फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजशिवसेनेनं करुन दाखवलं, सचिन अहिर आमश्या पाडवी विजयी

शिवसेनेनं करुन दाखवलं, सचिन अहिर आमश्या पाडवी विजयी

Advertisements

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांवरील निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. राज्यसभा निवडणुकीप्रमाणं या निवडणुकीत देखील भाजप आणि महाविकास आघाडीनं शक्ती लावली होती. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

भाजपनं प्रविण दरेकर,उमा खापरे, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली होती. तर, शिवसेनेनं सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली होती.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे एकूण ११ उमेदवार असल्यानं निवडणूक लागली. भाजपचे प्रविण दरेकर,उमा खापरे, राम शिंदे, श्रीकांत भारतीय यांचा विजय झाला आहे. तर, शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे विजयी झाले आहेत.

भाजपचे प्रविण दरेकर, उमा खापरे, राम शिंदे, श्रीकांत भारतीय हे पहिल्या फेरीत विजयी झाले. तर, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि रामराजे नाई निंबाळकर यांचा विजय झाला.

काँग्रेसच्या तक्रारीनंतर मतमोजणी लांबली-
भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसनं आक्षेप घेतला होता. काँग्रेसनं घेतलेला आक्षेप राज्य निवडणूक आयोगानं फेटाळला. त्यानंतर प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडं गेलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं देखील काँग्रेसचा आक्षेप फेटाळल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या