फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशेतकरी भेटीचे शासन फक्त नाटक करतेय: प्रविण कुंटे यांचा आरोप

शेतकरी भेटीचे शासन फक्त नाटक करतेय: प्रविण कुंटे यांचा आरोप

Advertisements

सरसकट कर्जमाफी द्यावी अन्यथा राष्ट्रवादी संघर्षाची भूमिका घेईल

नागपूर: स्पष्ट जनादेश मिळाला असतानाही भारतीय जनता पक्ष् व शिवसेना हे सत्तानाट््यामध्ये मग्न आहेत. शरद पवार हे नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यानंतर अचानक मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांना जाग आली व शेतकरी भेटीचे नाटक त्यांनी सुरु केले. शेतकर्यांवर ओढवलेल्या गंभीर संकटाची शासनाला जाणीवच नाही. नवीन सरकारचा शपथविधी होण्याआधी शासकीय यंत्रणेला कामाला लावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस ही रस्त्यावर उतरुन संघर्ष करले,असा ईशारा राकाँ पक्षाचे प्रवक्ता व सरचिटणीस प्रविण कुंटे यांनी दिला.ते मंगळवार दि.५ नोव्हेंबर रोजी पत्रकार भवन येथे आयोजित पत्र परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले,की भाजप-शिवसेनेला राज्यात स्पष्ट जनादेश मिळाला आहे मात्र सत्तानाट््यामुळे राज्यात शेतकऱ्यांवर ओढवलेल्या ओला दुष्काळाकडे त्यांचे लक्ष् नाही. संपूर्ण दिवाळी शेतकर्यांची अंधारात गेली. मुलांचे शिक्ष् ण, मुलींचे लग्न, पुढील हंगामाची तयारी कशी करायची हा गहन प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर पडला असताना सत्ताधारी पक्ष् हे तू मोठा की मी मोठा? तुझा मुख्यमंत्री की माझा मुख्यमंत्री? तू मोठा भाऊ की मी मोठा भाऊ?अश्‍या प्रश्‍नात गूंतला असून हा अक्ष्म्य अपराध आहे. मका,धान,कापूस,सोयाबीन,संत्रा अशी सर्वच पीके हातातून निघून गेली आहे. शेतकर्यांची अवस्था अतिशय दारुण झाली आहे. एवढी भयंकर परिस्थिती उद् भवली असताना सत्ताधार्यांना याचे सोयरसूतक नाही.

पाच वर्षात तेरा ते चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे विसरता येत नाही. पुन्हा ओढवलेल्या भयंकर संकटामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर या सरकारवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा लागेल. एकेकाळी हेच फडणवीस शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर जीवाचे रान करायचे. आता त्यांनीच सत्तासंघर्षापेक्ष्ा शेतकऱ्यांच्या हिताला महत्व दिलं पाहिजे. सरसकट कर्जमाफी देताना कोणतेही निकष लावू नका,अशी मागणी ही त्यांनी केली.
मुख्यमंत्री यांनी दहा हजार कोटी रुपयाची नुकसान भरपाईची घोषणा जी केली ती अत्यंत अपुरी असून २५ हजार कोटींची करावी तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान ५० हजार रुपयांची नगदी मदत करावी,अशी मागणी त्यांनी केली. विदर्भात दिड लाख हेक्टरमध्ये संत्रा बागायत असून अतिवृष्टिमुळे व फळमाशीमुळे बागायत शेतीला जबरदस्त फटका बसला आहे. धान,सोयाबीनची कापणी झाल्यानंतर आलेल्या पावसामुळे हाती आलेल्या पीकाला कोंब फुटून पीक उधवस्त झाले. कपाशीच्या बोंडाच्या आत कोंब फुटल्याने कापूस उत्पादक शेतकरी हा देखील उधवस्त झाला आहे. उडीद,मूंग, तूर,द्राक्ष्े उत्पादक शेतकरी यांचीही अवस्था मरणासन्न झाली आहे. परिणामी शपथविधी नंतर करा आधी शासकीय यंत्रणा कामाला लावा, विमा कंपनीचे हप्ते भरुनसुद्धा जर शेतकऱ्याला संरक्ष् ण मिळत नसेत तर त्या कपंन्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. राज्यपालांनी तातडीने यात हस्तक्ष्ेप करुन संत्रा,कापूस,सोयाबीन,धान,द्रोक्ष्े,उडीद,मूंग उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये नगदी स्वरुपात मदत करणयाची कुंटे यांनी केली.

पत्र परिषदेला शहराध्यक्ष् अनिल अहिरकर,ग्रामिणचे कार्याध्यक्ष् राजु राऊत, प्रदेश सचिव सुरेश गुडधे पाटील,शहर महासचिव लक्ष्मी सावरकर,जाकिर शेख,कदिर शेख,प्रकाश लिखाणकर, जतिन झाडे, फैजान मिर्झा आदी उपस्थित होते.

धान कूजत ठेवल्यानेच पंचनामे करणार का?-अनिल अहिरकर(शहराध्यक्ष्)हे सरकार यंदाही शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पंचनामे यावर अंबलबून राहणार आहे का?विशेष म्हणजे शेताचे बांधे हे ओले झाले आहेत,त्यात धान हे शेतात कुजत,सडत असल्यामुळे शेतकरी ते बाजूला काढून ठेवतो, तरी देखील पंचनामा करताना शेतकऱ्यांनी मुद्दामून लहान केले बांधे हे लक्ष्ात घेणार आहेत का? तलाठी कसा अहवाल देणार आहे?खराब झालेले, नासलेले धान हे तलाठीला दिसावे म्हणून शेतात ते किती दिवस शेतकऱ्यांनी सडवत ठेवावे? याची कालमर्यादा सरकार निश्‍चित करणार आहे का? सर्वोच्च न्यायालयाने आदेश पारित केल्यानंतर ज्याप्रमाणे रस्त्यावर घडणाऱ्या अपघातात आता माणसे मदत करतात, पोलिसांचा ससेमारा मदत करणाऱ्यांच्या मागे लागत नाही,त्याचप्रमाणे सरकारने पंचनाम्यासाठी असाच निकष ठरवावा जेणेकरुन शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचे संपूर्ण मोबदला मिळेल. पंचनामा करताना ओला झालेला,लहान झालेला बांधा सरकारने लक्षात घेऊ नये अशी मागणी अनिल अहिरकर यांनी केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या