Advertisements

रोकडे ज्वेलर्स महालच्या नव्या शोरूम उद घाटनाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
गर्दीने सर्व आधीचे रेकॉर्ड मोडले
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२६ सप्टेंबर २०२५:मी आता दूपारी बारा वाजता रोकडे ज्वेलर्सच्या नव्या शोरुमच्या उद् घाटनासाठी पोहोचले मात्र,रोकडे ज्वेलर्सतर्फे ग्राहकांना सकाळी सहा वाजतापासूनच विविध सवलतीच्या ऑफर देण्यात आल्या होत्या त्यामुळे मी जेव्हा सकाळी सहा वाजताचे फूटेज बघितले तर माझा,माझ्यावरच विश्वास बसला नाही,सकाळी सहा वाजता इतकी गर्दी एखाद्या सराफा दूकानात कशी होऊ शकते,याचे मलाच आश्चर्य वाटले.इतकी प्रचंड गर्दी बघून मला विश्वासत होत नाही,असे विधान सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री व ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा‘फेम प्राजक्ता माळी यांनी केले.
आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी पंडित बच्छराज व्यास चौक, महाल येथे असलेल्या रोकडे ज्वेलर्सच्या प्रतिष्ठित महाल शोरूमचे भव्य उद् घाटन त्यांच्या हस्ते झाले,या प्रसंगी त्या बोलत होत्या.हे अनाकलनीय व अविश्वसनीय असल्याचे त्या म्हणाल्या.संपूर्ण भारतात हे अगदी पहिल्यांदा घडले असेल की एखादा सराफा दूकान सकाळी सहा वाजता उघडले व ग्राहकांच्या तुडूंब गर्दीने ते फूलले.इतक्या पहाटे निदान सोने-चांदीचे किवा हिरे जडीत दागिने घेण्यासाठी तरी सामान्य ग्राहक हा घराबाहेर पडत नाही मात्र,मध्य भारतातील सर्वात मोठ्या असलेल्या नामांकित रोकडे ज्वेलरी शो रुममध्ये हा अनाकलनीय चमत्कार घडला.या नव्या,देखण्या ज्वेलरी शो रुमचे उद् घाटन माझ्या हस्ते झाले याचा खूप आनंद होत असल्याचे प्राजक्ता माळी म्हणाल्या.
रोकडे ज्वेलर्स ‘सिर्फ नाम ही काफी है’असे सांगून हे त्यांच्या पाच पिढीच्या परिश्रमाचे फलित असल्याचे त्या सांगतात.गेल्या शंभर वर्षांपासूनची रोकडे ज्वेलर्सच्या विश्वासहर्तेची परंपरा पुन्हा एकदा जपल्या गेली आहे.ग्राहकांच्या पसंदीस उतरली आहे.पारस रोकडे ही विश्वासाची परंपरा सांभाळायला समर्थपणे पुढे आलेला आहे.जेव्हा पिढ्यान पिढ्या एखाद्या व्यवसाय भरभराटीला येतो हे केवळ ग्राहकांच्या विश्वास व प्रेमामुळेच शक्य असल्याचे प्राजक्ता माळी म्हणाल्या.
आज रोकडे ज्वेलर्सच्या या नव्या शोरुममधील गर्दी याची साक्ष देते.इतकी प्रचंड गर्दी बघून मला तर असा भास झाला की रोकडे ज्वेलर्स सोने-चांदी फूकट वाटत आहेत का,अशी मिश्किली त्यांनी केली.मला स्वत:ला वेगवेगळ्या डिझाईन्स बघण्याची उत्सुकता आहे मात्र,शो रुममध्ये इतकी गर्दी आहे की मी सेलिब्रेटी असूनही मला ते शक्य होत नाही ,असे कौतूक त्यांनी केले.दागिन्यांपेक्षाही रोकडे कुटूंबियांची खरी संपत्ती ही ग्राहकांचा विश्वास व ग्राहकांचे प्रेम असल्याचे त्या सांगतात.रोकडे ज्वेलर्सच्या प्रगतीसाठी शुभेच्छा प्रदान करताना,डिसकाऊंट ऑफर संपल्यानंतर देखील अशीच भरभराट राहो,अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना त्यांनी सोन्याच्या सतत चढत्या भावावर देखील भाष्य केले.सोन्याचे भाव हे देशाच्या इतिहासात कधीच उतरताना बघितले नाही असे त्या म्हणाल्या.सोने खरेदी ही सर्वात चांगली गुंतवणूक असते, हीच भारतीय मानसिकता आहे.महिलांचं तर सोन्यावर विशेष प्रेम असल्याचे त्या म्हणाल्या.सोन्याची बाजारपेठ कधीही लय पावणार नाही.दागिन्यांची क्रेज जगभरात अशीच सुरु राहणार.
रोकडे ज्वेलर्सचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे फक्त उत्तर भारतीय नव्हे तर दक्ष्ीण भारतीय दागिन्यांची देखील अनेक व्हेरायटी येथे बघायला मिळते.सोने,चांदी,हिरेच्या दागिन्यांशिवाय प्लेटिनम दागिने देखील अतिशय आकर्षक असल्याचे प्राजक्ता माळी सांगतात.सर्वात महत्वाचं म्हणजे भेटवस्तू देण्यासाठी खूप व्हेरायटी रोकडे ज्वेलर्समध्ये मी बघितली.महाविद्यालयीन विद्यार्थिनींना जशी साधी सोन्याची चेन आवडते तसेच नववधूसाठी भारदस्त दागिने देखील येथे बघायला मिळतात.पुरुषांसाठी मी सोन्याची आकर्षक घड्याळे बघितली तर पुरुषांसाठीची ब्रेसलेट्स ही अवर्णातीत आहेत.रोकडे ज्वेलर्स दागिन्याचे असे शो रुम आहे ज्यामध्ये कुटूंबातील प्रत्येकासाठी भरपूर दागिने आहेत.
महालातील ‘महाल’सारखे हे भव्य शो रुम प्रत्येकाने एकदा तरी बघावे व खरेदी करावी,असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
पहाटे साढे तीन वाजतापासून ग्राहकांची गर्दी ही अद् भूत गोष्ट: सोनाली कुलकर्णी(सुप्रसिद्ध अभिनेत्री)

सायंकाळी पाच वाजता सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी महाल येथील या भव्य रोकडे ज्वेलर्स शो रुमला भेट दिली.याप्रसंगी त्यांनी मी विदर्भाची सून असल्याने मला वैदर्भियांनी खूप प्रेम दिले असल्याचे सांगितले.नागपूरकरांनी देखील गेल्या दीड दशकांपासून खूप जिव्हाळा लावला असल्याचे त्या म्हणाल्या.महिन्यातून एकदा तरी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामुळे मी नागपूरात असतेच असे त्या सांगतात.हे प्रेम इतकी वर्ष कायम आहे त्यामुळे त्यांनी नागपूरकरांचे आभार मानले.नागपूर,वैदर्भियांचे प्रेम आणि आर्शिवाद कायम पाठीशी असू देत,अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.रोकडे ज्वेलर्सविषयी बोलताना त्या म्हणाल्या,की नुसते भव्यदिव्य असे हे शो रुम नसून इतक्या जास्त व्हेरायटी दागिन्यांमध्ये आहे की माणूस बघून थक्क होतो.काही वास्तू फक्त बाहेरुन सुंदर असतात मात्र,रोकडे ज्वेलर्सचे हे महाल येथील शो रुम जितके बाहेरुन सुंदर आहे तितकेच आत मधून देखील भव्य असल्याचे कौतूक सोनाली करतात.महालमध्ये असलेले हे एक दागिन्यांचे‘महाल’आहे आणि त्या महालाच्या आतमध्ये इतकी सुंदर दागिन्यांची व्हेरायटी आहे ती बघून मन आनंदीत व प्रफूल्लीत होतं.महत्वाचे म्हणजे या शो रुमध्ये ‘सर्वांसाठी सर्वकाही’ आहे.श्रीमंतांपासून तर मध्यमवर्गीय,निम्न मध्यमवर्गांपर्यंत सर्व वर्गातील लोकं दागिने विकत घेऊ शकतात,असे कौतूक त्यांनी केले.
पहाटे साढे तीन वाजतापासून दागिने खरेदीसाठी गर्दी होणे ही अद् भूत गोष्ट असून दागिने खरेदीचा आनंद हा वेगळाच असतो.सोन्याचे भाव किती ही वाढू द्या,सोने हे भारतीय मानसिकतेचाच एक अलौकिक दागिना झाला आहे.त्यात ‘सोने पे सुहागा’म्हणजे रोकडे ज्वेलर्सनी दागिन्यांच्या घडणावळीवर अतिशय भरघोस सुट दिली आहे.नवरात्रीच्या शुभ मुर्हूतावर ही सवलत ग्राहकांना मिळत आहे.मी अनेक शो रुम्सला भेट देते मात्र,रोकडे ज्वलेर्सचे वैशिष्ठ म्हणजे ‘सर्वांसाठी सर्वकाही’.मंगळसूत्रांची व्हेरायटीपासून नॉर्मल,एम्पल ज्वेलरीमधील व्हेरायटी,साऊथ इंडियन असो किवा मराठमोळे दागिने सगळ्या प्रकारातील विविधता रोकडे ज्वेलर्सचे वैशिष्ठ आहे.

रोकडे ज्वेलर्सने नागपूरात आजच ग्राहकांची दिवाळी साजरी केली,अश्या शब्दात त्यांनी ग्राहकांच्या उस्फूर्त प्रतिसादाला दाद दिली.याप्रसंगी त्यांनी गळ्यातील डायमंडचा सेट माध्यमकर्मींना दाखवित मला विशेषत: डायमंड ज्वेलरी आवडत असल्याचे सांगितले.अफाट गर्दीमुळे मला आवडीचे दागिने बघायला मिळाले नसल्याचे सांगून ‘मी पुन्हा येईन’खरेदीसाठी अशी मिश्किली त्यांनी केली.याप्रसंगी केवळ आजच नव्हे तर रोकडे ज्वेलर्स येणा-या दसरा-दिवाळीसह अनेक ऑफर ग्राहकांसाठी देत असतात त्याचा नागपूरच नव्हे समस्त वैदर्भियांनी मनसोक्त आनंद लृटावा,दागिन्यांची भरपूर खरेदी करा,असे आवाहान त्यांनी केले.
अपेक्षेच्या पलीकडे मिळाले ग्राहकांचे प्रेम:पारस रोकडे
याप्रसंगी बोलताना पारस रोकडे म्हणाले, की पहाटे साढे तीन वाजतापासूच ग्राहकांनी शो रुमच्या बाहेर रांगा लावण्यास सुरवात केली होती.आम्ही अपेक्षा देखील केली नव्हती इतके प्रेम ग्राहकांचे आम्हाला आज मिळाले.मध्य भारतात हे पहील्यांदा घडले की दागिन्यांचे शोरुम पहाटे सहा वाजता उघडण्यात आले.मी स्वत: आज पहाटे चार वाजता जेव्हा शोरुम मध्ये आलो त्यावेळी माझ्याही आधी ग्राहकांनी उपस्थिती लावली होती.यानंतर तर शोरुम उघडल्या बरोबर बघता-बघता पूर्ण भरुन गेले,हे सोन्या चांदीचे शोरुम आहे असे वाटतच नाही.मी सर्वांचे आभार मानतो ज्यांनी रोकडे ज्वेलर्सवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला व इतके भरभरुन प्रेम दिले.

पहाटे सहा वाजता शोरुम उघडताच एका तासात १५०० ते १६०० ग्राहकांनी दागिन्यांच्या घडणावळींवरील ६० टक्के सवलतीचा फायदा मिळवला.दिवसभरात तर हा आकडा लाखांच्या घरात जाईल यात शंका नसल्याचे पारस यांनी सांगितले.शोरुमच्या प्रत्येक मजल्यावर फक्त आणि फक्त ग्राहकांचीच गर्दी दिसत आहे,रोकडे कुटूंबीय तर सोडा रोकडे व्यवस्थपकांनी देखील ही अपेक्षा केली नव्हती इतक्या प्रचंड संख्येत ग्राहकांची झुंबड उडेल आणि इतक्या जास्त प्रमाणात दागिन्यांची खरेदी होईल.आम्ही दागिन्यांच्या घडणावळी दरात जी विविध सूट दिली ग्राहकांनी या संधीचा भरपूर लाभ घेतला आणि रोकडे कुटूंबियांना देखील याचे समाधान लाभले त्यांनी आपल्या ग्राहकांना बचतीचा लाभ पोहोचवला.पारस यांनी समस्त ग्राहकांचे विशेष आभार मानले.
रोकडे ज्वेलर्स फक्त ग्राहकांच्या फायदासाठी: अनामिका राजेश रोकडे

रोकडे ज्वेलर्सवर ग्राहकांनी नेहमी अपरिमित विश्वास ठेवला आहे,तो आजन्म कायम ठेवावा असे आवाहन अनामिका रोकडे यांनी केले.रोकडे ज्वेलर्स हे फक्त आपल्या ग्राहकांच्या फायदासाठी व्यवसाय करतात असे त्या म्हणाल्या.महालच्या शो रुममध्ये दागिन्यांमध्ये अतिशय नवे कलेक्शन आले आहेत ते बघायला महालच्या शो रुमला ग्राहकांनी नक्की भेट द्यावी व आमच्या विविध ऑफर्सचा वेळोवेळी लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.आमचा तर विश्वास बसत नाही की पहाटे साढे तीन वाजतापासून नागपूरकर शो रुम पुढे रांगा लावतील.रोकडे ज्वेलर्सवर नागपूरकरांचा किती विश्वास आहे हे बघून मन अतिशय भारावले आहे,असे त्या म्हणाल्या.
रोकडे ज्वेलर्सच्या यशाचे श्रेय फक्त ग्राहकांचे:राजेश रोकडे
महाल येथील विदर्भाचे हे सर्वात मोठे ज्वेलरीचे शोरुम आहे याचे सर्व श्रेय मी आपल्या ग्राहकांना देतो.आमचे एकूण सहा शाखा आहेत आणि आता महाल येथील ज्वेलरीचा ऐतिहासिक महाल हा आपल्या ग्राहकांसाठी खुला झाला आहे.या शो रुमला पंचवीस वर्ष झाली असून पंचवीस वर्षांनंतर महाल येथे खरा दागिन्यांचा महाल सजला आहे,असे ते म्हणाले.मात्र,या महालाची खरी रौनक ही ग्राहकांमुळे असून, ग्राहकच आमचे दैवत असल्याचे राजेश रोकडे म्हणाले.ही रौनक प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीमुळे आणखी जास्त वाढली असून नवरात्रीच्या व्यस्त कार्यक्रमांतून त्यांनी रोकडे ज्वेलर्सच्या शो रुम उद् घाटनासाठी आपला अमूल्य वेळ दिला,यासाठी संपूर्ण नागपूरकरांतर्फे त्यांनी प्राजक्ता माळी यांचे आभार मानले.
प्राजक्ता माळीला आपण नेहमीच ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये बघत आलो आहोत,मी व माझी पत्नी त्यांच्या कामाचे दिवाने आहोत,अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली.आम्ही रोज हास्य जत्रा बघूनच झोपतो कारण जेव्हा आपण आनंद व हास्य घेऊन झोपतो तेव्हा आपला दुसरा दिवसही आनंदीच उजाडतो,असे राजेश रोकडे म्हणाले.
मागच्यावेळी रोकडे ज्वेलर्ससाठी हास्य जत्राची इतर चमू देखील आली होती मात्र,प्राजक्ता माळी यांचे जे सुहास्य आहे ते इतके मोहक आहे की मला शायरी म्हणावीच लागेल,असे सांगून ‘आपकी मुस्कुराहट देख के हम होश गवां बैठे,प्राजक्ता माळी हम होश में आने वाले ही थे के आप फिर मुस्कुरा बैठे’.राजेश रोकडे यांच्या या शायरीला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उस्फूर्त दाद दिली.
जिवनात पहील्यांदा इतकी गर्दी अनुभवली:सारंग रोकडे
जिवनात पहिल्यांदा इतकी तूफान गर्दी मी सोने खरेदीसाठी अनुभवली.आम्हाला गर्दीचे व्यवस्थापन सांभाळण्याची देखील सवड मिळत नाही.आमच्या सगळ्याच शाखांमधील व्यवस्थापकांना आम्हाला या ठिकाणी बोलवावे लागले,एवढा उंदड प्रतिसाद आम्हाला ग्राहकांचा मिळत असल्याचे सारंग रोकडे यांनी सांगितले.यावेळी त्यांनी प्राजक्ता माळी यांचे शोरुम भेटीसाठी वेळ काढल्याबद्दल विशेष आभार मानले.
पहाटे ६ वाजतापासूनच हजारो ग्राहकांनी ग्राहकांनी केली मोठी गर्दी-

विशेष ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी पहाटे साढे तीन वाजता पासूनच ग्राहकांनी शो रुम पुढे प्रचंड गर्दी केली.ग्राहकांसाठी या होत्या खास ऑफर्स:-
सकाळच्या सुरुवातीच्या तासांत सोने व चांदीच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेसमध्ये ६०% सूट (दुपारनंतर ही सूट ३०% राहिली).पूर्ण दिवसभर हिर्याच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेस पूर्णतः मोफत.
या सोबतच महाल शोरूमचा १६,००० चौरस फूटांपर्यंत विस्तार साजरा करण्यात आला असून, त्यामुळे हे विदर्भातील सर्वात मोठे ज्वेलरी डेस्टिनेशन ठरले आहे. लग्नसराईसाठी ग्राहकांनी आकर्षक दागिने निवडले आणि या ग्रँड उद्घाटनाला विदर्भातील सर्वात यशस्वी रिटेल इव्हेंट्सपैकी एक बनवले.
डबल धमाका-
ही ग्रँड ओपनिंग अशा वेळी झाली जेव्हा रोकडे ज्वेलर्सची ET टॉप ५० ज्वेलरी ब्रँड्समध्ये निवड झाली, ज्यामुळे हा उत्सव अधिक ऐतिहासिक ठरला.
याप्रसंगी असंख्य ग्राहकांशी विविध माध्यमकर्मींनी संवाद साधला असता,त्यांनी रोकडे ज्वेलर्सने उपलब्ध करुन दिलेल्या विशेष सवलतीविषयी आनंद व्यक्त केला तसेच इतक्या महागाईच्या काळात सोने खरेदीवर बचत करण्याची संधी दिल्याने समाधान व्यक्त केले.अनेक महिला ग्राहकांनी त्या मनात वेगळ्या दागिन्याची खरेदी करण्याचे ठरवून शो रुममध्ये आल्या होत्या मात्र,इतक्या जास्त व्हेरायटी बघून आपल्या बजेटमध्ये असलेले दूसरेच दागिने खरेदी करीत असल्याचे सांगितले.२६ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस भर पंडित बच्छराज व्यास चौकात फक्त रोकडे ज्वलेर्सच्या शोरुमकडे वळणा-या ग्राहकांचीच गर्दी दिसून पडली.रोकडे ज्वेलर्सच्या व्यवस्थपनातर्फे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
थोडक्यात,याप्रसंगी रोकडे ज्वेलर्सच्या समस्त संचालकांनी महाल शाखेच्या २५ वर्षांच्या परंपरेला अधोरेखित करताना यास भूतकाळाचा उत्सव आणि भविष्याकडे टाकलेले धाडसी पाऊल असे संबोधले“हा टप्पा फक्त आजवरच्या आमच्या प्रवासाचा उत्सव नाही, तर भविष्यासाठी नवे मापदंड निर्माण करणारा असल्याचे ते म्हणाले.
……………………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
