फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशेतकऱ्यांच्या व्यथांवर व्यक्त होणाऱ्या लेखक कवींची आज गरज: सुरेश पाचकवडे

शेतकऱ्यांच्या व्यथांवर व्यक्त होणाऱ्या लेखक कवींची आज गरज: सुरेश पाचकवडे

Advertisements

सृजन साहित्य संघ संमेलन

नागपूर : यंदा बराच लांबलेल्या पावसाळ्यामुळे आणि निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे अनेकांची घरे उध्वस्त झाली. फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी उभारीही घेतली. मात्र, शेतकऱ्यांचे पंख गळून पडले आहेत. त्यांच्या व्यथांवर व्यक्त होणाऱ्या लेखक-कविंची आज गरज असल्याची भावना सुरेश पाचकवडे यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून व्यक्त केली.  सृजन साहित्य संघ मुर्तिजापूर, नागपूर शाखा व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने रविवारी राजाबाक्षा येथील पं. बच्छराज व्यास विद्यालयाच्या सभागृहात हे संमेलन पार पडले. उद्घाटन गजलनवाज भिमराव पांचाळे यांनी केले.

यावेळी, व्यासपीठावर स्वागताध्यक्ष थलसेनेचे सेवानिवृत्त कमीशन्ड  ऑफिसर मनीष जोशी, साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य आशुतोष अडोणी, माजी महापौर नंदा जिचकार, विवेक कवठेकर, रमेशचंद्र दीक्षित उपस्थित होते.  अलिकडे कविता मोठ्या प्रमाणात लिहिल्या जात आहेत. एकंदर महापूरच आल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र, त्यांचा दर्जा खालावला आहे. साध्या-सोप्या कविता सोडून अवघड, दुर्बोध दीर्घ कविता लिहिण्याने आपण मोठ्ठे कवि वगैरे भासवण्याचा प्रयत्न होत आहे. तत्वज्ञान, सामाजिक जाणिव आणि वास्तव्य नसल्याची भावना राज्यस्तरीय एकदिवसीय चवथ्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवि व साहित्यिक सुरेश पाचकवडे यांनी व्यक्त केली.

धावपळ प्रचंड वाढली आहे आणि कमी वेळात आनंद देणाºया टीव्ही, मोबाईलमध्ये मनुष्य अडकला आहे. लहान मुलेही पुस्तकांऐवजी मोबाईलमध्ये शिरली आहेत. हे भविष्यवेधी संकट आहे. यामुळे, भविष्यात लेखक-कविंची संख्या कमी होईल आणि साहित्य निर्मितीवर संकट निर्माण होणार असल्याचे पाचकवडे म्हणाले. प्रास्ताविक सृजन साहित्य संघाचे संस्थापक रवींद्र जवादे यांनी केले. संचालन प्रा. कीर्ती वनकर-काळमेघ यांनी केले. आभार प्रमोद पंत यांनी मानले. यावेळी, रवींद्र जवादे यांच्या ‘गाई गेल्या राना’ हा ललितलेख संग्रह, गणेश भाकरे यांच्या ‘विठोबा की माऊली’ हा कवितासंग्रह व मीनल येवले यांच्या ‘मी मातीचे फुल’चे प्रकाशन करण्यात आले. पुरस्कार सोहळ्याचे सूत्र संचालन वर्षा किडे-कुळकर्णी यांनी केले.

हे ठरले पुरस्कारांचे मानकरी-
-उत्कृष्ट कवितासंग्रह ‘कविताच माझी कबर’ संजय चौधरी(नाशिक)
-उत्कृष्ट कथासंग्रह(विभागून) ‘अबोल अश्रू’-डॉ.गिरीश खारकर(अमरावती)
-‘झिरो मॅरेज’-वर्षा किडे-कुळकर्णी(नागपूर)
-उत्कृष्ट बालवाड्मय(विभागून) ‘मिसाईल मॅन-१’ एकनाथ आव्हाड
– ‘गाव मामाचं हरवलं’ संजय वाघ(नाशिक)
-उत्कृष्ट ग्रंथ निर्मीती शब्ददीप प्रकाशन पुरस्कार कथासंग्रह ‘माऊली‘ सुनील मंगेश जाधव
विशेष पुरस्कार-
‘कायधूळ’ कथासंग्रह-दिनकर कुटे(सांगली)
-‘साई सेवक संत सगुण मेरु नाईक’चरित्र, रमेश वंसकर(गोवा)

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या