक्स प्लान्ट हे खड्डे भरण्यास असमर्थ आहे.पाऊस थांबला की येत्या दीड महिन्यात रस्त्यावरील हे खड्डे बुजवण्याची उपाययोजना सुरु होईल.
यावर बोलताना विराेधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांनी खड्डे बुजवण्यात प्रशासन हे अयशस्वी ठरले.अाजच रेल्वे स्टेशन समोरील खड्डयांंंमध्ये केवळ माती आणि चुरा टाकून खड्डे बुजवल्या जात असल्याचे दृष्य मी पाहिले.सिटीझन फोरमवाले माझे-तुमचे नाव या खड्ड्यांना देत आहेत.मनपा प्रशासनाने त्या-त्या ठिकाणी फलक लावावा हे खड्डे बुजवण्याची कोणाची जवाबदारी आहे?.नासुप्र,सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय महामार्ग कि मनपाचे हे खड्डे आहेत!

यावर बोलताना माजी सत्ता पक्ष् नेते संदीप जाधव यांनी निधी नाही,व्यवस्था नाही असे पोहेकर सांगतात,त्यांना झोननिहाय खड्ड्यांची यादी मागितली असता अद्याप ती यादी मिळाली नाही,धरमपेठ झोनच्या अधिका-यांनी

अशी यादी उपलब्ध केली नसल्याची तक्रार त्यांनी केली.यावर बोलताना स्थायी समितीचे अध्यक्ष् प्रकाश भोयर यांनी मनपा प्रशासनाने कोणकोणते रस्ते हे मनपाचे आहे याची माहिती जनतेला द्यावी,असे सांगितले.

पिंटू झलके यांनी शहरात अनेक विभागाचे रस्ते आहेत.मनपाच्या मालकीचे किती किलोमीटरचे आहेत?अशी विचारण करता १४९१ किमी रस्ते हे मनपाच्या मालकीचे असल्याचे पोहेकर यांनी सांगितले.यावर अविनाश ठाकरे यांनी या १४९१ किमी पैकी गेल्या ३ वर्षात किती रस्त्यांचे मेन्टनेन्स केलं?अशी विचारणा केली. लायबिलीटी संपल्यानंतर किती रस्ते शिल्लक आहेत,असा प्रश्‍न विचारला.

यावर सर्व झोनकडून माहिती गोळा करुन सभागृहात सादर करण्याचे प्रशासनाने सांगितले.संदीप जाधव यांनी कंत्राटदारांवर कारवाई होईल का?असा प्रश्‍न उपस्थित केला.पिंटू झलके यांनी डिफेक्ट लायबिलीटीमध्ये किती रस्ते खराब आहेत?अशी विचारणा केली.माजी महापौर नंदा जिचकार यांनी देखील एमएसईबीने चांगले रस्ते खोदून ठेवले असल्याची तक्रार केली.
अविनाश ठाकरे यांनी या वर्षीच्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात जो निधी रस्ते विकास कार्यक्रमासाठी खर्च झाला त्याची माहिती मागितली.यावर अजय पोहेकर यांनी नवीन कामे सुरु व्हायची आहेत त्यामुळे आज तरी काही सांगता येणार नसल्याचे सांगितले.निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे ते म्हणाले.

१५७ कोटींचे काम तेवढे राज्य सहायता निधीतून झाले असल्याचे ते म्हणाले.ठाकरे यांनी मनपाची प्रतिमा प्रशासनाच्या या कारभारामुळे खराब होत असून खड्ड्यांना आमची नावे दिली जात आहे.आपण नागरिकांकडून कर घेतो मात्र त्यांना देतो काय?खड्ड्यांना जवाबदार कोण हे जनतेला कळलेच पाहिजे त्यामुळे आयुक्तांनीच यावर निवेदन द्यावं.अशी विनंती महापौरांना केली.

यावेळी तांत्रिक बिघाडामुळे प्रशासनाचा आवाज ऐकू येत नसल्याने आभा पांडे यांनी दुस-या दिवशी याच प्रश्‍नावर सभा घेण्याची विनंती महापौरांना केली.जनतेच्या जिविताशी निगडीत हा खूप गंभीर प्रश्‍न असल्याचे त्या म्हणाल्या.

यावर बोलताना आयुक्तांनी मागच्या वर्षी करोना काळात काम सुरु करु नये असे आदेश राज्य सरकारनेच दिले असल्याचे सांगितले.जीपीसी निधी थांबवला.जून-जुलैमध्ये शिथिलता आली मात्र त्यावेळी मनपाच्या अपेक्ष्ेप्रमाणे आर्थिक वसूली झाली नाही.किती काम सुरु करु शकतो हे निर्धारित करुन ५ हेडमध्ये ६५ कोटींच्या कामांना मंजुरी दिली.यानंतर दुस-या लाटेत यंत्रणा अडकली.आता पावसाळा सुरु झाला.मागच्या २ वर्षांच्या तुलनेत जास्त आर्थिक तरतूद या वर्षीच्या बजेटमध्ये केली असल्याचे त्यांनी सांगितले.
नुसती मनपाच नव्हे तर करोनामुळे नासुप्र,सार्वजनिक बांधकाम विभाग इ.विभागांकडे देखील आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे.पीडब्ल्यूडी,एनआयटी इ.सर्वच विभागांनी नवीन रस्ते निर्माण करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.या वर्षी १४९१ किमीच्या रस्त्यांच्या कामांसाठी वेळेचे निर्धारण केले जाईल,असे त्यांनी सांगितले.

यावर मनपाचा अखर्चित निधी तातडीने रस्त्यांमधील खड्ड्यांसाठी खर्च करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.दररोज वृत्तपत्रात मनपाची प्रतिमा खराब होत आहे.खड्ड्यांची जवाबदारी कोणाची?प्रशासनाची कि नगरसेवकांची?असा प्रश्‍न महापौरांनी केला.जनतेच्या कराच्या पैश्‍यातून शासनाचा पगार घेणारे अधिकारी हे आपल्या कामाप्रती प्रामाणिक नसल्याचा संताप महापौरांनी व्यक्त केला.नवे काम नाही तर जुनेच खड्डे बुजवण्याचे काम करायचे आहे.३ वर्षांपासून प्रशासनाने खड्ड्यांकडे लक्ष् च दिले नाही.मला अधिका-यांची चांगली साथ मिळाली असे मनपा आयुक्त बोलू शकत नाही आहेत.आयुक्तांनी इतर सगळ्या विभागांना खड्ड्यांच्या संदर्भात ताकीद पत्र देण्याची सूचना महापौरांनी केली.तरी त्यांनी काम नाही केले तर कॉलिंग लेटर द्या.

सोशल मिडीयावर होणारी बदनामी थांबवायची असेल तर प्रशासनाला शहरातील खड्डे बुजवावेच लागतील.यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावाच लागेल.निधीच्या समायोजनाबाबत स्थायी समितीसोबत बैठक घ्या.लवकरात लवकर काम सुरु करा.येत्या ७ दिवसात प्रशासकीय कारवाई पूर्ण करा.

अभियंता कमलेश चव्हाण यांच्याविषयी नगरसेवकांच्या अनेक तक्रारी आहेत.आयुक्तांनी त्वरित त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा.खड्डे बुजवले अशी चुकीची माहिती त्यांनी दिली त्यांच्यावर त्वरीत कारवाई करा असे महापौर म्हणाले.निगम आयुक्तांनी याची जवाबदारी घ्यावी असे महापौर म्हणाले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या