फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजश्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त ४००० चौरस फुटाची महारांगोळी

श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त ४००० चौरस फुटाची महारांगोळी

Advertisements

सिद्धीविनायक फाऊंडेशनचा उपक्रम:  दिग्गजांच्या उपस्थितीत होणार संस्कार भारतीचा उपक्रम

नागपूर, २० जानेवारी २०२४: अयोध्येत होणा-या श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त आयपीएएफ, उत्तिष्ठ भारत आणि सिद्धिविनायक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दिनांक २१ जानेवारी रोजी बजाजनगर येथील बास्केटबॉल मैदानावर महारांगोळी साकारण्यात येणार आहे. संस्कार भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत घरोटे यांच्या मार्गदर्शनात हर्षल कावरे, मोहिनी माकोडे, दीपाली हरदास यांच्यासह एकूण १०० कलाकार यात सहभागी होणार आहेत.

ही रांगोळी ५० बाय ८० फूट अशी एकूण ४ हजार चौरस फूट आकारातील असून संस्कार भारतीचे कलावंत ती दुपारी ३ ते रात्री ९ या ६ तासात पूर्ण करणार आहेत.

या ऐतिहासिक क्षणी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने तसेच श्री सिद्धीविनायक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी, इंटरनॅशनल परफॉर्मिंग आर्ट फेस्टिव्हल (आय.पी.ए.एफ.) चे सीईओ श्याम पांडे उपस्थित राहणार आहेत.

ही महारांगोळी २२ आणि २३ जानेवारी असे दोन दिवस सर्व नागरिकांना बघण्याकरिता खुली राहणार आहे. यात अयोध्या मंदिराची प्रतिकृती, अक्षत कलश यात्रा, राम सीता, हनुमानजी, धनुष्यबाण, रामजी झुला, राम सेतूचा राम नावाचा दगड आदी प्रतिकृती बघायला मिळणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या