फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजसाजरी करा इकोफ्रेण्डली दिवाळी:ग्रीन विजिलचे जनजागृतीपर अभियान

साजरी करा इकोफ्रेण्डली दिवाळी:ग्रीन विजिलचे जनजागृतीपर अभियान

Advertisements

नागपूर,ता. १० नोव्हेंबर: ग्रीन व्हीजिल पर्यावरण संस्थेने इकोफ्रॅण्डली दिवाळी साजरी करण्याचे अभियान चालविले असून या अभियना अंतर्गत चिल्ड्रेन ट्राफीक पार्क समोर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विभिन्न पोस्टर आणि प्लाकर्ड्सच्या माध्यमातुन लोकांना कराेनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी फटाके न फोडण्याचे आव्हान केले.

ग्रीन विजिलच्या टीम लीडर सुरभि जैस्वाल यांनी सांगितले की, फटाके फुटल्यानंतर cadmium आणि lead सारख्या Heavy Metals चे अधिक प्रमाणात उत्सर्जन होते. या सोबतच copper, zinc, sodium, potassium सारख्या धातुचे सुद्धा उत्सर्जन होते तसेच वातावरणात Suspended Particulate Matter चे प्रमाण वाढते त्यामुळे दमा, डोकेदुखी, रक्तदाबात वृद्धी, स्किन एलर्जी, डोळ्यांचा त्रास तसेच श्वसन समस्या जास्त प्रमाणात होतात. त्यामुळे आपल्याला फटाक्यांचं प्रदुषण टाळायलाच हवं. स्वत:च्या क्ष् णिक अनंदासाठी आपण वायु प्रदुषणात नकळत दरवर्षी भर घालतो,याशिवाय ध्वनि प्रदुषणामुळे देखील पर्यावरणाची, सजीव जीवजंतुंची,वृक्ष वल्लींची अपरिमित हानि करतो.याशिवाय वायु तसेच ध्वनि प्रदुषणाचा सर्वाधिक त्रास हा नवजात बालकांना तसेच वयोवृद्ध ज्येष्ठांना भोगावा लागतो.

ग्रीन विजिलचे डेप्यूटी टीम लीडर मेहुल कोसुरकर यांनी सांगितले की या अभियानाला त्यांना भरपूर चांगला प्रतिसाद मिळत आहे, बऱ्याच लोकांनी यात रस दाखवला. फक्त याच वर्षी नव्हे तर दर वर्षी दिवाळीसारखा शुभउत्सव हा साधेपणाने ही साजरा करता येतो.पणत्यांची आरास,मोहक रांगोळ्या,गोडधोड मिठाई आणि कुटुंबियांसोबत जिव्हाळ्याचा वेळ घालवणे हीच खरी दिवाळी आहे.

अभियानाला यशस्वी बनवण्यासाठी कौस्तुभ चटर्जी, सुरभि जैस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, बिष्नुदेव यादव, नम्रता झवेरि, विकाश यादव, दिगम्बर नागपुरे, प्रिया यादव, कोमल हटवार, श्रिया जोगे, संचिता ढोमणे इत्यादींनि ने अथक परिश्रम केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या