

नागपूर: उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत हे काँग्रेसचे अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष् आहेत,प्रदेशाध्यक्ष् बाळासाहेब थोरात यांच्या चमूमध्ये कार्याध्यक्ष् म्हणून देखील त्यांची वर्णी लावली मात्र त्यांनी स्वत:साठी तिकीट घेतली याचा सर्वाधिक राग आहे. आम्ही असा उमेदवार नाही पाहिजे म्हूणन दिल्लीतील पक्ष् श्रेष्ठींपर्यंत फिर्याद केली. पाच वर्षांच्या आमदारकीत समाजाचे असे कोणते भले त्यांनी केले याचा जाब विचारण्यासाठी मी उद्या शुक्रवारी अपक्ष् म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहो,असे विधान काँग्रेस पक्ष्ाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज सांगोले यांनी केले.
रस्ता,पाणी,बेरोजगारी, गरीबांचे शिक्ष् ण, उद्योग अश्या सर्वच प्रश्नांवर निवडणूकीत मी काँग्रेस पक्ष्ाचे उत्तर नागपूरचे अधिकृत उमेदवार नितीन राऊत यांना जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले. माझ्या उमेदवारी अर्जावर स्वाक्ष् री करणारे हे नितीन राऊत यांच्याच खूप जवळचे पदाधिकारी आहेत,त्यांचेही मला समर्थन मिळाले असल्याचे ते म्हणाले. पियुष लाडे,पंकज लोणारे,सुरज आवडे,राजेश जिवतादी,राकेश यादव हे सर्वच राऊत यांचेच समर्थक असून माझ्या उमेदवारी अर्जावर त्यांनीच स्वाक्ष् री केली.यावरुनच स्थानिकांना राऊत हे उमेदवार म्हणून नको होते हे सिद्ध होतं.नगरसेवक म्हणून मी माझ्या प्रभागात साढे चौदा हजार मते घेतली आहे.माझ्या विरोधात बसपाचे गौतम पाटील होते त्यांना फक्त साढे चार हजार मते पडली. मी जनतेसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. जनतेच्या प्रश्नावर सातत्याने लढतो,आम्हाला नितीन राऊत यांख्यासारखे निष्क्रिय नेते नको हवे होते, यासाठी आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांच्या विरोधात, आमच्यावर उमेदवार लादू नका म्हणून सांगून आलो होतो मात्र पूर्व राज्य मंत्री यांनी आपले वजन वापरुन स्वत:साठी तिकीट मिळवली,याचा राग उत्तर नागपूरातील कार्यकर्त्यांच्या मनात असल्याचे ते म्हणाले. त्यांच्याच आग्रहामुळे उद्या शुक्रवारी सकाळी ९.३० वा. कुटुंबातील दहा-बारा सदस्यांसोबत अपक्ष् म्हणून उमेदवारी अर्ज भरणार आहे. अर्ज भरल्यानंतर रॅलीत मी माझ्या मनातले जनतेकडे सांगणार असल्याचे ते म्हणाले.
गेल्या निवडणूकीत अतिशय अटीतटीत झालेल्या लढतीत डॉ.मिलिंद माने यांचा निसटता विजय झाला होता.बसपचे उमेदवार किशोर गजभिये यांनी ५५ हजार १८७ मते घेऊन नितीन राऊस यांचे जिंकण्याचे स्वप्न धूळीस मिळवले होते. डॉ.मानेंना ६८ हजार ९०५ मते मिळाली होती. राऊत यांना तिसर्या जागेवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसच महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष् बाळासाहेब थोरात यांनी त्यांना कार्याध्यक्ष् म्हणूण सहभागी केले.मात्र उत्तरेत त्यांच्या विरोधातील असंतोषाचा त्यांना बराच सामना करावा लागणार आहे. राऊत यांनी काँग्रसचे कार्याध्यक्ष् म्हणून मुलाखतीत उपस्थित राहणे गरजेचे असताना ते व त्यांचे समर्थक देवडीया भवनाकडे फिरकलेच नाही. ज्यांनी मुलाखती दिल्या त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिककडे राऊत यांच्या उमेदवारीचा विरोध केला होता.विशेष म्हणजे किशोर गजभिये यांनी देखील उत्तरेत उमेदवारीसाठी दावा केला होता.
नगरसेवक मनोज सांगोले,संदीप सहारे,विवेक निकोसे यांनीही उमेदवारी मागितली होती,राऊत सोडून कोणालाही उमेदवारी द्या,अशी त्यांनी मागणी केली होती.यावरुन काँग्रेसमधील राऊत यांच्या विरोधात असंतोष किती विकोपाला गेला आहे हे लक्ष्ात येते. २००९ च्या निवडणूकीत या मतदार संघातून नितीन राऊत यांनी ५७ हजार ९२९ मते मिळवली होती तर भाजपचे राजेश तांबे यांनी ४० हजार ०६७ मते मिळवली होती.
यंदा ही भाजपने डॉ.मिलिंद माने यांच्यासारख्या मितभाषी, कुरघोडी व श्रेयाच्या राजकारणात न पडणारे उच्च विद्याभूषित डॉ. मिलिंद माने यांनाच निवडणूकीत उमेदवारी दिली असून उत्तर नागपूरातून नितीन राऊत यांना पक्ष्ांतर्गत असंतोषामुळे आपली सीट काढणे जड जाणार असल्याची चर्चा आहे.




आमचे चॅनल subscribe करा
