

दहा वर्षांपासून व्यास प्रतिष्ठान राबवतोय प्रेरणादायी उपक्रम
नागपूर: अनेक संस्था,संघटना किवा व्यक्ति ही समाजात राहत असताना आपापल्या परीने समाजातील उपेक्षित ,दुर्लक्षित,वंचित घटकांसाठी काेणतातरी भरीव उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करीत असते. पं.बच्छराज व्यास प्रतिष्ठान हे देखील असेच एक प्रतिष्ठान असून प्रतिष्ठानातील मित्र परिवार हे दर वर्षी, अतिदूर्गम भागात जाऊन एखाद्या गावाचे सर्वेक्ष् ण करुन,कुटुंबाची संपूर्ण माहिती, गावाची लोकसंख्या इ.चा सखोल अभ्यास करुन त्यांच्यापर्यंत दिवाळीचा सुग्रास, चविष्ट फराळ, आकर्षक रोषणाईचे फटाके, इतर उपयोगी साहित्य इ.दिवाळीच्या पहील्या दिवशी म्हणजे वसूबारसच्या दिवशी पोहोचवत असते,त्यांच्या प्रफुल्लीत चेहऱ्यावरच्या आनंदात जिवनातील खरी दिवाळी हे प्रतिष्ठान अश्या अनोख्या पद्तीने साजरी करीत असते.
बुधवार दि. २३ ऑक्टोबर रोजी आ.गिरीश व्यास यांनी पत्र परिषदेत ही माहिती दिली. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक््यातील अती दूर्गम भागातील ‘सालेघाट’या गावी ६४ कुटुंब राहतात. या ६४ कुटुंबांना व्यास प्रतिष्ठानातर्फे लाडू,चकली, अनारसे,करंजी, शंकरपाळ्या या चविष्ठ फराळासोबतच रंगबिरंगी आतिशबाजी,फटाके, आकर्षण पणत्या इ. साहित्य देखील एका पिशवीत व्यवस्थितरित्या पॅक करुन उद्या सकाळी मॅटोडोरने व्यास प्रतिष्ठानचे अविनाश खळतकर व अशोक कुथे घेऊन जाणार आहेत. या पूर्वी घाटकुकडा, शिलादेवी इ. सारख्या अति दूर्गम भागात व्यास प्रतिष्ठानतर्फे फराळ वाटप उपक्रमात असाच उल्लास,उत्साह व आनंद त्या भागातील आदिवासींच्या चेहऱ्यावर पसरला होता,अशी आठवण अविनाश खळतकर यांनी सांगितली. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या डोळ्यात आनंदासोबतच आश्चर्य होते, एवढ्या लांबून नागपूरसारख्या शहरातून व्यास प्रतिष्ठानासारखी संस्था त्यांच्यासारख्या उपेक्षित वर्गाचा, दिवाळीसारख्या सणातील आनंदाचा विचार करते,ही भावनाच त्यांच्यासाठी खूप मोलाची असल्याचे खळतकर सांगतात.
तशीही आपली भारतीय संस्कृती ही ’एक तीळ सात भावंडांमध्ये’वाटून खाण्याचा संदेश देणारी आहे. याच धर्तीवर ‘आहे रे’वर्गाने जर ‘नाही रे’वर्गाची थोडीशी काळजी घेतली, आपल्याजवळचं गोड-धोड त्यांना दिलं, माणूसकीचा आनंद दिला तर या देशात ‘नाही रे’वर्गच अस्तित्वात राहणार नाही असे गिरीश व्यास सांगतात. व्यास प्रतिष्ठान हे सामाजिक ऋण कधीपासून फेडतोय?या प्रश्नावर आम्ही हे ऋण समजतच नाही आम्ही हे आमचे कर्तव्य समजतो असे व्यास म्हणाले. गिरीश व्यास मित्र परिवारातर्फे दर वर्षी दिवाळीत पार पडणाऱ्या या उपक्रमाचे समाजातील अनेक मान्यवरांनीही कौतूक
केले.




आमचे चॅनल subscribe करा
