फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसाईबाबा सेवा मंडळाच्या निवडणुकीसाठी २४ जूनला मतदार यादी होणार प्रसिद्ध

साईबाबा सेवा मंडळाच्या निवडणुकीसाठी २४ जूनला मतदार यादी होणार प्रसिद्ध

Advertisements

नागपूर, दि. १८ जून : श्री साईबाबा सेवा मंडळ वर्धारोड नागपूर येथील न्यासाच्या कार्यकारी मंडळाच्या सभासदांची निवडणूक घेण्याकरिता आजीवन सभासद, साधारण सभासद तसेच पॅट्रॉन सभासद यांची यादी गुरुवार, दिनांक २४ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक धर्मदाय आयुक्त तथा निवडणूक अधिकारी माणिकराव राजाराम सातव यांनी आज दिली.

श्री साईबाबा सेवा मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी यांनी सहाय्यक म्हणून अधीक्षक महेन्द्र सहारे, विजय चव्हाण व निरीक्षक हरीहर गाडगे यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीसाठी मतदारांची यादी दिनांक २४ जून रोजी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, नागपूर व श्री साईबाबा सेवा मंडळ नागपूर या न्यासाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सभासद यादीतील सदस्यांच्या अनुषंगाने कोणत्याही सभासदाचे आक्षेप, हरकत असल्यास संबंधितांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सक्षम प्राधिकरण, सक्षम अधिकारी यांच्यासमोर दाखल करुन त्यांचे निराकरण करुन त्याबाबतच्या आदेशाची प्रमाणित प्रत निवडणूक अधिकारी यांच्यासमोर सादर करावी, असे आवाहनही निवडणूक अधिकारी श्री. सातव यांनी केले आहे.

मतदार यादी प्रसिद्ध करणे, प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे, सक्षम प्राधिकरण/ सक्षम अधिकारी यांच्याकडून आक्षेपाचे निराकरण करुन घेणे व निराकरणाच्या आदेशाच्या प्रमाणित प्रती निवडणूक अधिकारी यांच्यासमोर सादर करण्यासाठी दिनांक २४ जून ते २० जुलैपर्यंतचे वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार मतदार यादीसंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे.

निवडणूक मतदार यादीसंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक २४ जून रोजी मतदार यादी प्रसिद्ध करणे, दिनांक २५ जून ते २ जुलैपर्यंत सक्षम प्राधिकरण, सक्षम अधिकारी यांच्यासमोर आक्षेप अथवा हरकती नोंदविणे. याच कालावधीत मतदार यादी विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. दिनांक ५ जुलै ते ९ जुलैपर्यंत सक्षम प्राधिकरण, सक्षम अधिकारी यांच्याकडून आक्षेप अथवा हरकतीचे निराकरण करुन देण्यात येईल. दिनांक १२ जुलै ते १६ जुलैपर्यंत सक्षम प्राधिकरण अथवा सक्षम अधिकारी यांनी मतदार यादीवरील घेतलेल्या आक्षेपाचे निराकरण करुन दिलेल्या आदेशाच्या प्रमाणित प्रती मिळवण्यासाठीचा कालावधी राहणार आहे.

दिनांक १९ जुलै व २० जुलै या काळात सक्षम प्राधिकरण, सक्षम अधिकारी यांनी मतदार यादीवर घेतलेल्या आक्षेपाचे निराकरण करुन दिलेल्या आदेशाच्या प्रमाणित प्रती निवडणूक अधिकारी यांच्यासमोर सादर करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत तसेच सक्षम प्राधिकरण, सक्षम अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच निवडणूक अधिकारी, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, नागपूर येथे पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक धर्मदाय आयुक्त-१ तथा निवडणूक अधिकारी श्री साईबाबा सेवा मंडळ माणिकराव राजाराम सातव यांनी दिली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या