फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसतरंजीपुरा,मोमिनपूरा सील असताना शेकडो मजूर पडले बाहेर!

सतरंजीपुरा,मोमिनपूरा सील असताना शेकडो मजूर पडले बाहेर!

Advertisements

वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी मनपा रुग्णालयांसमोर मजूरांची तूफान गर्दी

डाॅ.ममता खांडेकर
(senior journalist)

नागपूर,ता.६ मे: नागपूर शहराचे रेड झोन ठरललेले सतरंजीपुरा तसेच मोमिनपूरा हे भाग महापालिका प्रशासनाने संपूर्णत: सील केले आहेत.या भागातून चिटपाखरु देखील बाहेर पडू शकत नसल्याचा दावा केला जात अाहे. केवळ नागपूर पोलिसच नव्हे तर सीआरपीएफ,एसआरपीएफचे जवान या ठिकाणी खडा पहारा देत असताना शहरातील विविध झोनमधील मनपाच्या रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी या भागातील शेकडो मजूर देखील बाहेर पडल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे.

राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे शहरातील लॉक डाऊनमुळे अडकून पडलेल्या मजूरांची नोंद केली जात आहे. त्यांना परत पाठवण्यासाठी विशेष रेल्वे व बसेसची व्यवस्था केली जात आहे. मात्र मजुरांना परत पाठवण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करुन तसे प्रमाणपत्र त्यांना घेणे आवश्‍यक करण्यात आले आहे. शासनाच्या या आदेशामुळे शहरातील शेकडो मजूर हे मनपाच्या झोननिहाय रुग्णालयात तूफान गर्दी करीत आहेत.विशेष म्हणजे अनेकांनी ते सतरंजीपुरा,माेमिनपुरा भागातून आलल्याचे वैद्यकीय अधिका-यांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाचे म्हणजे,दररोज एकूण किती मजुरांना असे वैद्यकीय प्रमाणपत्र मनपा रुग्णालयांतर्फे जारी केले पाहिजे,असा कोणताही नियम आयुक्त तुकारम मुंढे यांनी जाहीर केला नाही.प्रत्येक झोनमध्ये दोन असे रुग्णालय प्रमाणपत्र देण्यासाठी आयुक्तांनी निश्‍चित केले आहे.परिणामी या रुग्णालयात मजुरांच्या संख्येवर कोणतेही नियंत्रण राहत नसल्यामुळे,या ठिकाणी कर्तव्य बजावणारे मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी हे अतिशय गंभीर संकटात सापडले आहेत.

एकाच वेळी ५०० मजुरांची गर्दी होत असल्यामुळे संपूर्ण व्यवस्थेवर ताण पडत असतानाच कोरोना विषाणूच्या संक्रमणाची शक्यता ही कैक पटीने वाढली आहे. एका दिवशी फक्त २०० मजुरांना एका केंद्रावर वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची सूचना आयुक्तांनी देणे क्रमप्राप्त असताना,अश्‍या कोणत्याही सूचना मुंढे यांनी अद्याप दिल्या नाहीत,हे विशेष!

अनेक केंद्रांवर मजुरांचे लोंढे हे रांग संपत नसल्याचे बघितल्यावर रुग्णालयांच्या भिंतीवरुन उड्या मारुन आत येत आहेत. या ठिकाणी अल्प पोलीस दल तैनात असल्यामुळे त्यांना देखील आता हे मजूर जुमानत नसल्याचे दृष्य आहे.

मूळात शहरातील रेड झोन भागातून हे मजूर बाहेर पडलेच कसे,कोणत्या स्थानिक नगरसेवक व नेत्यांची त्यांना फूस लाभली आहे,याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरातील इतर भागांपेक्ष्ा मोमिनपूरा,सतरंजीपूरा,बैरागीपुरा या सारखे प्रभाग मजुरांना वास्तव्यासाठी स्वस्त पडतात, इतर भागात एवढ्या मजुरीमध्ये त्यांचा निभाव लागणे कठीण असल्यामुळेच याच भागातून या शहरात लागू असलेल्या आणिबाणिच्या स्थितीतही ते बाहेर पडत असल्यामुळेच हे देखील वास्तव समोर आले असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र सरकारचे अनाकलनीय आदेश!

या मजुरांची वैद्यकीय चाचणी करुनच त्यांना प्रवासाची मुभा देणा-या राज्य शासनालाच अद्याप ‘कोरोना’विषाणूविषयी अल्प माहिती असल्याची टिका आता होत आहे. हा विषाणू मानवी शरिरात १४ दिवस राहत असून ज्या मजुरांना आज कोणतेही लक्ष् णे नाहीत त्यांन वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्यानंतर काही दिवसांनी ते कोरोनाचे वाहक छूपे वाहक बनू शकतात,एवढा मोठा धोका समोर असताना,या लोकांना देशात स्थलांतर करु दिल्यास देशात कोरोनाचा उद्रेकच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यांना कोणतीही लक्ष् णे नाहीत,असे लोकं देखील कोरोनाचे वाहक असून शकतात हे आता संशोधनानेच सिद्ध झाले आहे.

मात्र केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर अडकून पडलेल्या स्थलांतरीत लोकांचा प्रश्‍न एवढा गंभीर झाला आहे त्यांना आणखी आहे त्या ठिकाणी थांबवून ठेवणे अशक्य असले तरी ‘प्रत्येकाचीच’ कोरोना चाचणी ही आवश्‍यक करण्याची गरज असताना महाराष्ट्र शासनाने वरवरचे लक्ष् णे बघून वैद्यकीय प्रमाणपत्रे देण्याची सूचना काढणे,अश्‍या भयंकर महामारीच्या काळात ‘दूरदृष्टिचा‘अभावच म्हणता येईल.

प्रमाणपत्र देण्यासाठी एक नगरसेवकाची दादागिरी-
शहरातील एका नगरसेवकाने मनपाच्या एका आरोग्य केंद्रात पश्‍चिम बंगालमधून आलेल्या ५० ते १०० मजुरांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी मनपाच्या एका महिला वैद्यकीय अधिकारीला चक्क दमदाटीच केली. त्यांची रेल्वे ५ वा.सूटणार असल्याने त्या नगरसेवकाने या महिला वैद्यकीय अधिकारीला तातडीने त्या मजुरांना न तपासताच प्रमाणपत्र देण्यासाठी दादागिरी केली.हे सगळं शिस्तप्रिय व कठोर कर्तव्यपालक सनदी अधिकारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नाकाखाली घडत आहे. त्यांच्या वैद्यकीय अधिका-यांना नियमबाह्य पद्धतीने ५० ते १०० पश्‍चिम बंगालमधून आलेल्या मजुरांना प्रमाणपत्र देण्याची दादागिरी करणा-या ‘त्या’नगरसेवकाविरुद्ध अद्याप मुंढे यांनी कोणतीही पोलीस तक्रार केली नसल्याचे सांगितले जात आहे.

एरवी व्हायरल पोस्ट,खोटी माहिती,बदनामीकारक लिखाण ,चुकीची बातमी इ.विविध सबबीखाली पोलीस तक्रार करण्यासाठी तातडीने‘ एक्शन’ घेणारे आयुक्त त्या नगरसेवकांविरुद्ध मात्र तक्रार करण्यास ‘सायलेंट मोड’वर चालले गेल्याची चर्चा आहे.

अतिशय भेदरलेल्या त्या महिला अधिका-याने आयुक्तांना चक्क ओपीडीच बंद करीत असल्याची माहिती दिली. नियमबाह्य पद्धतीने मात्र असे प्रमाणपत्र देणार नसल्याचा बाणा त्यांनी दाखवला. वैद्यकीय अधिकारी असल्यामुळेच आणि कोरोना किती घातक विषाणू आहे, किती लवकर तो स्वस्थ माणसांमध्ये संक्रमित होतो,याची जाणीव त्यांना असल्यामुळेच त्यांनी तपासणी न करता त्या नगरसेवकाला असे प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे.

मात्र शासकीय कारभारात व्यत्यय आणणा-या त्या नगरसेवकाविरुद्ध आता आयुक्त कोणती कारवाई करतात याकडे गेल्या ४५ दिवसांपासून गपगुमान लॉक डाऊनमध्ये जीवन कंठीत असणा-या व नियमांचे कोटेकोरपणे पालन करणा-या नागपूरकरांचे लक्ष् लागले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या