फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजसाहील सय्यद: चेक मेटचा खेळ!

साहील सय्यद: चेक मेटचा खेळ!

Advertisements

(रविवार विशेष)

सय्यद अखेर जेरबंद:‘राज’ उलगडणार का?’

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १९ जुलै: नागपूर महानगरपालिकेचे सहयक आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर अचानक चर्चेत आलेल्या गुन्हेगाराची एक बहूचर्चित ऑडियो क्लिीप पोलिसांपर्यंत पाेहोचली आणि…नागपूरात राजकीय भूकंप आला. गरिब व निराधार लोकांच्या मालमत्ता साथीदारांच्या मदतीने बळकवणा-या या गुन्हेगाराने आपल्या कृकृत्याची संपूर्ण कबूलीच जणू या ऑडियो क्लिीपमध्ये सांगताना महापौर संदीप जोशी व भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना ’हनी ट्रॅप’मध्ये फसविण्याची योजना पंटरसोबत आखणारा संवाद हा व्हायरल झाला आणि गल्ली ते दिल्लीपर्यंत ही क्लिीप म्हणजे ‘हाय प्रोफाईल इश्‍यू’झाला.

राजकारण्यांचे धाबे दणाणले. साहील सय्यद नेमका कोणाच्या पक्ष्ाचा पाळलेला गूंड आहे?यावर आरोप-प्रत्यारोपासोबत ‘फोटो वॉर’सुरु झाले. ’जनसेवेसाठी’ राजकारणात येणा-या ‘काही’ राजकारणी यांचा चेहरा मागील चेहरा कसा असतो,याचा बुरखा साहील सय्यद याच्या संभाषणाने टराटरा फाटला.

कसं पण दिसो…रेतीवाला नवरा पाहिजे…
मराठीतील एक लोक गीत अत्यंत प्रसिद्ध झाले.‘ दिसो तो..कसं पण दिसो..मला लगीन करा पाहिजे..रेतीवाला नवरा पाहिजे’या गीतात ‘रेतीवाला’ हा उल्लेख उगाच करण्यात आला नसून,रेतीशी संबंधित व्यवसायिक हे गडगंज संपत्तीवाले असतात,हे त्या गीतकारालाही उमगले होते,साहीलचा सबंधही शहरातील फक्त गोरगरीबांच्या मालमत्ता हडपण्यातपूरती नसून रेतीघाटावरील रेतीशी फार जवळचा संबध राहीला आहे. आजच रामटेकचे आमदार ॲड.आशिष जयसवाल यांनी फेसबूक लाईव्ह दरम्यान ‘रेती व रेतीची निगडीत अर्थकारण’यावर सखोल भाष्य केले.

 गृहमंत्री अनिल देशमुख यांनी साहीलचे भाजपच्या नेत्यासोबत अत्यंत जवळचे ‘व्यवसायिक संबंध’ असल्याचा खळबळजनक आरोप केला होता,हा व्यवसाय इतर दूसरा कोणताही नसून ’रेतीवाला’व्यवसाय असल्याचे अनेकांनी इंगित केले. विदर्भात भाजपच्या एक ’पॉवरफूल’नेत्याचे नाव या व्यवसायाशी चांगलेच जोडले असल्याचे खासगीत(उघडपणे) सांगितले जाते.

वेगळ्या नावाने अनेक गुन्हे दाखल-
साहील सय्यद याचे खरे नाव वेगळेच आहे. गडचिरोली येथील एका माजी आमदाराचा अनौरस पुत्र म्हणून साहिल ओळखला जातो. त्याला एक बहीण देखील आहे जिचं लग्न झालं. महाल येथील राहतेकरवाडी येथे त्यांचे घर होते. गाडीचोरीचे अनेक गुन्हे साहील याच्या नावावर दाखल झाले मात्र त्यावेळी त्याचे नाव वेगळे होते. या घटना २०१०-११ च्या आसपासच्या आहेत

या दरम्यान त्याने नागभीडचे नायब तहसीलदार कातकडे यांच्याशी मैत्री वाढवली. मात्र कातकडे हे प्रामाणिक अधिकारी असल्याने त्यांनी साहील यांच्या विरोधातच अवैध रेती वाहतूक प्रकरणी कारवाई केली. दवाबाच्या राजकारणाला कातकडे बळी पडत नसल्याचे बघून साहिल यांनी हुडकेश्‍वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांचा ’ट्रॅप’करुन त्यांना खोट्या आरोपाखाली अडकवले.भंडारा रेतीघाटाचे प्रकरण या घटनेशी जुळले आहेत.

साहील सय्यद एस्कॉर्ट एजेंट!
अनेक शासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांचा साहील सय्यद हा अत्यंत जवळचा होता.यामागे ‘हनी’म्हणजे ’बाया पुरविणे’हे खास कारण होते.इतर अनेक अवैध धंधे यासोबतच साहील सय्यद याचा हा आणखी एक ’खास’धंधा होता. याच धंध्यामुळे अनेक राजकीय नेते त्याच्या जवळचे झालेत.नीलीमा जयसवाल हिचा देखील याच धंध्यामुळे तपासणी सुरु आहे.तिचे खरे आडनाव ‘तिवारी’ आहे…!नुकतेच महापालिकेच्या एका मोठ्या अधिका-याचे नाव या प्रकरणात आले.या अधिका-याचा देखील संबंध ’हनी’मुळेच आल्याचे खासगीत बोलले जात आहे. एवढ्या ‘मधूर’संबधांमुळेच अलॅक्सीस रुग्णालयाविरोधात कट कारस्थान करण्यापर्यंत साहील याची मजल पोहोचली,हे उघड आहे.
सय्यदला अनेकांचे आर्शिवाद…सहा महिने सहज फरार राहू शकला शकता!
अनेकांमधील कुजबुज आहे सय्यदला अनेकांचे ‘आर्शिवाद‘ प्राप्त असल्यामुळे किंबहूना ‘अनेकांच्या प्रतिष्ठेची’दूखरी नस साहीलच्या हातात असल्यामुळे अनेक बडे नेते त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलीसांच्या हाती तो लागल्यास तो अनेकांचे बुरखे टराटरा फाडेल,अशी धास्ती आता काही राजकारणी,नेते व अधिका-यांना वाटत आहे. साहील सय्यद हा अत्यंत मुरलेला गुन्हेगार असून घाटाघाटाचे तो पाणी प्यायला आहे. एवढ्या सहज तो पोलीसांच्या तावडीत सापडणार नाही,असे म्हटले जात असताना आज रविवार दि. १९ जुलै रोजी अत्यंत नाट्यमयरित्या त्याला अटक झाली!

खंडणी मागणे,संपत्ती बळकावणे अश्‍या अनेक गुन्ह्यात अडकलेला साहील उर्फ समीर खुर्शीद सय्यद(वय ३९,रा.बगदादियानगर,झिंगाबाई टाकळी)अखेर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने राहत्या घरी तो पत्नीला भेटायला आला असता अटक केली.

बजाजनगर, मानकापूर व तहसील पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.पाचपावली पोलिस ठाण्यातही त्याच्या विरोधात कलम ४२०,४४८,४६७,४६८,४७१,१,२०(ब) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल आहे. एकूण चार गुन्हयात आरोपी असलेला आरोपी साहील सय्यद गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गवसत नव्हता. गुन्हे शाखा पथकाला पेट्रोलिंग करताना साहील हा त्याच्या राहत्या घरी आला असल्याची ’टिप’मिळाली.त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने बगदादिया नगर,प्लाट क्र. २४४,झिंगाबाई टाकळी येथील साहीलचे घर गाठले.

पोलिसांना बघताच त्याने घरामागील भिंतीवरुन उडीमारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला.मात्र सावध असलेल्या पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या ठोकल्या व पाचपावली पोलिस ठाण्यात दाखल गुन्हयाच्या आरोपा अटक करण्याची प्रक्रिया राबवली.

ही कारवाई पोलिस निरीक्ष् क भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उप निरीक्षक मयुर चौरसिया, पोलिस हवा. रवींद्र गावंडे, ना.पो.शि.नरेंद्र ठाकूर, ना.पो.शि. रवी अहिर, पो.शि. प्रविण रोडे, सागर ठाकरे,कुणाल मसराम, नापोशि सुहास, पो.शि. सुरज, आशिष गुन्हे शाखा यांनी केली.

सय्यद याला विविध गुन्हयाखाली अटक झाली असली तरी महापौर संदीप जोशी व भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना डॉ.गंटावारवरील प्रेमापोटी त्याने जो ’हनी ट्रॅप’चा सापळा रचण्याचे षडयंत्र रचले आहे,ते त्याच्या चांगलेच अंगलगट आले असून आता हे प्रकरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे चांगलेच हाय-प्रोफाईल झाले आहे.

त्यात त्याने ऑडियो क्लिीपमध्ये डॉ.गंटावार प्रकरणी न्यायाधीशांना ’सेटल’केल्याची बतावणी करुन आणखी गंभीर संकट ओढवून घेतले आहे.

वास्तविक पाहता साहील सय्यद गुन्हेगारी जगतातील आलिशान ईमारतीतील फक्त एक ’विट’आहे. या ईमारतीखालील ढिगा-याखाली
अनेक मोठमोठ्यांचे काळे कारनामे दबले आहेत. साहील सय्यद याची डॉ.गंटावारशी मैत्री आहे म्हणून त्याने महापौर व दयाशंकर तिवारी याला हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याची योजना आखली,असा अनेकांचा ’गैरसमज’आहे.

यामागील एकमेव कारण आहे त्यांचे आपापसातील ’गैर कारोबार व एस्कॉर्ट एजेंसीचे मधूर संबंध!’साहिल सारखी समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे कोणाशीही मैत्री करीत नाही,त्यांचा एकच धर्म असतो ’पैसा’तो ही वाममार्गाने मिळवलेला पैसा.यासाठी ते कोणत्याही स्तरापर्यंत जात असतात.एका निराधार माऊलीचे घर बळकावल्याचे प्रकरण याचेच एक उदाहरण आहे.

नागपूरात ’हनी ट्रॅप’परंपरा नवी नाही!
नागपूरात ’हनी ट्रॅप’ची परंपरा ही नवी नाही. याचे तार अगदी सोमलवाडा येथील नाल्यात सापडलेल्या एका महिलेच्या बहूचर्चित हत्याकांडापर्यंत जोडले जातात! या पूर्वीही काही पक्ष्ाचे काही दिग्गज नेते यात अडकले आहेत,एवढेच की त्यांची वाच्यता बाहेर झाली नाही.ऐनकेन प्रकारे ती दाबून टाकण्यात आली. मात्र त्या ’अनेक’प्रकरणांची चर्चा अद्याप ही नागपूरातील पत्रकार व बुद्धिजीवी जगतात चांगलीच चर्चिली जाते. काही प्रकरणे फार मोठ्या लेवल वरुन ’सेटल’ झालीत. अगदी मध्यरात्री नागपूरवरुन मुंबई पोलिसांना फोन जाण्याइतपत ‘सेटल’झालीत! हाय प्रोफाईल प्रकरणे असल्यामुळे पोलीसांनाही त्यांच्या परिने काही विशेष करण्याची संधी मिळालीच नाही.

साहील सय्यदच्या प्रकरणात आता त्याची अटक झाल्यानंतर तो किती जणांचे बिंग फोडतो,यावर सगळं निर्भर आहे.दयाशंकर तिवारी यांचे नाव घेतल्याने ते पूर्ण आसूड उगवणार हे सर्वविदीतच आहे. त्यांच्या ‘प्रतिष्ठेला’धक्का लावण्याचे धाडस सय्यद याने केले असल्यामुळे सय्यद याची संपूर्ण ‘कुंडली’ते जगासमोर आणनार असल्याचे दयाशंकर यांनी आव्हान केले आहे.
माजी मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, भाजपचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, अश्‍या अनेक नेत्यांमध्ये साहील हा नेमका कोणाचा? यावरुन सोशल मिडीयात चांगलीच जुंपलेली नागपूरच्या जनतेने पाहीले. ‘फोटो वॉर’देखील बघितले तरी देखील गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत ‘साहील सय्यद’ म्हणजे अनेक राजकारण्यांसाठी हा ‘चेक-मेट’चा खेळ झाल्याचेच म्हणावे लागेल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या