फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसंविधान चौकात‘नागपूर प्राईड‘च्या नावाने फूहड नृत्य!

संविधान चौकात‘नागपूर प्राईड‘च्या नावाने फूहड नृत्य!

Advertisements

आंबेडकरी संघटनांनी व्यक्त केला तीव्र रोष

भावना दुखावण्याचा उद्देश्‍य नव्हता: आनंद चंद्राणी

नागपूर,ता.७ जानेवरी २०२३: दर वर्षी प्रमाणे यंदा देखील तृतीय पंथी,समलैंगिक तसेच तत्सम समुदायातर्फे नुतन वर्षानिमित्त ‘नागपूर प्राईड‘चे आयोजन काल शुक्रवार दिनांक ६ जानेवरी रोजी करण्यात आले होते.मात्र,संविधान चौकात पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात चक्क ‘चोली के पीछे क्या है‘सारख्या गाण्यावर अश्‍लील नृत्य करण्यात आल्याने आंबेडकरी जनतेने यावर तीव्र संताप व्यक्त करीत, अायोजकांवर सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कठेर कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.

दर वर्षी या समुदायातर्फे ‘नागपूर प्राईड‘या उपक्रमाखाली फक्त पायी चालण्याचा(वॉक) उपक्रम राबविला जातो मात्र यंदा समुदायातील अनेकांनी केलेल्या मागणीतून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संविधान चौकात करण्यात आले.याच कार्यक्रमात अश्‍लील हावभावसह नृत्य सादर झाल्याने आंबेडकरी जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संविधान चौकाची आपली एक गरिमा असल्याचे विशद केले.डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर अश्‍या फूहड नृत्यांना परवानगी दिल्याने या गरिमेला धक्का लागला असल्याचा संताप ते व्यक्त करतात.

बाबासाहेबांच्या संविधानाने देशातील प्रत्येक भारतीयाला धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले असले तरी, या अधिकारांवर,नागरिकांनी पाळावयाच्या कर्तव्यांचे कोंदण देखील आहे.त्यामुळेच संविधानातील मूलभूत हक्क हे अर्निंबंध नाही.या समुदायालाही आनंद व्यक्त करण्याचा पूर्णत:हक्क आहे मात्र,संविधान चौकात अश्‍या आयोजनाला परवानगी देता येणार नाही,असे मत विविध आंबेडकरी संघटना व्यक्त करतात.

या संदर्भात एलजीबीटीक्यूची संघटना ‘सारथी’चे अध्यक्ष आनंद चंद्राणी यांच्याशी ‘सत्ताधीश’ने संवाद साधला असता,आम्ही फक्त तीनच कलाविष्कार सादर करणार होतो,आमचा ’वॉक’एक तासात संपला त्यामुळे अर्धा तास आम्ही मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी राखीव ठेवला होता,असे त्यांनी सांगितले.दुपारी ३ ते ६ आमचा उपक्रम पार पडला.यावेळी पहील्यांदाज मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित केला,त्यासाठी संविधान चौकात मंच बांधण्यात आला होता.हा आमचा उत्साह आणि आंनदाचा कार्यक्रम असतो.विविध समुदायातील लोक उत्साहाने दरवर्षी या उपक्रमात सहभागी होत असतात.आम्ही फक्त तीनच परफॉरमेन्स ठेवले होते,वेळेवर मंचावरुन कोणालाही त्यांची कला सादर करावयाची असल्यास त्यांनी मंचावर येऊन सादरीकरण करावे,अशी घोषण केल्याने, कोणी तरी ‘चोली के पीछे क्या है’यावर नृत्य केले.मात्र,त्यापूर्वी राधा कृष्ण यांच्यावरील नृत्य सादर झाले,याकडे टिका करणा-यांचे लक्ष का नाही गेले?

संविधान चौक या स्थळाचे महत्व भारताचे नागरिक म्हणून आम्हाला देखील माहिती आहे मात्र,याच ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे,सामाजिक संस्थांचे धरणे,आंदोलने होतात,अनेकदा भाषणात विरोधी पक्षाला शिव्या दिल्या जातात,तेव्हा निषेध का केला जात नाही?आमचा उद्देश्‍य हा कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता,ते नृत्य वेळेवर सादर झाले,त्यात ही त्या नृत्याला एक कला म्हणूनच बघता येऊ शकते,तरी देखील आमच्या उपक्रमामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही त्यांची माफी मागतो व पुढील वेळी या गोष्टीचे भान पाळले जाईल,असा शब्द देतो.

‘सारर्थी’ चे सचिव निकुंज जोशी यांनी या संदर्भात बोलताना,स्वत: माधुरी दीक्षीत सारखी अभिजात अभिनेत्री ही १९९० मध्ये या गीतावर सिनेमात नृत्य करते त्यावर कोणी आक्षेप घेत नाही तर आता या गीतावरील नृत्यावर का आक्षेप घेतला जात आहे?असा प्रश्‍न केला.आम्ही देखील भारतीय आहोत आणि आम्ही देखील संविधानाच्या दाय-यामध्ये जगत असतो.या ठिकाणी जमलेले,आनंद व्यक्त करणारे सगळे कम्यूनिटी सपोटर्स होते.या ठिकाणी काहीही चुकीचे घडले नाही,आमच्यावर अारोप करणारे किवा या विषयी चुकीचे वृत्त प्रसिद्ध करणा-यांच्या विरोधात आम्ही त्यांच्या घरासमोर धरना देऊ,असा इशारा त्यांनी दिला.२०२४ वे वर्ष सुरु झाले आहे आता तरी लोकांनी आपली मानसिकता आणि कोणत्याही गोष्टीकडे बघण्याची नजर बदलायला हवी,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या