
’

नागपूर,ता. ९ ऑक्टोबर: एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत महाराष्ट्राच्या उपराजधानीत सामुहिक बलात्कारासारखा जघन्य अपराध घडला,मात्र एवढ्या मोठ्या घटनेची दखल हवी जशी माध्यमांनी,सामाजिक संघटनांनी,राजकीय पुढा-यांनी घेतलीच नाही.नेहमीप्रमाणे एफआरआर नोंदवण्यात आली,हाथरसमध्ये क्रोर्य घडलं आणि जगभरातील माध्यमांचा,राजकारण्यांचा ओघ त्याच दिशेने धावला,मात्र नागपूरात २५ ऑगस्ट २०२० रोजी एका अनुसूचित जातीच्याच अल्पवयीन मुलीसोबत जे क्रोर्य घडलं,त्याकडे मात्र आरोपीही त्याच जातीचे असल्याने क्रोर्याचे गांर्भीय हे व्यवस्थेच्या व माध्यमांच्या दृष्टिने नगण्य झाले त्यामुळे संविधान चौकात कोणतेही धरणे,आंदोलने या पीडीतेच्या न्यायासाठी झालेच नाही,असा संताप आज पिडीतेच्या आईने खास ’सत्ताधीश’कडे व्यक्त केला….!
काय आहे घटना?
जरीपटकच्या समोर पाण्याच्या टाकीजवळ राहणा-या पीडीतेला वडील नाही. त्यांच्या मृत्यू दोन वर्षांपूर्वी झाला. पीडितेची आई कॅटरिंगमध्ये काम करते. पीडीतेला दोन भाऊ आहेत एक १९ वर्षाचा तर एक १७ वर्षाचा.पीडीता ही घरात सर्वात लहान त्यामुळे सर्वांची लाडकीच होती.आईसाठी तर एकूलती एक लेक असल्याने ती त्यांचं ‘काळीजंच’ आहे. कॅटरिंगच्या कामासाठी शेजारच्या अमित बोलके नामक ऑटो चालकाची तिला नेहमी मदत होत असे. त्याचा साळा यश मेश्राम हा आईला व वस्तीतील इतर महीलांना घेऊन जाण्यासाठी नेहमी येत असत.या मुलाशी पीडीतेची देखील ओळख,संभाषण,आकर्षण,प्रेम अश्या स्वाभाविक नैसर्गिक भावना गुंतल्या.यश मेश्राम हा त्याच्या अनित बोलके, रितीक मोहिले व व अभिनेश देशभ्रतार या मित्रांना घेऊन पिडीतेच्या घरासमोरच येऊन बसत असत. २५ ऑगस्ट रोजी यश हा पीडीतेला दुचाकीवरुन नारा गावाच्या गंगोत्री लॉन्ससमोर एका सुनसान ठिकाणी घेऊन गेला. त्या ठिकाणी आधी यश मेश्रामने या नंतर तिथे पोहोचलेले अनित बोलके,रितीक मोहिले व अभिनेश देशभ्रतार या तिघांनी ही तिच्यासोबत बळजबरीने अत्याचार केला. यश तिला दुचाकीवरुन पुन्हा घरी घेऊन आला व तिला याबाबत घरी काही सांगशील तर तुझ्या भावांचा खून करु अशी धमकी दिली त्यामुळे ती घाबरली.
पीडीता ही भावनिकरित्या या चक्रव्यूहात अडकली तर आरोपी याने सर्व कट-कारस्थान हे जाणून-बूजून रचले.पीडीतेचा मोठा भाऊ बहीणीला नेहमी बाहेर अंगणात खेळायला व आरोपीसोबत बोलण्यास टोकायचा.‘तू आता मोठी झाली आहेस,बाहेर आता खेळू नकोस’असा तो नेहमीच तिला रागवत असे .
पीडीता ही वयाने लहान असल्याने जगाच्या क्रोर्याची ओळख असण्याचा प्रश्नच उद् भवत नाही. विश्वासाने पीडीता आरोपीसोबत निर्जनस्थळी गेली असता,३२ वर्षीय तसेच २७ व २४ वर्षीय इतर तीन आरोपी देखील त्या ठिकाणी पोहोचले.त्या सर्वांनी पीडीतेसोबत बळजबरीने शारिरीक संबंध स्थापित केले.हा या अल्पवयीन व बालिश असणा-या मुलीसाठी फार मोठा मानसिक धक्का होता. ती आठ दिवस तापाने फणफणली,आईला मासिक पाळीचा त्रास वाटला,तसं ही जगातली कोणतीही आई ही आपल्या तरुण होत जाणा-या मुलीसोबत असं क्रोर्य घडू शकंत,अशी कल्पनाही करु शकत नाही.
शारिरीक पीडेपेक्ष्ा मानसिक व भावनिक उमटलेला मनावरचा व मेंदूवरचा ओरखडा हा पीडीतेसाठी खूप खूप खोलवरचा होता. काळ हे कोणत्याही जखमेवरचं सर्वात मोठं औषध असतं,हळूहळू ती सावरत असताना,एक दिवस ती दूध आणायला दूकानात गेली असता,शेजारीच राहणारे ते आरोपी तिला पुन्हा धमकावू लागले, त्या ‘क्ष् णांची’आठवण काढून घाणेरडे शब्द बोलू लागलेत,त्यांची मजल पुन्हा तिला एकदा त्याच निर्जन स्थळी घेऊन जाण्यासाठी,धमकावण्यापर्यंत गेली….यावेळी मात्र नियतीने तिला सद् बुद्धि दिली..तिने घडलेली घटना आपल्या जन्मदात्रीला सांगितली आणि……!जन्मदात्रीवर दू:ख आणि संतापाचे आभाळच कोसळले!एक स्त्री आपल्या पिल्लांसाठी जगातील कोणतीही आपदा अंगावर घेण्यासाठी सज्ज होत असते,या आईने देखील तेच केले.
तडक आपल्या मुलीला घेऊन जरीपटका पोलीस ठाणे गाठले. दूपारी दोन-अडीच वाजता पोलीस ठाण्यात पाेहोचलेल्या या माय-लेकींना साधी एफआयआर नोंदवायला व एफआयआरची कॉपी मिळवायला रात्रीचे साढे अकरा वाजले……!
एवढेच नव्हे तर जरीपटका ठाण्यातील पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यासाठी सब इन्सपेेक्टर दर्जाची अधिकारीच त्या वेळी ठाण्यात हजर नव्हती. तिच्या येण्याची वाट बघत रात्र दाटून आली.मात्र जिद्दीला पेटलेल्या या जन्मदात्रीला काहीही करुन माणूसकीला काळीमा फासणा-या त्या चारही नराधमांविराेधात एफआयआर नोंदवायचीच होती.रात्री साढे अकरा वाजता या माय-लेकी घरी आल्या आणि येथेच एका भ्रष्ट व्यवस्थेने बालकांचे लैंगिक शोषनानासून संरक्ष् ण करणा-या पोक्सो कायद्याची धज्जीया उडवल्याचे सिद्ध झाले….!
एफआयआर नोंदवल्याच्या दुस-या दिवशी पीडीतेची मेडीकल टेस्ट करण्यात आली.

काय म्हणतो पोक्सो कायदा?
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या ज्येष्ठ वकील ॲड.शिल्पा गिरडकर यांच्या मते ‘बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा-२०१२ च्या कलम २१ नुसार जरीपटका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिका-यांनी ज्याप्रमाणे पोस्को कायद्याचे उल्लंघन केले आहे ते बघता या कलमाखाली संबंधित पोलीस अधिका-यांना ६ महिन्यांची शिक्ष्ा व दंड किवा दोन्ही सोबतच होऊ शकते.त्यांनी पीडीतेचे बयाण नोंदवण्यासाठी जी दिरंगाई केली,ती या कायद्याचे सरळ-सरळ उल्लंघन आहे.
या कायद्याप्रमाणे जरीपटका पोलीसांनी साध्या वेषात पीडीतेच्या घरी जाऊन तिचे बयाण नोंदवणे बंधनकारक होते.कारण पीडीता ही अल्पवयीन म्हणजे १६ वर्षाखालील आहे. २००५ चा तिचा जन्म आहे याचा अर्थ १५ वे वर्ष तिला सुरु आहे.पीडीतेची २४ तासांच्या आत मेडीकल तपासणी करणे बंधनकारक होते जी जरीपटका पोलिसांनी दुस-या दिवशी केली! घटनेच्यावेळी पीडीतेने घातलेले कपडे ताब्यात घ्यायला हवे होते. पोक्सो कायद्यानुसार पीडीतेचे बयाण फक्त सब इन्सपेक्टर किवा त्यावरील अधिकारीच नोंदवू शकतो. एफआयआर नोंदवताच घटनेची माहिती बाल न्यायालयाला कळवेण बंधनकारक होते.पीडीतेचे बयाण घेताना तिच्या आईला अतिशय वाईट पद्धतीने तेथील एका पोलीस कर्मचा-यांनी बाहेर बसण्यास सांगितले.मात्र पोक्सो कायद्याप्रमाणे पीडीत ही अल्पवयीन असल्याने तिचे आई-वडील किवा जवळचे नातेवाईक यांच्या उपस्थितीतच पीडीतेचे बयाण नोंदवणे बंधनकारक असताना पीडीतेच्या आईला बाहेर बसण्यासाठी उद्धटपणे सांगण्यात आले.मात्र एफआयआरमध्ये नोंदवलेल्या गुन्हाप्रमाणेच पुढे संपूर्ण न्यायालयीन लढा लढायचा असल्याचे माहिती असल्याने पीडीतेच्या आईने बाहेर बसण्यास नकार दिला व पीडीतेचे बयाण नोंदवताना सोबत उपस्थित राहीली.
या शिवाय पीडीतेचे तातडीने तज्ज्ञांकडून समुपदेशन होणे गरजेचे होते.हे देखील जरीपटका पोलिसांनी केले नाही. पीडीतेला केंद्राकडून मिळणारे आर्थिक सहाय्य मिळवून देणे हे पोलिसांचेच काम असल्याची माहिती ॲड.शिल्पा गिरडकर यांनी ‘सत्ताधीश’ला दिली.पीडीतांना मानसिक धैर्य म्हणून कोट्यावधीचा निधी केंद्र सरकारकडून मिळतो मात्र पीडीतांना ही मदत न मिळता संपूर्ण निधी हा परत जात असतो मात्र पोलीस ठाण्यातील माणूसकी नसलेली व्यवस्था हा निधी पीडीतांना मिळवून देण्याबाबत कोणतेही सहकार्य करीत नसल्याचे ॲड.गिरडकर म्हणाल्या.
नुसता पोक्सो कायद्यांची कलमे लावून गुन्हा दाखल करणे यातच पोलिसांच्या कर्तव्यांची इतिश्री होत नसते,असे ही त्या म्हणाल्या.

का घडली घटना?
मानसोपचारतज्ज्ञ डॉ.सुशील गावंडे यांच्या मते हे वय शरिरात हॉर्मोन्समधील बदलांचा असतो.मुलींमध्ये ‘इस्ट्रोजन’नामक स्त्राव स्त्रवत असतो या शिवाय मासिक पाळी सुरु होते. या स्त्रावाचा मेंदू व मनावर चार प्रकारे परिणाम होत असतो.१) स्वतंत्र निर्णय घेण्याची वृत्ती बळावते. २)धाडसी निर्णय घेण्यास मन मागे पुढे पाहत नाही.३)आपल्या वयाच्याच इतर मुला-मुलींचे बाॅय फ्रॅण्ड,गर्ल फ्रॅण्ड आहेत ही भावना त्यांनाही असे संबंध प्रस्थापित करण्यास बळ देते.४)विरुद्ध लिंगी आकर्षणात पडतात.
चित्रपट किवा मालिकांमधील अनेक भावनिक,काल्पनिक गोष्टी त्यांना आनंद देतात.या वयात त्यांना ते काल्पनिक जगच खरं वाटत असंत.खरं प्रेम आहे की नाही हे कळण्याचं त्यांचं वय नसतं.वैचारिक गोष्टी कमी आणि शारिरीक आकर्षण जास्त असतं.
या घटनेत पीडीता ही अल्पवयीन असल्याने तिला आपण काय करतोय,कशाला विश्वास ठेऊन २४ वर्षीय मुलासोबत जातोय?याचे पुढे काय परिणाम होतील?हे कळण्याचं,समजण्याचं वय नव्हतच मात्र २४ वर्षीय आरेपीने हे सगळं कृत्य समजून-उमजून केले.आधी तिला प्रेम प्रकरणात गुंतवले.या वयाच्या मुलींना कोणतेही कृत्य केले तरी शांत बसवणे अगदी सोपे आहे हे त्याला माहिती होते,याच ठिकाणी पीडीता ही २४-२५ वर्षांची असती तर असे घडणे शक्यच नसते. मात्र या आरोपींनी तिच्या अविकसित मेंदूचा फायद्या घेतला,तिच्या विश्वासाची,भावनांची हत्या केली.तिला भावांचा खून करु अशी धमकी देऊन घाबरवले.हेच आणि असेच कृत्य या आरोपींनी आधी देखील निश्चितच केले असावे,असे डॉ.गावंडे सांगतात.
मुलींना घरी बसवणारे पालक मात्र मुलांना रात्र झाली की घरी बसवत नाहीत असे जर घडले तर मुली बाहेर सुरक्ष्ति राहतील,मुलींना धाकात ठेवण्यापेक्ष्ा मुलांना संस्कारात ठेवा,असा सल्ला ही डॉ.गावंडे देतात.
नगरसेविका पीडीतेच्या घरी फिरकल्यासुद्धा नाहीत!
‘सत्ताधीश’ खास या घटनेचा पाठपुरावा करण्यासाठी पीडीतेच्या घरी गेला असता बहूजन समाजवादी पक्ष्ाच्या नगरसेविका मंगला लांजेवार या पीडीतेच्या घरापासून अवघ्या ५ मिनिटांच्या हाकेच्या अंतरावर रहात असल्याचे कळले.मात्र त्या पीडीतेच्या घरी सांत्वन करण्यासाठी पोहोचल्या नाहीत,या चार आरोपींपैकी एक आरोपी हा तर नगरसेविकेच्या घरापासून चार घरे सोडूनच रहातो,उद्या तो उघडपणे या ‘बारागल्ली’ फिरेल मात्र पीडीतेने तोंड लपवून घरात बसावे,आरोपींनी उघडपणे वावरावे,एक महिला असूनही असे या नगरसेविकेला वाटत असावे,अशी चर्चा आज ऐकू आली.हा साधा रेप नसून ‘गँगरेप’होता,याचे देखील गांर्भीय नगरसेविका लांजेवार यांना कळले नाही,घटना घडून एक महिना उलटला,एफआयआर २८ सप्टेंबर रोजी नोंदवण्यात आली मात्र अद्याप नगरसेविका मंगला लांजेवार या पीडीतेच्या घरी फिरकल्यासुद्धा नाहीत.याशिवाय प्रभाग क्र ७ मधीलच इतर तीन नगरसेवकांमध्ये बसपचेच एक इब्राहिम टेलर आहेत,एक लष्करी बाग तर एक टेकानाकामधील नगरसेवकही आहेत मात्र या चारही नगरसेवकांना हाथरसमध्ये काय घडले याची इथंबूत माहिती असावी मात्र आपल्याच प्रभागात काय घडले?या विषयी काहीही घेणे-देणे नाही,मत मागण्यासाठी या प्रभागात दारोदारी फिरणा-या राजकारण्यांच्या या कोत्या मनोवृत्तीबाबत देखील उपस्थित मंडळी चीड व्यक्त करीत होती.

आरोपींना जर जामिन मिळाला तर नगरसेविकाविरुद्ध ‘We 4 change’संघटना करणार आंदोलन-
नगरसेविका मंगला लांजेवार यांनी त्यांच्या घराजवळ घडलेल्या एवढ्या गंभीर घटनेची साधी नोंद देखील घेतली नसल्याने शहरातील ‘v for change’या संघटनेने सरळ-सरळ त्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. आरोपी हा अगदी त्यांच्या घराजवळ राहत आहे तर पीडीता त्यांच्या घराच्या पाठीमागील गल्लीत राहते,मात्र तरी देखील नगरसेविका यांना पीडीतेच्या घरी जाऊन त्यांना कायदेशीर मदत देता आली नाही,माणूसकीच्या नात्याने साधी चौकशी देखील करता आली नाही,पीडीताच्या कुटुंबियांच्या बाजूने कोणीही लढणारे नाहीत,३२ वर्षीय अारोपीच्या बायकोने तर पीडीतालाच घाणेरड्या शिव्या घातल्या,तर इतर तिन्ही आरोपींचे कुटुंबिय हे देखील पीडीतेच्या अगदी आमोरासमोर रहातात,त्यांच्या जन्मदात्री आमची मुले ही सुखरुप सुटून येतील असा दम पीडीतेच्या कुटुंबियांना देतात मात्र तरी देखील या प्रभागातील एक ही नगरसेवकांना, पीडीताच्या घरी जाऊन त्यांना मानसिक,भावनिक धीर देण्याची गरज वाटली नाही?

नगरसेविका मंगला लांजेवार यांच्या घरात तर बसपा सुप्रिमो मायावती यांच्या फोटाे लागला आहे,संपूर्ण वस्तीत ठिकठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर असणारे फलक झळकतात आहेत मात्र येथील पीडीतेच्या कुटुंबियांना त्यांना एक फोन ही करावासा वाटला नाही,यातच सर्व पक्ष्ीय राजकारण आले.भिंतीवर फक्त मायावती यांचा फोटो लावून ‘न्याय’मिळणार आहे का?असा प्रश्न या संघटनेच्या दीपाली मेश्राम विचारतात!
या आरोपींना जर जामिन मिळाला तर आमची संघटना याच वस्तीत येऊन नगरसेविका मगंला लांजेवार यांच्या घरामसारे तीव्र आंदोलन करेल असे संघटनेचे पदाधिकारी दिपाली मेश्राम, डी.योगिता,डॉ.रश्मी पारसकर यांनी खास ‘सत्ताधीश’ला सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
