
जरांगे पाटील प्रकरणात सलील देशमुखांचा आरोप
मोदींच्या मंत्रीमंडळाचे सूटबूट शिवून झाले:सलील देशमुख
विदर्भाच्या अकरा जिल्हांमध्ये घरोघरी ‘तुतारी’ पोहोचवणार
मतदारांना सागंणार शरद पवारांचा संघर्ष
शनिवारपासून नरखेडपासून मोहिमेस सुरवात
इतर राष्ट्रात बॅलेट पेपरवर निवडणूका मग भारतात काय समस्या?
नागपूर,ता.२६ फेब्रुवारी २०२४: सध्या अवघ्या महाराष्ट्रात मराठा-ओबीसी वाद शिगेला पोहाचला असून काल जरांगे पाटील यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घेऊन जी जीभ घसरली,त्याचे संपूर्ण राजकीय पटलावर चांगलेच पडसाद उमटले असून,जरांगे पाटील यांची स्किप्ट शरद पवारांची असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांनी केला.आमदार प्रसाद लाड यांनी एक्सवर पोस्ट करीत’जरांगे पाटील नव्हे तर तुतारी बोलत आहे’असा आरोप केला आहे,यावर सलील देशमुखांना प्रश्न केला असता,शरद पवारांच्या पक्षातील आमदार तिकडे गेले,त्यांनी त्यांचा पक्ष चोरुन घेतला,चिन्ह चोरले आता तरीसुद्धा त्यांना शरद पवार यांच्या नावाची भीती वाटते,काहीही जरी झालं तरी शरद पवारांचं नाव ते घेतात.याचे कारण समाजाच्या कुठल्याच घटकाचं सत्ताधा-यांवर विश्वास नाही,असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी केला. ते आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.I
पुढे बोलताना ते म्हणाले,की गोवारी समाजाची भाजपने फसवणूक केली,धनगर समाजाची फसवणूक केली,धनगर समाजाला तर सांगितलं होतं सत्ता आल्या बरोबर पहील्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्यांना आरक्षण देऊ,२०१४ पासून धनगर समाज वाटच बघून राहीला.तशाच पद्धतीचं ‘चॉकलेट’देण्याचं काम किवा भूलथापा देण्याचं काम महायुतीचं सरकार करीत असल्याचा आरोप याप्रसंगी सलील देशमुख यांनी केला.
लोकसभा निवडणूकीनंतर आपल्याला मंत्रीपद पुन्हा मिळणार की नाही? मिळाले तर सध्याचेच खाते कायम राहील का? असा विचार न करता पुढच्या ५ वर्षांच्या काळातील सरकारचा अपेक्षीत रोडमॅप आणि सरकार स्थापनेनंतरच्या १०० दिवसांतला खासदार म्हणून तुमचा स्वत: कृती आराखडा मला पाठवा,असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले,मोंदींनी संसदेत ’अब की बार ४०० पार’चा हा नारा दिला,त्याचा आणि मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना दिलेल्या सूचनेत काय साम्य आहे?हा मोदींचा विश्वास आहे,आत्मविश्वास आहे की अति आत्मविश्वास?देशाच्या इतिहासात पहील्यांदा एखाद्या पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणूकी पूर्वीच मंत्र्यांना अशी सूचना केली असल्याकडे लक्ष वेधले असता,मोदींच्या २०२४ नंतरच्या मंत्री मंडळाचे सूटबूट शिवून झाले असावे,अशी कोटी सलील देशमुख यांनी केली.
याप्रसंगी बोलताना सलील देशमुख यांनी सांगितलं की,चार दिवसांपासून शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून एक माणूस तुतारी वाजवत असनाचे चिन्ह मिळाले जे फार चांगले चिन्ह असल्याचे ते म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची,शरद पवार गटाची आता नवीन सुरवात झाली असल्याचे ते म्हणाले.मी गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण भागात,अनेक तालुक्यात,विविध समाज,धर्मातील लोकांमध्ये फिरत असून सगळ्यांनी मला हे फार चांगलं चिन्ह मिळाले असल्याची प्रतिक्रिया दिली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरवात ही तुतारी वाजवूनच केली जात असल्याचे सलील देशमुख म्हणाले.हे चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार हे अत्यंत पोटतिडकीने रायगढच्या किल्ल्यावर गेले आणि या चिन्हाचे अनावरण केले.त्याप्रसंगी माजी गृहमंत्री व विदर्भाचे लाडके नेते अनिल देशमुख हे देखील त्यांच्या सोबत होते.
आता आम्हा तरुणांची ही जवाबदारी आहे की ‘तुतारी’ हे चिन्ह आम्ही विदर्भाच्या अकराही जिल्ह्यांमध्ये पोहोचवणार,विदर्भातील तेराही तालुके,एवढंच नव्हे तर नागपूरातील सहाही विधानसभ,ग्रामीण मध्ये असणारे तेरा तालुके आणि सहा विधानसभेबरोबरच घरोघरी हे चिन्ह आम्ही पोहोचविणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.त्याच वेळी शरद पवार यांचा संघर्षही घरोघरी पोहोचविणार.कशा पद्धतीने आम्हाला डावलून,चुकीचा व्यवहार करुन आमचा पक्ष,आमचं चिन्ह चोरुन घेतलं,हे जनतेला सांगणार.
चिन्ह बदलल्यामुळे निवडणूकी काही फरक पडण्याची शक्यता आहे का?असा प्रश्न केला असता ग्राम पंचायतीच्या निवडणूकांमध्ये सरपंच,वार्ड,दुस-या वार्डातील तसेच प्रभागातील उमेदवार हे वेगवेगळ्या चिन्हांवर लढत असतात,राजकीय पक्षांचे चिन्ह अश्या निवडणूकीत मतदारांसमोर नसतं,फक्त पंधरा दिवसात उमेदवारांना आपलं निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवावे लागतात,त्यामुळे येत्या निवडणूकीत आमचं निवडणूक चिन्ह बदलले असले तरी त्यातुळे काहीही फरक पडणार नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.
ग्रामीण भागात लोकांना या सरकारची कामगिरी चांगल्याने माहिती असल्याचे देशमुख यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.२०२१ मध्ये महाविकासआघाडीची सरकार असताना कापसाचे भाव प्रति क्विंटल १२ हजार रुपये होते आज ते ७ हजारांपर्यंत घसरले आहे.सोयाबिनला फक्त ४ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.संत्रा-मोसंबीवर केंद्र सरकारचे आयात-निर्यात धोरणाचे परिणाम झाले आहेत.हे सरकार शेतक-यांच्या मागे उभे राहीले नाहीत.पंजाब-हरियाणातील शेतक-यांनी दिल्लीत येऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्गांवर खिळे ठोकण्यात आले.देशात बेरोजगारांची स्थिती दयनीय आहे.
‘ॲडवांटेज विदर्भ’या उपक्रमात तर गिरणी कामागारांनी ५ रुपये प्रति यूनिटपेक्षा कमी दराने वीज देणार असाल तरच काम करणार असल्याचे सांगितले अन्यथा इतर राज्यात रोजगार हलविण्याचा इशाराच सरकारला दिला असल्याचे सलील देशमुख यांनी सांगितले.
येत्या काळात जर या सरकारची हिंमत झाली की महाराष्ट्रातील साढे तीनशे नगर परिषदा,२०-२२ महानगरपालिकेची निवडणूक जाहीर केली तर तुतारी चिन्ह घरोघरी पोहाचलेले असेल.येत्या लोकसभेमध्ये तर ‘दूध का दूध पानी का पानी’ होऊनच जाईल,यात शंका नाही.येत्या शनिवारपासून नरखेडमधून आम्ही या मोहिमेची सुरवात करणार असल्याचे सलील देशमुख म्हणाले.
याप्रसंगी ईव्हीएम वोटींग मशीन विरोधात चाललेल्या आंदोलनाविषयी विचारले असता,हे सरकार बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास का घाबरते?असा सवाल त्यांनी केला.९९ टक्के विपक्ष मागणी करतोय की ईव्हीएम बंद करा,लोकशाही देशात पारदर्शिता ठेवण्यात यावी कारण माझं मत कोणाला जातंय हेच जर मतदाराला कळत नसेल तर ही हूकूमशाहीच झाली असल्याचे त्यांनी सांगितले.देशातील जनतेचा ईव्हीएमच्या विरोधात एवढा जास्त रोष आहे तर बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्यात हरकत काय?मतमोजणीत थोडे जास्त प्रशासकीय कर्मचारी लागतीत व निकालासाठी एक ते दीड दिवसांचा वेळ अधिक लागेल.आज देशात सुसज्ज यंत्रणा आहे मात्र,पारदर्शिता ही महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्र परिषदेत संजय चरडे,सचिन चरडे,सुदर्शन नवखरे,उदय बनसोड,ओमजी खत्री,जाकीर शेख,योगेश मांडवेकर,प्रणव म्हैसकर,नरेश तवले ,विश्वजित चावडीया आदी उपस्थित होते.
…………………………….




आमचे चॅनल subscribe करा
