फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसात तासात तयार करणार १०० हून अधिक 'टियारा'

सात तासात तयार करणार १०० हून अधिक ‘टियारा’

Advertisements

स्‍वाती गादेवार प्रस्‍थापित करणार विक्रम

नागपूर, २३ डिसेंबर:बेटियों के सर पर फुलों का ताज, जो है इसकी हकदार आज‘ या मध्‍यवर्ती संकल्‍पनेने प्रेरित होऊन फ्लोरल आर्टीस्‍ट स्‍वाती गादेवार सात तासात १०० हून अधिक ‘टियारा’ म्‍हणजे ‘फुलांचे मुकूट’ तयार करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्डससाठी प्रयत्‍न करणार असल्याची माहिती त्यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत दिली.

सोमवार, २७ डिसेंबर रोजी चिटणविस सेंटर, सिव्‍हील लाईन्‍स येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्‍यान स्‍वाती गादेवार या ‘मॅक्‍झीमम रिअल फ्लॉवर टियाराज मेड अँड डिस्‍प्‍लेड बाय ऑन इंडिव्हिज्‍युअल‘ या गटात नवीन विक्रम प्रस्‍थापित करण्‍याचा प्रयत्‍न करतील.

स्‍वाती गादेवार या गादेवार आय केअरचे संचालक डॉ. प्रवीण गादेवार यांच्‍या पत्‍नी असून त्‍या फ्लोरल आर्टीस्‍ट आहेत. ‘इट्स न्‍यू ऑल्‍वेज’ नावाने त्‍यांचे फ्लोरल बुटीक अाहे. या माध्‍यमातून त्‍या विविध फुले, पाने, विलायची इत्‍यादी साह‍ित्‍याच्‍या मदतीने डिझायनर हार, दागिने इत्‍यादी तयार करतात.

स्‍वाती गादेवार सांगतात, मी सुरुवातीला देवांसाठी डिझायनर हार तयार करायला सुरुवात केली. लोकांना ही कल्‍पना खूप आवडली. मागणी वाढली म्‍हणून मग व्‍यवसाय सुरू केला. आता मी पारंपरिक व पाश्‍चात्‍य अशा दोन्‍ही पद्धतीने डोक्‍याच्‍या गज-यापासून ते पायातील जोडव्‍यांपर्यंत सर्व प्रकारचे दागिने, हार डिझाईन करणे व फुले, पाने, विलायची इत्‍यादीच्‍या मदतीने तयार करून देते. सोने व हिरा-यांचे आभूषण जसे घडवले जातात त्या तोडीचे फूलांचे दागिने तयार करण्यात स्वाती यांचा हातकंडा आहे.

स्‍वाती गादेवार यांनी सलग तीन वर्ष नागपूर गार्डन क्‍लबचे विजेतेपद पटकावले असून स्‍वयंसिद्धा पुरस्‍कार, लिडरशीप पुरस्‍कारही प्राप्‍त केले आहेत. अनेक स्‍पर्धांमध्‍ये त्‍यांना परीक्षक म्‍हणून आमंत्रित करण्‍यात येते. शिवाय त्‍या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाच्या कार्यशाळाही घेतात.

अनाथाश्रमातील मुलींना देणार ‘फुलों का ताज’-
स्‍वाती गादेवार लाल गुलाबांच्‍या फुलांचे मुकूट तयार करणार आहेत. सकाळी ७ वाजताच त्‍या या उपक्रमाला प्रारंभ करतील. ११ वाजेपर्यंत १०० हून अधिक मुकूट तयार करून विक्रमांची नोंद होईल. त्‍यानंतर एका छोटेखानी कार्यक्रमात हे ‘फुलो के ताज’ अनाथाश्रमातील मुलींच्‍या डोक्‍यावर चढवले जाणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्‍वाती गादेवार व गादेवार कुटुंबियांनी केले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या