फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशेतकरी, कष्टकऱ्यांच्या श्रमाला न्याय देणारा अर्थसंकल्प : ॲड. धर्मपाल मेश्राम

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या श्रमाला न्याय देणारा अर्थसंकल्प : ॲड. धर्मपाल मेश्राम

Advertisements

नागपूर. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी, कष्टकऱ्यांच्या श्रमाला न्याय देणारा आहे, अशी प्रतिक्रीया भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गाच्या उत्थानासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल ॲड. मेश्राम यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे आभार मानले. 
शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड्सच्या या कर्जाची मर्यादा वाढवून ५ लाख करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देशातील सात कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला सन्मान देऊन विकास साधण्याचा पुढाकार घेतला गेला आहे, असेही ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या