फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजश्री गणेश टेकडी मंदिरला ‘अ’ पर्यटन क्षेत्राचा दर्जा द्या

श्री गणेश टेकडी मंदिरला ‘अ’ पर्यटन क्षेत्राचा दर्जा द्या

Advertisements

सामाजिक कार्यकर्ता भूषण दडवे यांची मागणी

महाराष्ट्र शासनाची गेल्या ९ वर्षे ८ महिन्यांपासून टाळाटाळ

गडकरींनाही दिली दोन पत्रे

नागपूर,ता. २ सप्टेंबर २०२२: श्री गणेश टेकडी मंदिरालापर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र शासन गेल्या ९ वर्षे ८ महिन्यापासून आजपर्यंत उदासीन आहे. आता ‘हिंदुत्ववादी’ सरकार आले आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार करतात,यामुळेच आता त्वरित दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा व नागपूरातील टेकडी गणेश मंदिराला ‘अ’पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्रदान करण्याची अधिसूचना काढण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता भूषण दडवे यांनी निवेदनातून केली.

दिनांक ३० जानेवारी २०१३ पासून आजपर्यंत सतत संघर्ष व पाठपुरावा करून आम्ही लढा देत असल्याचे ते म्हणाले.या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही दोन वेळा पत्र दिले आहेत तसेच तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक ४ फेब्रुवारी २०१५ रोजी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना याबाबत लेखी आदेश दिला होता मात्र अद्याप कोणतीही अधिसूचना काढण्यात आली नाही

तत्कालीन अर्थमंत्री व सध्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, माजी आ.सुधाकर कोहळे, गिरीश व्यास, आमदार प्रवीण दटके, आ. मोहन मते आदी यांनाही या संदर्भात लेखी पत्र दिले आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर असताना व त्यांना अधिकार असतानाही, टेकडी गणेश मंदिराच्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही हीच खरी सामाजिक व्यथा व धार्मिक शोकांतिका असल्याची खंत दडवे यांनी व्यक्त केली.

दिनांक १७ मार्च २०१८ रोजी शासन निर्णया प्रमाणे सर्व त्रुट्या दूर करून जिल्हाधिकारी नागपूर यांनी प्रस्ताव व ठराव पारित करून प्रधान सचिव पर्यटन विभागाला पाठविला आहे. आता फक्त मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडून व ठराव पारित करून अध्यादेश काढण्याची गरज आहे.

सध्या संपूर्ण देशात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे.या पार्श्वभूमीवर हा अध्यादेश लवकरात लवकर काढण्यात यावा अशी मागणी भाजपा नागपूर शहर उपाध्यक्ष, जागृत सामाजिक कार्यकर्ता, गणेश भक्त भूषण दडवे यांनी, लाखो कोट्यावधी भक्तांच्या वतीने आपल्या निवेदनातून केली अाहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या