फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसामूहिक 'झेंडागीत' गायन व 'संविधान शिलालेखाचे' लोकार्पण रविवारी

सामूहिक ‘झेंडागीत’ गायन व ‘संविधान शिलालेखाचे’ लोकार्पण रविवारी

Advertisements

आझादी-७५’ च्या अनुषंगाने १२५ चौकात सामूहिक झेंडागीत गायन

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

नागपूर, ता. १६ : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीच्या अनुषंगाने ‘आझादी ७५’ अंतर्गत रविवारी १७ ऑक्टोबर रोजी नागपूर शहरातील १२५ चौकांमध्ये ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमारा’ या गीताचे सामूहिक गायन होणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि झेंडा गीतचे रचियता श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांच्या १२५व्या जयंतीच्या त्रिवेणी पर्वावर नागपूर महानगरपालिका, खादी ग्रामोद्योग आयोग आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या देशभक्ती चेतविणाऱ्या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्यांदाच झेंडा गीताचे एवढ्या व्यापक प्रमाणात सामूहिक गायन होणार आहे.

रविवारी १७ ऑक्टोबर रोजी संविधान चौकामध्ये सामूहिक झेंडागीत गायनाचा मुख्य कार्यक्रम होईल यासोबतच संविधान चौकात उभारण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाच्या शिलालेखाचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. महापौर दयाशंकर तिवारी हे कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवतील. सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते संविधान प्रस्ताविकाच्या शिलालेखाचे लोकार्पण केले जाईल. यानंतर सकाळी १०.३० वाजता येथे सामूहिक झेंडगीत गायन होईल.

याचवेळी सकाळी १०.३० वाजता शहरातील १२५ चौकामध्ये सुद्धा झेंडा गीतचे सामुहिक गायन होईल. एकाचवेळी सर्व ठिकाणी झेंडा गीत एकस्वरात गायले जाईल. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी सुद्धा उपस्थित राहतील. कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे भारतीय राष्ट्रध्वज देण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सर्व पक्षांचे सहकार्य लाभलेले असून विविध पक्षांद्वारे सुद्धा सामूहिक झेंडगीत गायले जाणार आहे.

कार्यक्रमाला लायन्स क्लब, नागविदर्भ चेम्बर ऑफ कामर्स, ताजाबाद ट्रस्ट, मैत्री परिवार, कैट, नागपूर चेम्बर ऑफ कामर्स लिमिटेड, तेजस्विनी महिला मंच, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, भारत विकास परिषद, विदर्भ सेवा समिती, पालीवाल सेवा मंडल, श्रध्दा बहुउददेशीय संस्था, निराला सोसायटी, गुप्ताजी समाज, अयोध्यावासी वैश्यनगर सभा, विप्र फाऊंडेशन, सीताबर्डी व्यापारी संघ, गुजराती समाज, शाहू समाज कल्याण सोसायटी, विदर्भ आप्टीकल असोसिएशन, गेहोई वैष्व समाज, सराफा बाजार असोसिएशन, खंडेलवाल समाज, देवता फाऊंडेशन, शिवहरे समाज, प्रयास ग्रीन संस्था, दोसर वैश्य महासभा, अग्रहरी वैश्य समाज, ब्राम्हण सेना, नागपूर जैन समाज, विश्व सिंधी सेवा संगम, आदिवासी विकास युवा महासंघ, मो.रफी मंच, सिंधी हिंदी विद्या समिती आदी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. शिक्षण ‍विभाग आणि क्रीडा विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

या चौकात होणार सामूहिक झेंडागीत गायन-
टेलिफोन एक्सचेंज् चौक, डिप्टी सिग्नल चौक, लता मंगेशकर गार्डन चौक, कळमना गाव चौक, भरतवाडा चौक, कामगार नगर चौक, टिपू सुल्तान चौक, कपिलनगर चौक, दुर्गामाता मंदिर चौक, टेकानाका, कामठी रोड, अवस्थीनगर चौक / चोपडे लॉन, अशोक नगर चौक, सावरकर नगर चौक, शारदा चौक, तुकडोजी पुतळा चौक, टी. व्ही. टॉवर चौक, नंगा पुतळा चौक, रामनगर चौक, शिवणगाव बस स्टॉप, शितला माता चौक, उमरेड रोड, जयताळा चौक, बसवेश्वर चौक, संविधान चौक, अशोक चौक, घाट रोड, मानस चौक, बर्डी, मानेवाडा चौक, दिक्षाभुमी चौक, अजनी चौक, रहाटे चौक, लोकमत चौक, काँग्रेस नगर चौक, सोमलवाडा चौक, एयर पोर्ट चौक, छत्रपती चौक, लक्ष्मीनगर चौक, खामला चौक, जयताळा चौक, त्रिमुर्ती नगर चौक, पांढराबोळी चौक, प्रताप नगर चौक, अभ्यंकर नगर चौक, माटे चौक, श्रद्धानंद पेठ चौक, सुभाष नगर टी पॉईंट चौक, ट्राफिक वार्ड चौक, शंकर नगर चौक, रामनगर चौक, बजाजनगर चौक, पंचशिल चौक, झांसी राणी चौक, व्हेरायटी चौक, झिरो माईल चौक, R.B.I. चौक, संविधान चौक, महाराज बाग चौक, पत्रकार कॉलनी VHA चौक, मुंजे चौक, लॉ कॉलेज चौक, कॉफी हाऊस चौक, लक्ष्मी भवन चौक, जी. पी. ओ. चौक, भोले पेट्रोल पंप चौक, रविनगर चौक, विधान भवन चौक, आकाशवाणी चौक, एल. ए. डी. कॉलेज चौक व अन्य ठिकाणी सामुहिक गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या