
पदवीधर निवडणूक: २५ हजार रु. महिना पगार देणा-या १ लाख नोक-या निर्माण करणार
गाेंदिया ता. २१ नोव्हेंबर: पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढविणारे भाजप पक्षाचे संदीप जोशी यांचा पक्ष् हा केंद्रात व राज्यात सत्तेत होता.याशिवाय भाजपचे लोकसभेत व राज्यसभेत स्पष्ट बहूमत आहे.त्यांनी जर मनावर घेतलं तर पाच मिनिटात विदर्भ वेगळा होऊ शकतो,मग विदर्भ विरोधी काेण आहे?भाजप पक्षाचे संदीप जोशी यांना तर गेले सहा वर्ष विदर्भ आठवला नाही त्यांना आताच कसा विदर्भ आठवायला लागला?विदर्भवादी व विदर्भ विरोधी कोण आहे याचा विचार पदवीधर मतदार संघाच्या मतदारांनी करावा,असे आवाहन विदर्भवादी उमेदवार नितीन रोंघे यांनी केले.
ते गोंदिया येथील पत्र परिषदेत बोलत होते.विदर्भावरती भाजप पक्षाचे प्रेम हे शंभर टक्के पुतना मावशीचे प्रेम आहे.फक्त निवडणूक आली की त्यांना विदर्भाचा मुद्दा सूचतो.एकदा निवडणूक जिंकली की मग मुंबई,पुणे,दिल्ली येथेच त्यांचा प्रवास असतो.त्यांना जर खरोखरंच विदर्भाविषयीचा कळवळा आहे तर त्यांनी आताच्या आता विधेयक आणून विदर्भ राज्याचे समर्थन करुन स्वतंत्र विदर्भ राज्य बनवावं,असे आव्हान रोंघे यांनी यावेळी केले.
त्यांनी ईच्छाशक्ती तर दाखवावी, जावं दिल्लीश्वरांकडे. नागपूरात करोनाचा संसर्ग वाढतोय मात्र महापौर यांनी नागपूरकरांना वा-यावर सोडून दिले व प्रचारात व्यस्त आहेत. नागपूरात करोना वाढतोय,नागपूरात रॅपिड उपाययोजनेची गरज आहे आणि महापौर हे प्रचार सभांमध्ये दिसत आहेत.
नागपूरातील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ३३ मुख्याध्यपकांच्या जागा रिकाम्या आहेत मी कालच त्यांना आव्हान दिले आहे बैठक घ्या आपण या मुद्दासाठी तरी प्रचार थांबवू व तोडगा काढू,यांना शिक्ष् णासंबधी कोणतेही गांर्भीय नाही,यांना निवडणूक म्हणजे फक्त निवडणूक हाच एकमेव अजेंडा असतो,एकदा निवडणूक झाली की सहा वर्षे भंडा-यात ढूंकून सुद्धा पाहणार नाहीत,असा घणाघाती आरोप रोंघे यांनी या प्रसंगी केला.
भाजपचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार नुकतेच भंडारा येथे प्रचार करुन गेलेत,बेरोजगारीचा मुद्दा मांडला,त्यांना ‘भेल’ चा रखडलेला प्रकल्प दिसला नाही का?त्यांना लीलॅण्डमध्ये एवढ्या जागा शिल्लक आहेत,हे माहिती नाही का?ते कधी या भागातील कारखान्यांबद्दल बोलले का?हे कारखाने जर सुरु झालेत तर कमीत कमी भंडा-यातील दोन हजार बेरोजगारांना काम मिळेल,मी तर माझ्या जाहीरनाम्यात जाहीर केले आहे,कमीत कमी त्यांना २५ हजार रुपये पगार महिना मिळवून देईल,मला २५ हजार रुपये महिना देणा-या एक लाख नोक-या निर्माण करायच्या आहेत व त्या योजनांचे ब्लू प्रिंट देखील मी माझ्या जाहीरनाम्यात दिले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
