फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशिवसेना ठाकरे गटाला नागपूर 'दक्षिण'मध्ये मोठा धक्का! 

शिवसेना ठाकरे गटाला नागपूर ‘दक्षिण’मध्ये मोठा धक्का! 

Advertisements
 मुकेश रेवतकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

नागपूर,९ ऑक्टोबर २०२५: शहराच्या स्थानिक राजकारणात आज महत्त्वपूर्ण राजकीय उलथापालथ घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नागपूर ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघाचे प्रभावी उपजिल्हाप्रमुख मुकेश रेवतकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे नागपूर ‘दक्षिण’ भागातील शिवसेनेच्या संघटनेला मोठा धक्का बसला असून, त्यांच्यासोबत शेकडो निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील राष्ट्रवादीत दाखल झाले.
पक्षप्रवेश सोहळा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भंडारा येथील जिल्हा कार्यालयात अत्यंत उत्साहात पार पडला. नागपूर शहरातील असूनही पक्षाच्या महत्त्वपूर्ण नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा भंडारा कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पक्षाचे निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच शहराध्यक्ष अनिल अहिरकर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, माजी मंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, भंडारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, महासचिव धनंजय दलाल तसेच चंद्रकांत नायक, लक्ष्मण बालपंडे, ईश्वर कोल्हे आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते.
मुकेश रेवतकर आणि त्यांच्यासोबत आलेल्या शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.मुकेश रेवतकर हे नागपूर ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघात एक परिचित, ऊर्जावान आणि जमीनी-पातळीवर मजबूत पकड असलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी शिवसेनेमध्ये अनेक वर्षे संघटनात्मक जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली असून, त्यांचा थेट संपर्क आणि कार्यकर्त्यांवरील प्रभाव अफाट आहे.त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे व ऊर्जावान’ नेतृत्वामुळे राष्ट्रवादीला मोठे बळ मिळाले आहे.त्यांचा हा प्रवेश म्हणजे नागपूर ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या संघटनात्मक जाळ्याला पडलेले मोठे खिंडार आहे.
यावेळी पक्ष निरीक्षक राजेंद्र जैन यांनी त्यांचे स्वागत करताना म्हटले,  की,आज मुकेश रेवतकर यांच्यासारखा मतदारसंघात मोठी ताकद असलेला नेता पक्षात आल्याने, नागपूर ‘दक्षिण’ विधानसभेत आता आमचा पक्ष अधिक बळकट झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाचा उपयोग सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल आणि आगामी काळात या मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रभाव निश्चितच वाढेल.हा पक्षप्रवेश नागपूर ‘दक्षिण’ मधील राजकीय गणिते बदलणारा आणि शिवसेनेच्या मूळ गटाला मोठा संघटनात्मक धक्का देणारा ठरला असल्याचे बोलले जात आहे.
…………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या