

‘विम्स’हॉस्पीटलचे संचालक डॉ.राजेश सिंधानिया यांचा रुग्णाच्या मुलाकडे कबूलीजवाब!
५ लाखांच्या बिलाचा हिशेब नाही मिळणार:डॉक्टर सिंघानिया यांची मुजोरी
सेवाव्रती डाॅक्टर पेशातील अनेक डॉक्टरांनी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळ्याचे शहरात शर्मनाक दृष्य
मनपाला फक्त दाखवण्साठी दर फलक लावले: खासगी डॉक्टरांचा उद्दामपणा
८० टक्के कोविड तर २० टक्के खासगी बेड्स दरांतून लृट
डॉक्टर सिंघानियाविरुद्ध सदर पोलिसात तक्रार दाखल
नागपूर,ता. ४ मे: २५ वर्षीय तरुणाने जयेश किशोर साखरकर याने आज सदर पोलिस ठाण्यात ‘विम्स’हॉस्पीटलचे संचालक डॉ.राजेश सिंघानिया यांच्या विरोधात ५ लाखांचे बिल उकळण्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.समाज माध्यमात सर्वदूर व्हायरल झालेल्या या ऑडियो क्लिपमधून करोना महामारीच्या भयंकर प्रकोपात सेवाव्रती म्हणजे नोबल समजल्या जाणा-या या व्यवसायात कश्याप्रकारे मृतांच्या टाळूवरील लोणीही ओरबाडून खाणारे डॉक्टरर्स घूसले आहे याची प्रचिती येते.या ऑडीयोमध्ये हे महान डॉक्टर महोदय रुग्णाच्या मूलाला चक्क सांगतात सध्या सगळीकडेच खासगी रुग्णालयांमध्ये ‘हाच दर’सुरु आहे,मी तरी ५ लाख घेतले
तुम्ही किंग्सवेमध्ये जा आणि सांगा तुम्हाला वेंटिलेटर लावायचे आहे किवा ‘न्यू इरा’रुग्णालयात जा तिथे तर दहा लाखांचा दर आहे!
जयेश याने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे त्याच्या ७० वर्षीय वडीलांना कोविड-१९ चा संसर्ग झाल्याने २६ एप्रिल रोजी कामठी रोड,सदर येथील ‘विम्स‘रुग्णालयात भर्ती करण्यात आले.या रुग्णालयात वडीलांना दाखल करतानाच त्यांच्याकडून डॉ.राजेश सिंघानिया यांनी ५ लाख रोख एडवांसमध्ये जमा करण्यास सांगितले.त्यामुळे तातडीने जयेश यांनी ४ लाख ५० हजार रुपयांची जमवाजमव करुन विम्समध्ये एडवांस म्हणून रिसेप्शनवर जमा केले.

[डॉ.राजेश सिंघानिया ]
त्यावेळी दवाखान्यात कन्सेन्ट फॉर्मवर जयेश यांच्या सह्या देखील घेण्यात आल्या.तेथे असलेल्या दर फलकावर दर्शविलेल्या दराप्रमाणे खासगी कोविड रुग्णाकरिता लागू असलेल्या दरपत्रकात आयसीयूचे बेड्सचे २० हजार तर ऑक्सीजन बेडचे १० हजार रुपये दर दिवसाचा चार्ज झळकत होता.जयेश यांच्या वडीलांना ४ दिवस आयसीयू वॉर्डमध्ये व २ दिवस ऑक्सीजन बेडवर भर्ती करण्यात आले.यानंतर वडीलांची प्रकृती बरी झाल्याने २ मे २०२१ रोजी त्यांना सुटी देण्यात आली.वडीलांवरील उपचारादरम्यान त्याच दवाखान्यातील फार्मेसीचे बिल १ लाख १९ हजार २१८ रुपयांचे आले!
वडीलांना सुटी झाल्यानंतर एकूण बिलाबाबत विचारणा केली असता विम्स हॉस्पीटलचे संचालक डॉ.सिंघानिया यांनी मला उर्वरित ५० हजार रकमेची मागणी केली व तुम्हाला बिल देणार नसल्याची मुजोरी केली. फार तर ५० हजार उर्वरित बिल देऊ नका असे ते म्हणाले.यावर जयेश यांनी तरी देखील रुग्णालयात लावलेल्या शासकीय दरपत्रकाप्रमाणे साढे चार लाख बिल होत नसल्याचे सांगून उपचारावर झालेल्या खर्चाचे बिल मागितले असता,आम्ही सगळ्यांकडूनच ५ लाख रुपये घेत असल्याचे धक्कादायक विधान डॉ.सिंघानिया यांनी केल्याचे जयेश यांनी तक्रारीत नमूद केले.
आता तुमच्या बेडवर आलेल्या नवीन रुग्णाकडून ही आम्ही ५ लाख रुपये घेतले असल्याचा कबुली जवाब डॉ.सिंघानिया यांनी जयेश यांच्याकडे दिला.एवढंच नव्हे तर आम्हाला करोनाच्या काळात परिचारिकांना ५ हजारच्या ऐवजी २५ हजार पगार द्यावा लागतो तर ऑक्सीजन सिलेंडर जे २०० रुपयांचे मिळायचे तेच आता ब्लॅकमध्ये हजार रुपयांना मिळवावे लागत असल्याची ‘मखलाशी’केली.हा सगळा व्यवहार ब्लॅकच्या पैशांचा आहे असे स्पष्टपणे सांगून बिल देण्यास नकार दिला.
या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वत्र कॅशलेस व्यवहारांसाठी प्रोत्साहन देऊन भ्रष्टाचारास आळा घालण्यास सांगत असताना नागपूरातील काही सुप्रसिद्ध खासगी रुग्णालये अश्याप्रकारे भ्रष्ट कारभार करीत असल्यामुळे जीएसटी व इंकम टॅक्सचे नुकसान होत असल्याने या भ्रष्ट रुग्णालयांच्या संचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील देशाचे भवितव्य असणा-या या तरुणाने आपल्या तक्रारीत नमूद केली आहे.
काय आहे ऑडियो क्लिपमध्ये भयाण वास्तव
-जयेश यांचा दावा डॉक्टर सिंघानिया यांनी ५ लाख जमा करण्यास सांगितले व बिल नंतर मिळेल असे सांगितले हाेते.
– माझं हे रोजचं काम मला नका शिकवू मी कोणाला काय सांगितले(डॉक्टर सिंघानिया यांची मुजोरी)
– ५ लाखाच्या बिलाचा हिशेब आम्हाला द्यावे लागल्यास आम्हाला वेंटिलेटर वापरण्याची गरजच काय?(डॉ.सिंघानिया यांचे असंवेदनशील वक्तव्य)
-पाच लाखांचे बिल देऊच शकत नाही म्हणूनच तर तुमच्याकडून आम्ही कॅश घेतले!
– मी एक लाखांच्यावर तर तुमच्या रुग्णालयांच्या फार्मेसीमधून औषधच घेतली,मी उधार उसणवार करुन साढेचार लाख जमवले,मी एवढा श्रीमंत नाही,मला बिल हवे आहे,मी यासाठी पैसे जमा केले की तुम्ही नंतर योग्य ती कपात करुन मला पैसे परत कराल,माझ्या वडीलांवर उपचार लगेच सुरु होऊ शकेल,जयेश यांचा आर्जव(यावर डॉ.सिंघानिया यांचे चमत्कारिक हास्य,एकदाच तर बिल भरता ना,आता विसरुन जा,जे झाले ते झाले……)
– तुम्हाला बिलच हवे असले तर स्टॅण्ड बाय वेंटिलेटर व बॅकपचे माझे चार्जेसच ५ लाख रुपये आहेत!
-मग बाहेर रेट बोर्ड का लावले?ते तर आम्ही मनपा सांगते म्हणून लाऊन ठेवतो!कोविडवाल्यासांठी वेंटिलेटर्स नसतातच आमचे!एक वेंटिलेटर असा कोणा रुग्णासाठी व्यस्त करुन आम्हाला काय फायद्या?याला काही अर्थच नाही…..!
-मला नोकरीवर लागून फक्त एक वर्ष झाले,माझे वडील ७० वर्षांचे असून निवृत्त झाले आहेत मी एवढं बिल अर्फोर्ड करुच शकत नाही…..!यावर डॉक्टर म्हणतात,तुम्ही ज्या दिवशी आपल्या वडीलांना भर्ती केले त्याच वेळी जर आम्ही तुम्हाला रसीद नाही दिली तेव्हाच तुम्ही समजून जायला हवे होते!
जयेश-याचा अर्थ इंसानियत,माणूसकी काहीच नाही उरली का सर?डॉक्टर-हा इंसानियतचा प्रश्नच नाही,उलट आम्ही तुमच्या रुग्णाला भर्ती करुन घेतले त्यांचा जीव वाचवला वरुन तुम्हीच आम्हाला माणूसकी शिकवणार? २० टक्के रुग्णांकडून आम्ही खासगी डॉक्टर किती पैसा घेतोय याच्याशी सरकारला काही एक घेणे-देणे नाही.आमची माणूसकीच काढायची असेल तर मीच आता सांगतो की तुम्ही मला काहीच पैसे दिले नाही….मलाच तुमच्याकडून ५ लाख रुपये घेणे आहे तर काय कराल?
-तुम्ही किंग्जवे किवा न्यू इरामध्ये जा,तिथे तर दहा लाखांचा दर आहे,आम्ही तरी अश्या रुग्णांना भर्ती करतो ज्यांचे प्राण वाचण्याची शक्यता असते…..!न्यू इरामध्ये जर असेही रुग्ण भर्ती करुन घेतात माहीती असतं तीन दिवसांनी तो मरणार आहे तरी देखील ५ लाख रुपये रुग्णांच्या नातेवाईकांडून घेऊन घेतात…..!
– माझ्याकडे तर रुग्णांची लाईन लागली आहे..दररोज मला फोन येतात…..!पण मी जे वाचू शकतात तेच रुग्ण भर्ती करुन घेतो(डॉ.सिंघानिया यांची महानता!हीच शपथ घेतली होती पदवी घेताना,प्रत्येक जीव वाचवण्याचा प्रयत्न करेल,माणूसकीच्या कर्तव्याला कधीच चूकणार नाही!)
– जे रेमडिसिव्हिर बाहेर तुम्ही २५-३० हजारांमध्ये घेता ते आम्ही साढेचार हजारात देत आहोत….!(इथेही रुग्णांवर उपकार करण्याची या महानतम डॉक्टरांची भाषा)
……..
कोविडच्या इतिहासात या खासगी डॉक्टरांचे नाव काळ्या अक्ष् रांनी लिहल्या जाणार…..
करोना महामारीच्या काळात ज्यांना करोनाचा जीवघेणा संसर्ग झाला त्या रुग्णाच्या कुटुंबियांची वेदना ही देखील या महामारीसारखीच भीतीदायक आणि अतिशय वेदनादायक आहे.अक्ष् र: आठ ते १० लाख भरुनसुद्धा त्यांचा माणूस खासगी रुग्णालयांतून घरी परत येत नाहीत….!ही महामारी १०० वर्षांतून पहील्यांदा भारतात आली,मात्र जगभरातील खासगी रुग्णालये व भारतातील खासगी रुग्णालये यांच्या सेवाव्रती कर्तव्यात जमीन-आसमानचे अंतर आहे.प्रत्येकाने रुग्ण माणसाला लृटले.खासगी रुग्णालये,यानंतर दहन घाटामध्ये कंत्राटदारांच्या कर्मचा-यांनी,मनपाने,सरकारने,रुगण्वाहिका,शववाहिका….सर्वांनीच..ते ही गेल्या तब्बल १४ महिन्यात हाताला कोणतेही काम नसताना…..!
खासगी डॉक्टरांना तर ही करोनाची लाट म्हणजे पैसे लृटण्याची संधीच गवसल्यासारखी झाली.ही लाट आज ना उद्या कधी ना कधी आेसणारच मात्र जेव्हा कधी कोविड-१९ चा इतिहास लिहल्या जाईल तेव्हा या खासगी रुग्णालयांची लूबाडणूक काळ्या अक्ष् राने लिहल्या जाईल.पुढील पिढी हा इतिहास वाचणार आहे.माणूसकीची एक सर्वोत्तम संधी नियतीने दिलेली अश्या काही खासगी रुग्णालयांनी कायमची गमावली.सर्वसामान्य माणसांच्या ह्दयातील आदराचे स्थान कायमचे गमावले,जयेश हा २५ वर्षीय तरुण….हा नवीन पिढीचा तरुण याचे ज्वलंत उदाहरणच म्हणावे लागेल.
काय करतात आहेत खासदार?आमदार?
नागपूर शहरात एवढी लृट माजली असताना या शहराचे खासदार हे ऑक्सीन,वेंटिलेटर इतर ठिकाणाहून आणण्यात व्यस्त असले तरी,या लृटीवर त्यांचे नियंत्रण का नाही?कुठे गेलेत सर्व पक्ष्ीय आमदार?बंगाल मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात भाजप नेते उद्या सकाळी धरण्यावर बसणार आहेत मात्र एखाद्या तरी खासगी रुग्णालयाच्या दारात सर्वसामान्य रुग्णासाठी त्यांनी धरणे दिलेत का?हा प्रश्न येत्या निवडणूकीत नागपूरकर जनताच त्यांना विचारणार आहे,यात दूमत नाही.
नागपूर शहराचे हे दूर्देव आहे महामारीच्या या भयावह काळात पश्चिम महाराष्ट्रासारखे कणखर राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी त्यांना लाभले नाहीत…. यात विभागीय आयुक्त,पालकमंत्री,जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त व महापौरांसारखे पद हे सर्वथा निष्क्रिय लोकांनीच भरले असल्याची व्यथा सोशल मिडीयावर चांगलीच व्यक्त होत आहे……!
–




आमचे चॅनल subscribe करा
