

खासगी रुग्णालय प्रशासनाला धमकावणारे प्रकरण
नागपूर,ता. ११ जुलै: शहरातील खासगी रुग्णालयांच्या संचालकांना विशिष्ट हेतूने धमकावणारे, खोट्या तक्रारी करणारे एक रॅकेट सक्रीय असून यात महानगरपालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार यांचाही समावेश असल्याची माहिती चर्चेला आली आहे.
विशेष म्हणजे,काही चर्चित व्यक्तींची बदनामी करुन त्यांचा राजकीय गेम करण्याचा कट रचण्याचे संभाषण असलेली ऑडियो क्लिीप पोलिसांना मिळालेली आहे. त्या क्लिीपमधून साहिलचे कनेक्शन पुढे आल्याची माहिती आहे. साहिल सय्यद आणि गंटावार या दोघांच्या अर्थपूर्ण संबंधाच्याही पोलिसांना तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.यामुळे पोलिस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्येय यांनी गुन्हे शाखेला गुरुवारी चौकशीचे आदेश दिले.मानकापूर पोलिसांनी एलेक्सिस रुग्णालयाचे डॉ.तुषार गावडे यांच्या तक्रारीवरुन नुकतेच साहिल सय्यद आणि त्याच्या पाच ते सात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मनपा कनेक्शन-
एका महिलेच्या तपासणी अहवालाच्या मुद्दावरुन साहिल आणि त्याच्या साथीदारांनी रुग्णालयात गोंधळ घातला होता. डॉक्टरांना जिवे मारण्याची धमकी देऊन रुग्णालयाची इमारत बुलडोजरने पाडण्याची धमकी दिली होती. रुग्णालय प्रशासनाने तक्रार नोंदविल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.साहिल सय्यद हा खासगी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना धमकावतो,त्यांच्याशी वाद घालतो.त्यांनतर रुग्णालयात अनियमितता असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेकडे करतो. महापालिकेचे सहायक अारोग्य अधिकारी डॉ.गंटावार यांच्याशी साहिलची ‘खास’मैत्री असल्याची चर्चा असतानाच गुरुवारी एक खळबळजनक ऑडियो क्लिीप पोलीसांना प्राप्त झाली.
त्यात काही चर्चित व्यक्तींना बदनाम करण्यासाठी चर्चा केली जात असल्याचे सांगितले जाते. या ऑडियो क्लिीपची प्राथमिक चौकशी केली असता पोलीसांना काही महत्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे गंटावार-साहीलच्या सबंधासोबतच रुग्णालय प्रशासनाच्या तक्रारी करणा-या रॅकेटची कसून चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला दिले आहे.
ऑडियो क्लिीपमधील संभाषण-
साहिल-वैसे आज इसी मॅटर मे मेरी….(एका मंत्र्याचे नाव घेतले)के साथ बैठक है, वो तो पुलीस डिपार्टमेन्ट तो पूरा कर लिया मैने, और कल तो आईओ(गंटावारच्या जामिनाच्या सुनावणीच्या वेळी लाचलूचपत प्रतिबंधक विभागातर्फे येणारा अधिकारी)आया भी नही,साहब की तरफ से फोन चला गया था तो अपने को गेम बजाना है..(पुन्हा एका नेत्याचे नाव)का..
पंटर-बराबर है
(आणखी काही मुद्दांवर संवाद करतात)
साहिल-इसकी पोस्ट बहोत बडी है ना महानगरपालिका मे, और जैसा अपन कांड कर रहे है ना हॉस्पीटल का,वो येईच(गंटावार)ही करनेवाला है,ऐलेक्सिस का.
पंटर-एलेक्सिस का क्या हुआ भैया फिर.
साहिल– हो गया ना वहां का स्टिंग ऑपरेशन हो गया ना,और इनके (गंटावार)जैसे लफडे चालू हो गये थे ना २-४ दिन,इसलिये होल्ड करना पडा था, हो गये अब वो फ्री हो गये,एक ही दिन मे तो मैने बेल लिया.एक ही झटके मे.डिस्ट्रिक्ट कोर्ट मे ऐसा सेटअप लगाया कि ३.१५ बजे फाइलिंग किया,३.३० बजे जज के टेबल पर,४ बजे जज उठ जाता,याने परसो रात को गुनाह दाखिल किया इन्होने,एंटी करप्शनवालो ने,सीताबर्डी पुलिस स्टेशन के अंतर्गत,कल सुबह धागे-दोरे लगाकर,सुबह-सुबह साहब भी निकल जाते घर से…फिर आदमी को भेजा,सब धागे-दोरे लगाकर आया और कर दिया.
पंटर-याने अपने को उनको समर्थन करना है गंटावार को.
साहिल-एंटी करप्शनवाले तो पूरा केस ही भेंजेंगे अपने फेवर मे. कुछ है ही नही ना उनके केस मे.न उन्होने कोई डिमान्ड किये, न ही उनको किसीने रिश्वत लेते हूये गिरफ्तार किया,वो कैसा है कि साइड प्रॅक्टिस करते इसलिये एलिगेशन है.




आमचे चॅनल subscribe करा
