

एका मोठ्या नेत्याला केले साढे पाचशे कॉल!
डाॅ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २ आगस्ट: सय्यद साहील,एक कुख्यात नाव म्हणून नुकतेच गुन्हेगारी जगतात प्रसिद्धीस आले मात्र त्याच बरोबर राजकीय वर्तुळात देखील त्याचे छायाचित्र हे विविध राजकीय पक्ष्ांनी साहिल हा नेमका कोणत्या पक्ष्ाचा?हे सिद्ध करण्यास व्हायरल केले यावरुन साहील सय्यद याची राजकीय पार्श्वभूमीची आठवण नागपूरकर अद्याप विसरले नाहीत. पंधरा दिवसांपूर्वीच ‘साहील सय्यद फोटो वॉर’हे नागपूरकरांनी अनुभवले. परिणामी त्या सर्व छायाचित्रांवरुन साहील हा राष्ट्रवादी सोबतच भाजपचा देखील ’खासमखास’ राहील्याचे सिद्ध झाले.
नुकतेच सुत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे साहिलने एका मोठ्या नेत्याला जवळपास साढे पासशे कॉल्स केल्याची माहिती आहे!याशिवाय त्याच्याकडे विविध पासपोर्ट सापडलेत. या पासपोर्टवर त्याने अातापर्यंत चायला,रशिया व सिंगापूरचे ’राजकीय दौरे’केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे एका मोठ्या पक्ष्ाच्या एका मोठ्या नेत्यासाठी साहील सय्यदने हे सर्व दौरे केल्याचे सांगितले जात आहे. या दौ-यात साहिल सय्यदने या मोठ्या नेत्याची जवळपास २ हजार कोंटीची रक्कम ही चायनामध्ये सुरक्ष्ति ठेऊन आल्याचे सांगितले जात आहे!या शिवाय इतर देशात देखील तो हजारो काेटींची रक्कम हवालामार्फत ठेवीत आल्याची माहीती सूत्राने दिली.
हजारो कोटींच्या या रकमेसाठीच साहीलला अटक होऊ नये,झाली तरी अत्यल्प शिक्ष्ा व्हावी किंबहूना त्याला लवकरात लवकर जामिन मिळावा यासाठी या नेत्यांची धडपड सुरु झाली आहे..साहिलच्या विरोधात बजाज नगर ठाण्यात पिस्तुलच्या धाकावार एका तरुणाच्या जबरदस्ती सह्या घेऊन कोट्यावधीची मालमत्ता हडपल्याच्या आरोपावरुन १७ जुलै रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. शशांक नथुजी चौधरी(वय ३१) असे या प्रकरणातील पीडित व्यक्तीचे नाव असून ते वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर जवळच्या शेगाव येथील रहीवाशी आहेत चौधरी यांच्या तक्रारीनुसार सुरेंद्रनगरातील सेंट्रल रेल्वे एम्पलॉईज को-अॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमध्ये ही मालमत्ता आहे,या मालमत्तेची मालकी प्रशांत चौधरी यांच्याकडे होती.ती हडपण्यासाठी आरोपी साहील सय्यद,गिरीश गिरधर,संदीप बंसोड आणि त्यांच्या तीन साथीदारांनी बनावट कागदपत्रे बनवून मूळ मालकाचे मृत्यूपत्र बनवून बनवाट सही केली व त्यानंतर चौधरी यांचे अपहरण करुन त्यांना मारहाण केली. डोक्यावर पिस्तुल लावून जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या समझौता पत्रावर सही व अंगठा घेण्यात आला व नंतर ती मालमत्ता संदीप बनसोड यांच्या नावावर करण्यात आली. ही घटना २४ आॅक्टोबर २०१८ रोजी घडली होती.
सुत्राने दिलेल्या माहितीनुसार त्या राष्ट्रीय पक्ष्ाच्या मोठ्या नेत्याने बजाज नगर ठाण्यात ही तक्रार दाखल होऊ नये यासाठी दडपण आणले होते. मात्र साहीलला १९ जुलैला बेड्या ठोकण्यात आल्या.साहीलवर एकूण ५ गुन्ह्यांची नोंद असली तरी पाचपावली प्रकरणात साहीलला २६ जुलै रोजी जामिन मिळाला.हायकोर्ट बार असोसिएशनचे नामवंत वकील साहीलची बाजू न्यायालयात लढत आहेत,हे विशेष!
साहीलने त्या राजकीय पक्ष्ाच्या मोठ्या नेत्यांचे हजारो कोटी सिंगापूरमध्ये देखील गुंतविले असल्याची माहीती सुत्राने दिली.साहिलला अटक होताच या हजारो कोटींचे अस्तितवच धोक्यात आले असल्याने या मोठ्या नेत्यांची गाळण उडाली आहे.
मूळात साहील सय्यद हा फक्त एक ‘प्यादा’आहे.त्यातही तो अडाणी असल्यामुळे मुरलेल्या राजकारण्यांना तो जास्त प्रिय असल्याचे सांगितले जात आहे.कारण त्याच्याकडून त्यांना कोणताही धोका होण्याची शक्यता नाही. मात्र एवढ्या प्रतिष्ठित वर्तृळात वावरुन देखील साहील याच्यातील मूळ गुन्हेगारी प्रवृत्ती त्याला स्वस्थ बसू देत नसल्याने त्याने खंडणी,मालमत्ता हडपणे यासारखे प्रताप करण्यात सुरवात केली आणि नेत्यांची डोकेदुखी वाढली. मात्र ’हनी ट्रॅप’प्रकरणात साहीलने मनपातील भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांना अडकविण्याची अॉडियो क्लिप त्याच्या दूर्देवाने व्हायरल झाली आणि तो चांगलाच अडचणीत आला.
साहील सय्यद प्रकरणावर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चांगलाच शाब्दिक कलगीतुरा रंगला होता. ऑडियो क्लिीप व त्यातील हनी ट्रॅपचे प्रकरण गृहमंत्री यांनी गांर्भीयाने घेण्याचे पत्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांना दिले होत.या पत्रावर गृहमंत्र्यांनी साहिल हा भाजप नेत्यांचा व्यवसायिक भागीदार असल्याचे सांगून हा भाजपच्या ‘अंतर्गत’राजकारणाचा भाग असल्याचे उत्तर दिले.यावर फडणवीस यांनी पुन्हा पत्र पाठवून प्रकरणाची चौकशी करणार नसाल तर संबधित क्लीप उच्च न्यायालयात सादर केली जाईल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची विनंती केली जाईल असा इशारा दिला होता.
गृहमंत्र्यांच्या एका वक्तव्यावर माजी मंत्री चंद्रशेखर बावणकुळे व माजी आमदार सुधाकर देखमुख यांनी पुरावे सादर करा अन्यथा माफी मागा अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली होती.
थोडक्यात साहील सय्यदसारख्या एका गुन्हेगाराला घेऊन एवढ्या मोठ्या राजकीय नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. लाललुचपत प्रतिबंधक गुन्हेशाखेने साहीलचा सर्व कॉल रेकॉड तपासल्यानंतर ५३० पैकी २५० ते ३५० फोन कॉल्स त्याने त्या एकमेव मोठ्या नेत्यालाच केल्याची माहिती आहे.याशिवाय त्याच्याकडे आढळून आलेल्या पासपोर्टवरुन त्याने केलेल्या विदेश दौ-याचे देखील तपशील काढले जात आहे.
साहिल सय्यद हे आता ’हाय प्रोफाईल’ प्रकरण झाल्यामुळे आता , साहिल सय्यद याच्याजवळ नेमके किती पासपोर्ट सापडलेत?त्या पासपोर्टवरुन त्याने किती देशांचे दौरे केलेत?भारतातून साहीलच्या मार्फत हवालाचा पैसा भारता बाहेर गेला का?कोणकोणत्या राजकारणी नेत्यांचा पैसा त्याने हवालाच्या मार्फत इतर देशात ठेवला?हा किती हजार कोटींचा घोटाळा आहे?साहिल नेमका कोणाकोणाचा हस्तक होता?त्याच्या कॉल रेकॉडवरुन त्याने किती नेत्यांना कॉल केले होते?साहिलला कायदेशीर कचाट्यातून वाचविण्यास कोणत्या पक्ष्ाच्या कोणकोणत्या नेत्यांचा आटापिटा चालला आहे?या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील का,याकडे अवघ्या महाराष्ट्राच्याच जनतेचे लक्ष् लागले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
